नव्या वर्षाचे संकल्प म्हणजे केवळ स्वतःला दिलेली आश्वासने नसून ती आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी असते. अनघाच्या गोष्टीप्रमाणेच, आपण काही साधे, सोपे पण प्रभावी २५ संकल्प खालीलप्रमाणे आखू शकतो, जे मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लागू पडतील:
१. लिफ्ट ऐवजी जिने चढण्याचा संकल्प करू शकतो. किमान दोन मजल्यांपर्यंत चढताना लिफ्टचा वापर टाळणे.
२. साखर कमी घेण्याचा संकल्प करू शकतो. कमी साखर, मीठ घालून चव येणारे पदार्थ करुन बघु शकतो. दिवसातून एकदाच साखर असलेला चहा किंवा कॉफी घेणे.
३. पाण्याचं प्रमाण वाढवणे गरजेचं आहे.दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिणे तहान लागली नसली तरीही योग्य प्रमाणात पिण्याची सवय लावली पाहिजे.
४. सकाळी १० मिनिटे ऊन्हात बसू शकतो. शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळावे म्हणून दररोज सकाळी कोवळ्या उन्हात बसणे.
५. जेवणानंतर शतपावली करू शकतो.रात्रीच्या जेवणानंतर किमान १०-१५ मिनिटे घराबाहेर किंवा हॉलमध्ये फेऱ्या मारणे.
६. कापडी पिशवी सोबत घेण्याची शिस्त स्वतःला लावू शकतो. घराबाहेर पडताना कापडी पिशवी खिशात किंवा गाडीत आहे की नाही, हे तपासूनच बाहेर पडणे.
७. विनाकारण गाडी नको, अस ठरवलं पाहिजे. १० मिनिटांच्या अंतरासाठी चालत जाणे त्यामुळे पेट्रोल आणि काही कॅलरी बर्न होतील त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल. पैसा आणि आरोग्य दोन्ही वाचेल.
८. लाईट-पंखा बंद करण्याची सवय लावली पाहिजे. रूमच्या बाहेर पडताना बटण बंद केल्याशिवाय बाहेर न जाणे. असा नियम करू शकतो.
९. पावसाचे/वापरलेले पाणी पुन्हा वापरू शकतो. ते पाणी रिसायकल करणे. झाडांना पाणी घालण्यासाठी भाज्या धुतलेले किंवा एसीचं पाणी वापरणे.
१०. एक 'नो-स्पेंड' दिवस साजरा करू शकतो. किमान महिन्यातून एक दिवस असा ठरवणे ज्या दिवशी अत्यावश्यक गरजे शिवाय एकही रुपया खर्च करायचा नाही.
११. ' जेवताना नो मोबाईल ' हा नियम लागू करू शकतो. जेवताना संपूर्ण कुटुंबाने मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी गप्पा मारणे. सुरुवात स्वतः पासुन करू शकतो.
१२. दररोज १० मिनिटे वाचन करण्याचा संकल्प करू शकतो. सोशल मीडिया सोडून एखादं चांगलं पुस्तक वाचणे.
१३. कृतज्ञता व्यक्त करणे. दिवसातून किमान एकदा तरी कुटुंबातील व्यक्तीने केलेल्या कामासाठी "थँक्यू" म्हणणे. चुक झाली असेल तर माफी मागणे." सॉरी" म्हणणं आलं पाहिजे.
१४. जुने मित्र किंवा नातेवाईक यांना महिन्यातून किमान एका अशा व्यक्तीला फोन करणे ज्यांच्याशी खूप दिवस बोलणं झालेलं नाही.
१५. शांत बसणे. दिवसातून ५ मिनिटे काहीही न करता डोळे मिटून शांत बसणे मेडिटेशन करणे.
१६. स्वतःचे ताट स्वतः धुणे. जेवण झाल्यावर किमान आपले ताट विसळून बेसिनमध्ये ठेवणे.
१७. हाती घेतलेली वस्तु जागेवर ठेवणे.एखादी वस्तू जिथून उचलली तिथेच परत ठेवण्याची शिस्त लावणे. पसारा कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
१८. डिजिटल डिटॉक्स हा पण करू शकतो. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल बंद करून बाजूला ठेवणे.
१९. आठवड्यातून एक घर सफाई मोहीम करू शकतो. एखाद्या रविवारी घरातील किमान एक कपाट किंवा कोपरा मिळून स्वच्छ करणे.
२०. किचन मध्ये हेल्प करु शकतो. आठवड्यातून एकदा घरातील पुरुषांनी आणि मुलांनी नाश्ता किंवा जेवण बनवण्याची जबाबदारी घेणे.
२१. नवीन कौशल्य विकसीत करू शकतो.या वर्षात एखादी नवीन गोष्ट शिकणे (नवीन भाषा, कुकिंग, एखादं वाद्य).
२२. चिडचिड कमी करणे.समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया न देणे.
२३. पैसे साठवणे. दर महिन्याला आपल्या कमाईतील किमान ५-१०% रक्कम बाजूला काढून ठेवणे.
२४. लवकर उठण्याचा प्रयत्न करू शकतो. सूर्यादयापूर्वी किंवा किमान ७ च्या आत उठण्याचा प्रयत्न करणे.
२५. स्वतःची आवड जपणे.विसरून गेलेला छंद (गायन, चित्रकला, शिवणकाम , विणकाम ) पुन्हा सुरू करणे.
या २५ पैकी कोणते ५ संकल्प तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात ?
तुमचे मत कॉमेंट मध्ये सांगा.
" कॅलेंडरची पाने बदलतील, पण नात्यांमधला ओलावा आणि एकमेकांन प्रती असलेला आदर वृद्धिंगत होवो. या वर्षी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नवा संकल्प करूया. नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! "
नव्या वर्षाची नवी पाऊलखूण !
" प्रिय वाचकहो,
काळाचे एक पान उलटून आता आपण नव्या कोऱ्या वर्षात प्रवेश करत आहोत. गेल्या वर्षी तुम्ही माझ्या शब्दांवर जे प्रेम केलं, त्याबद्दल मी आपली ऋणी आहे.
नवे वर्ष म्हणजे केवळ नव्या तारखा नव्हे, तर नव्या भावना आणि नव्या कथांना जन्म देण्याची संधी !
यंदाचं वर्ष तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण, या वर्षात मी तुमच्यासाठी साहित्याची एक रसाळ मेजवानी घेऊन येत आहे.
याचीच सुरुवात म्हणून माझी 'क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा' ही एक नवी कोरी करकरीत दीर्घ कथा लवकरच पोस्ट होईल. ही कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया किंवा कमेंट नक्की कळवा.
तुमचे ते दोन शब्द जरी असले, तरी ते माझ्यासाठी मोलाचे आहेत. कारण तेच मला नवीन कथा लिहिण्यासाठी प्रोत्साहन आणि ऊर्जा देतात.
नव्या वर्षात शब्दांच्या या प्रवासात आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !
शुभेच्छुक,
आपली वेदा "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा