संजोग
मला सर्व समझलं... पण तू मला अजून ओळखत नाही ना (टीना हळूच पुटपुटते )
काय म्हणाली तू...... ती मुलगी
काही नाही.... टीना
गूड काही म्हणायची हिम्मत पण नाही करायची.. ती मुलगी
हमम.... टीना
हा होता संजोग भाग 3 चा शेवट, आता समोर..
टीना दुसरीकडे जाऊन बसते.. पण ती मुलगी विनाकारण टिनाची ची खिल्ली उडवत असते..
इथे कुठून कुठून लोक येतात तर माहित नाही.. स्वतःला खूप शहाणे समझतात.. असो ... ती मुलगी अशी बडबड करत असते पण टीना चुपचाप ऐकून घेते कारण तिला काही वाईट घडलं नाही पाहिजे असं वाटते..
टीना कॉलेज संपल्यानंतर आपली स्कुटी कडे जाते तर तिची स्कुटी कोणी तरी पाडून ठेवली असते.. व जवळून एक बाईक जात असते म्हणून टीना ला असे वाटते कि ती बाईक वाल्यानीच पाडली असेल
ओह हॅलो... हॅलो.... टीना आवाज देते बाईक वाल्याला पण ती बाईक जाते.. टीना रागात आपली स्कुटी उचलते आणि घरी जाते..
कॉलेज चा फस्ट डे टीना साठी ठीक ठाक जातो... ती घरी जाते फ्रेश वगैरे झाल्यानंतर रूम मध्ये जाते.. टिनाला लिखाण खूप आवडत असते.. ती लहानपणापासून आपण एक व्हावं असं वाटते.. पण तीच लिखाण असं खास नसत.. पण प्रयत्न करून ती लिखाण सुरु ठेवत असते.. पण का कुणाला ठाऊक कि आज जे घडलं ते तिच्या कंट्रोल च्या बाहेर होत... तरी पण शांततेत सहन केल तेच मनातलं बाहेर काढण्याकरिता आज पुन्हा एखादा लिखाणाचा प्रयत्न करत असते....
काय लिहावे.... काय बरं...????????????
किसी को क्या समझाये..
समझणे वाले समझ ही जाये...
नही समझे तो भी अपना क्या जाये..
जिंदगी है तो खुशियो से जीते जाये...
वाह टीना क्या बात... छान... कुणी तारीफ करो कि न करो.. पण मी लिहिलं आहे आणि आज पहिल्यांदा काही तरी छान लिहिलं असं वाटत आहे..
टीना दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेज ला जाते तेव्हा तिला कालची बाईक दिसते.. ती कोणाची ती विचारते पण तिला कोणी काही सांगत नाही..
टीना क्लास मध्ये जाते आणि बेंच वर जाऊन बसते..
मी इथे बसू शकते का.. असं टीना ला एक मुलगी विचारते...
हो का नाही.... टीना
थँक्यू... हाई माझं नाव आयुशी...
हाई मी टीना.....
दोघी ची छान मैत्री होते... कॉलेज संपल्यानंतर आयुशी ऑटो साठी वाट बघत असते..
अग आयुशी काय झालं... कुणाची वाट बघत आहे..
अग आटो...
तू कुठे राहाते... मी सोडते तुला...
पांडे कॉलेज जवळ...
मी पण तिकडेच राहाते चल तुला पण छान होईल.
ओके....
ह्या भागात एवढेच समोरची स्टोरी पुढल्या भागात...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा