""काकू..आय एम रेडी!" आठ वर्षांची मायरा तिच्या लाडक्या काकूला बोलली.
"ओहह..माय प्रिन्सेस.." कियारा तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलली.
" वाह वाह...आज आमची राजकुमारी छान दिसते आहे हो!" वत्सला आज्जी मायराला कानामागे तिट लावत बोलली.
"हो न! माझ्या कियु काकूने हा न्यू ड्रेस घेतला होता मला. आम्ही आता गार्डन मधे फिरायला जाणार आहोत म्हणून घातला आहे. हे बघ आज्जी याला दोन पंख पण आहेत बटरफ्लाय सारखे." इवलुश्या मायराला कित्ती काय सांगू नी काय नको असं झालं होत.
"कुठे जाणार बोललीस?" वत्सला आज्जी विचारते.
"गार्डनला!" मायरा
"आज नाही मायु..दोन दिवसांनी जा हवं तर. यावेळी लहान मुलांवर संक्रांत आहे. सारिका..तुला सांगितल होत ना मी.. मग? तुझ्या लाडक्या फॉरेन रीटन जाऊबाईला सांगितल नाहीस वाटते!" वत्सला ताई सारिकावर नजर रोखून कियाराला बोलत होत्या.
"सांगितल होत आई, पण...."सारिका एवढंच बोलून गप्प राहिली.
"हम्म...नेहमी सारखं ऐकल नसणार... बरोबर ना? ठीक आहे हरकत नाही. तिला म्हणावं तुला कुठे जायचं असेल तर जा पण माझ्या नातवंडाना घरीच ठेव म्हणावं." वत्सला ताई सारिकाला बोलल्या.
"वहिनीच्या आडून मला सांगण्याची गरज नाही..डायरेक्ट बोलू शकता आणि महत्वाचं म्हणजे मी फॉरेन रिटर्न नाही. मी तिथलीच आहे. दुसरी गोष्ट... आपले सण कधीही कुणावर येत नाहीत किंवा ते सण आपला घातपात करत नाहीत. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रध्दा नसावी आणि ती पसरवू पण नये. मी एक सायन्स स्टूडेंट होते त्यामुळे चांगल वाईट मलाही कळत. मायरा आता तयार झाली आहे त्यामुळे नको म्हणून तिचा मूड स्पॉइल करू नका. "कियारा
"परदेशी राहणारी तू...तुला काय माहित यातलं.. हव तर तुझ्या लेकाला घेऊन जा पण माझ्या नातीला न्यायचं नाही समजल!"वत्सला ताई कियारा वर चिडून बोलल्या.
"मायु...सॉरी बेटा..आपण नंतर पुन्हा जाऊ ओके..मी आता कियांशला घेऊन जाते आणि परवा आपण पुन्हा जाऊया!" कियारा छोट्या मायराला समजावत बोलली.
"ओके काकू..!" डोळ्यातून ओघळणार पाणी.. हाताच्या उलट्या बाजूने पुसत मायरा बोलली आणि आत निघून गेली.
"तिला रडवून काय भेटल तुम्हाला? आली असती तर काही झालं नसत. संक्रांत किंक्रांत अस काही नसत. जाऊदे तुम्हाला समजावण्यात मला काही इंटरेस्ट नाही. येते मी जाऊन. वहिनी.. येते मी." कियारा
"जास्त शिक्षण केलं आहे ना म्हणून या गोष्टी समजत नाहीत. असो." वत्सला ताई स्वतःशीच पुटपुटत त्यांच्या खोलीत निघून गेल्या.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा