Login

संक्रांत कुणावर?(भाग २)

सण कधीच वाईट नसतात.


"मायु..अस नाराज नाही व्हायचं बच्चा! काकू बोलली आहे ना नंतर जाऊ पुन्हा, मग..अस नाराज राहिलीस तर काकूला पण वाईट वाटेल ना! चल डोळे पुस बघू.. आपण काकू यायच्या आधी तिळाचे लाडू बनवूया..चल..पटकन उठ बघू!" सारिका तिच्या लेकीला समजावत बोलली..तशी मायरा पण उठून खाली गेली.

"अग सारिका...जरा मायू कडे माझा चश्मा पाठवून दे ग खोलीत. मी खालीच विसरले बघ.." वत्सला ताईंनी त्यांच्या खोलीतून आवाज देत सारिकाला सांगितल.

"हो आई.. देते पाठवून. मायू..आज्जीचा चष्मा बघ कुठे आहे जरा आणि देऊन ये बर आज्जीला.. तोवर मी हे लाडूच सगळ मिश्रण एकत्र करून घेते." सारिका

"ओके मम्मा!" मायार चष्मा शोधते आणि सारिकाला आवाज देऊन सांगते. मम्मा..भेटला ग आज्जीचा चष्मा.."

"बर..देऊन ये जा आज्जीला आणि नीट पकड नाहीतर पडेल." सारिका

"ओके मम्मा.. मायरा चष्मा घेऊन आज्जीच्या खोलीत जाते आणि चष्मा आज्जीला देते.

"ए आज्जी.. तुला काही अजून हवं असेल तर आत्ताच सांग हं..कारण मी आत्ता मम्मा सोबत तिळाचे लाडू बनवायला बसणार आहे. तू सारखं आवाज देऊन डिस्टर्ब करू नको.. आणि तुला गंमत सांगू..मी ना आपल्या दोघींसाठी मिनी लाडू बनवणार आहे माझ्या त्या मिनी किचन सारखे!" मायरा हळूच आज्जीच्या कानात सांगत बोलली.

"हो का? बर बर..नाही करत हो डिस्टर्ब.. लाडू बनवून झाले की तुझ्या हाताने मला खाऊ घाल हो.."वत्सला ताई पण नातीच कौतुक करत बोलल्या.

"बर जाते मी आत्ता.. मम्मा वाट बघते खाली." मायरा दार खेचून घेत खाली यायला निघाली.

मम्माsssss

मायराचा आवाज ऐकून सारिका धावतच स्वयंपाक घरातून बाहेर
आली आणि वत्सला ताई त्यांच्या खोलीतून.

मायरा पायऱ्यांवरून खाली गटांगळ्या खात निपचीत पडली होती. तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता.

"मायुssss रक्तात भिजलेल्या मायरा ला पाहून सारिका किंचाळली"

"मायूsss" वरतून बघणाऱ्या वत्सला ताई पण ओरडल्या

दोघी पण धावतच मायरा जवळ गेल्या. सारीकाने मायराच डोकं आपल्या मांडीवर घेतल आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर चापट्या मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. वत्सला ताई पण सारखं मायू मायू आवाज देत तिला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या.

डोक्यातून खूप रक्तस्त्राव झाला असल्याने तिची शुद्ध हरपली होती. वत्सला ताईंनी लगेच सागरला फोन करून झालेला प्रकार सांगितला. सरिकाने ड्रायव्हरला सांगून कार काढायला लावली आणि दोघीही मायराला घेऊन हॉस्पिटलमधे पोचल्या.
सागर तिथे आधीच पोचला होता.
या दोघीची कार बघताच सागर धावतच कारपाशी गेला. लेकीला अस रक्ताच्या थारोळ्यात बघून क्षणभर तो कोलमडला पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं आणि स्ट्रेचरवर मायराला झोपवून तिला आय.सी.यू मधे नेण्यात आल.
*********

"माझी मायरा असती तर आणखी मजा आली असती ना? खरतर मी यायलाच नको होत. बीचारीचा चेहरा पण उतरला होता. माझच चुकल आपण नंतर यायला हवं होत." कियारा स्वतः शीच बोलत होती.

इतक्यात गिरिशचा फोन वाजला..

"काय? कधी..आणि कुठल्या हॉस्पिटलमधे आहे? बर बर निघतो मी लगेच.. स्क्युज मी...ऑर्डर कॅन्सल करा हा.. एक एमर्जन्सी आहे प्लीज.." गिरीश वेटर ला ऑर्डर कॅन्सल करत बोलला.

"काय झालं गिरीश? कुणाचा फोन होता?एवढ्या टेन्शन मधे का आहेस?" कियारा घाबरतच प्रश्न विचारते.

"मायू घरातल्या पायऱ्यांवरून पडली आहे. आय.सी. यू मधे आहे.. चल लवकर..." गिरीशने गाडीत बसता बसता सांगितल.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all