दाटुन सखया, कंठी आले
हुंदक्यातले, संवाद मुके
श्वासास कसे, छळू लागले
उगी आठवी, खेळ मनाचे
गंधित वारा, गुज स्पर्शाचे
कधी आठवे, गंध फुलांचा
मंतरले क्षण, फुलाफुलांचे
सांजवेळ मज, उदास वाटे
नयनी माझ्या, श्रावण दाटे
सांग कुणी अन, कसे पेरले
वाटेवरती, माझ्या काटे
किती आठवू, रोज तुला रे
वाट तुझी मी, किती पहावी
तुला करावी, किती आर्जवे
विरह वेदना, किती झरावी
वाट तुझी मी, किती पहावी
तुला करावी, किती आर्जवे
विरह वेदना, किती झरावी
©निशा थोरे(अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा