" गावात केळकर वाड्यासमोर ट्रॅफिक असणं मान्य आहे मृण्मयी, पण आयुष्याच्या वळणावर जेव्हा असं ट्रॅफिक जमतं ना, जिथे ना मागे जाता येतं ना पुढे... तेव्हा मात्र माणसाची खरी घुसमट होते."
अद्वैतने आपल्या चष्म्याची काच पुसत अतिशय शांतपणे हे वाक्य उच्चारले.
अद्वैतने आपल्या चष्म्याची काच पुसत अतिशय शांतपणे हे वाक्य उच्चारले.
समोर बसलेली मृण्मयी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. दाट झाडी असलेल्या भागातील त्यांच्या स्मृती निवास बंगल्याच्या बाल्कनीत बसून दोघे संध्याकाळचा चहा घेत होते. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती, पण अद्वैतच्या मनात मात्र विचारांचे एक वेगळेच वादळ घोंगावत होते.
" अहो, आज अचानक हे तत्वज्ञान कुठून सुचलं तुम्हाला ? आणि समीरच्या घरी जाऊन आल्यापासून तुम्ही असे शांत का आहात ?." मृण्मयीने चहाचा कप टेबलावर ठेवत विचारले.
अद्वैतने एक दीर्घ निश्वास सोडला.
अद्वैतने एक दीर्घ निश्वास सोडला.
तो आज सकाळीच त्याचा जिवलग मित्र समीरच्या तेराव्याला जाऊन आला होता. समीर... जो गेल्या तीन महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर होता. ज्याचे शरीर निर्जीव झाले होते, पण मशीनच्या घर घरी मुळे त्याचे हृदय धडधडत होते.
" मृण्मयी, आज समीरच्या घरी जे पाहिलं ना, ते पाहून काळजात चर्र झालं. शालिनीच्या डोळ्यांतलं पाणी आता आटलंय गं. पण त्या तीन महिन्यांत तिने आणि तिच्या मुलांनी जे भोगलं, ते कोणत्याही शत्रूच्या वाट्यालाही येऊ नये.
समीर तर गेलाच, पण जाता जाता त्याने त्या कुटुंबाची आयुष्यभराची पुंजी हॉस्पिटलच्या बेडखाली गाडून टाकली. आणि सर्वात वाईट काय होतं माहितीये? समीरला ते यंत्रांचं ओझं नको होतं, हे त्याच्या डोळ्यांतून दिसत होतं...
पण कोणाकडेच ते बंद करण्याचं धाडस नव्हतं. कारण तसा अधिकार समीरने कोणालाच दिला नव्हता." अद्वैतचे शब्द मृण्मयीला अस्वस्थ करत होते. तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला,
पण कोणाकडेच ते बंद करण्याचं धाडस नव्हतं. कारण तसा अधिकार समीरने कोणालाच दिला नव्हता." अद्वैतचे शब्द मृण्मयीला अस्वस्थ करत होते. तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला,
" अहो, जे झालं ते विसरा आता. नियतीच्या पुढे कोणाचं चालतं का ? आपण आपलं बघावं. ईशानीचं शेवटचं वर्ष आहे, तिच्या ॲडमिशनचं टेन्शन आहे आपल्याला..."
" हेच ! मृण्मयी, हेच तर मला सांगायचं आहे." अद्वैत खुर्चीतून उठून उभा राहिला.
" नियती आपल्या हातात नाही, पण नियतीने खेळ मांडायच्या आधी आपण आपली बाजू सावरू शकतो ना ?
मला सांग, उद्या जर माझ्यावर समीरसारखी वेळ आली, तर तू काय करशील ?
डॉक्टरांनी सांगितलं की अद्वैत आता कधीच शुद्धीवर येणार नाही, पण मशीन लावलं तर त्याचे श्वास सुरू राहतील... तेव्हा तू काय निर्णय घेशील ? "
मृण्मयीच्या हातातील चमचा खाली पडला. तिचे डोळे विस्फारले गेले.
मला सांग, उद्या जर माझ्यावर समीरसारखी वेळ आली, तर तू काय करशील ?
डॉक्टरांनी सांगितलं की अद्वैत आता कधीच शुद्धीवर येणार नाही, पण मशीन लावलं तर त्याचे श्वास सुरू राहतील... तेव्हा तू काय निर्णय घेशील ? "
मृण्मयीच्या हातातील चमचा खाली पडला. तिचे डोळे विस्फारले गेले.
" अहो ! काय हे अभद्र बोलणं ? तोंड सांभाळून बोला जरा. पुण्यात राहून सुशिक्षित माणसासारखं बोला. असं काहीही होणार नाहीये."
" होणार नाही असं म्हणणं म्हणजे वाळूत मान खुपसून बसण्यासारखं आहे मृण्मयी. मी आज ४५ वर्षांचा आहे. मी आज इन्शुरन्स काढलाय, घराचे हप्ते भरलेत, ईशानीच्या लग्नाची सोय करून ठेवलीये... हे सगळं कशासाठी ?
तर माझ्या पश्चात तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. मग माझ्या मरणाचा त्रास तुम्हाला का व्हावा ? मला मशीनवर खिळलेलं पाहून ईशानीने रडावं का ?
की तिने माझ्या अवयवांनी कोणाचं तरी आयुष्य वाचवावं ?
मला सांग, प्रेम कशात आहे ? मला विनाकारण जगवून ठेवण्यात, की मला सन्मानाने निरोप देण्यात ? "
तर माझ्या पश्चात तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. मग माझ्या मरणाचा त्रास तुम्हाला का व्हावा ? मला मशीनवर खिळलेलं पाहून ईशानीने रडावं का ?
की तिने माझ्या अवयवांनी कोणाचं तरी आयुष्य वाचवावं ?
मला सांग, प्रेम कशात आहे ? मला विनाकारण जगवून ठेवण्यात, की मला सन्मानाने निरोप देण्यात ? "
अद्वैतचा आवाज चढला नव्हता, पण त्यातली आर्तता मृण्मयीला छेदून जात होती. ती सुन्न झाली होती. पुण्याच्या त्या मध्यमवर्गीय चौकटीत 'मृत्यू' हा शब्दच मुळात अशुभ मानला जातो. तिथे 'इच्छा मृत्यू' किंवा 'उपचार नाकारणे' यावर बोलणे म्हणजे जणू काही पापच.
"मी ठरवलंय मृण्मयी." अद्वैत पुन्हा खुर्चीत बसला.
" मी माझं लिविंग विल तयार करणार आहे. कायद्याने मला हा अधिकार दिलाय की, जर मी स्वतः निर्णय घेण्याच्या स्थितीत नसेल, तर माझ्यावर कोणते उपचार करायचे आणि कोणते नाही, हे मी आजच लिहून ठेवू शकतो. मला मशीनचं आयुष्य नकोय, मला सन्मानाची शेवटची ओळ हवी आहे." मृण्मयीने आपले कान हाताने बंद केले.
" मला काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही वेडे झाला आहात. बाबांना हे कळलं तर काय म्हणतील ? समाज काय म्हणेल ? म्हणतील अद्वैतने मरण मागून घेतलं. लोकं नावं ठेवतील आपल्याला."
" समाज ? मृण्मयी, जेव्हा हॉस्पिटलचं बिल भरायची वेळ येते ना, तेव्हा समाज फक्त बाहेरून सहानुभूती दाखवतो. खिसा आपला रिकामा होतो. आणि मुख्य म्हणजे, तो देह माझा आहे. त्यावर हक्क माझा आहे. मी तुला आज हे का सांगतोय ?
कारण कायद्यानुसार मला एक प्रतिनिधी नेमावा लागणार आहे, जो माझ्या अनुपस्थितीत डॉक्टरांना माझं हे पत्र दाखवेल. आणि मला वाटतं, तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही, म्हणून तूच माझी प्रतिनिधी असावीस."
मृण्मयी उभी राहिली, तिचे डोळे ओलावले होते.
मृण्मयी उभी राहिली, तिचे डोळे ओलावले होते.
" कधीच नाही ! मी अशा कोणत्याही कागदावर सही करणार नाही ज्याने तुमचं आयुष्य कमी होईल. तुम्हाला काय वाटतं, मी स्वतःच्या हाताने तुमचं मरण बघू शकेन ? कधीच नाही अद्वैत, कधीच नाही ! "
ती रागात आणि दुःखात आतल्या खोलीत निघून गेली. अद्वैत बाल्कनीत एकटाच उभा राहिला. पावसाचा जोर वाढला होता. समोरच्या रस्त्यावर दिव्यांच्या रांगा लागल्या होत्या. पुणं आता रात्रीच्या शांततेकडे झुकत होतं, पण अद्वैतच्या घरात मात्र एका मोठ्या वादळाची नांदी झाली होती.
त्याने खिशातून एक छोटा कागद काढला, ज्यावर त्याने काही कायदेशीर मुद्दे लिहून ठेवले होते. त्याला माहिती होतं की हे युद्ध सोपं नाहीये. त्याला त्याच्या कुटुंबाशी, समाजाशी आणि त्या जुन्या विचारांच्या भिंतींशी लढायचं होतं. पण त्याचा निर्धार पक्का होता. त्याला त्याच्या कुटुंबाला एका अशा संकटातून वाचवायचं होतं, ज्याची कल्पनाही त्यांना आज करवत नव्हती.
बाहेर पावसाच्या थेंबांचा आवाज येत होता, आणि आत अद्वैतच्या काळजाची धडधड एकच सांगत होती.
" सन्मान हा फक्त जगण्यात नसतो, तो मरण्यातही असावा लागतो.”
" सन्मान हा फक्त जगण्यात नसतो, तो मरण्यातही असावा लागतो.”
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा