संरक्षण भाग एक

It's A Story Of One Lady Struggle

संरक्षण भाग एक.

नंदिनी तिच्या कुटुंबासोबत आज हॉटेलमध्ये जेवायला आली होती ते ही तिची इच्छा नसताना. त्याला कारणही तसेच होते कारण तिच्या नवऱ्याने काल वाट्टेल तसे बोलून तिला दुखावले होते आणि आज मुलाच्या इच्छेसाठी तो नंदिनीला घेऊन हॉटेलमध्ये आला होता. पण नंदिनीची मात्र त्याच तोंड बघण्याची ही इच्छा नव्हती. पण तिचा मुलगा अभिषेक तिच्यासाठी सगळं काही होता आणि त्याची इच्छा नंदिनी मोडू शकत नव्हती. बाईक हॉटेल बाहेर थांबली तशी मुलाच्या हाकेने नंदिनी भानावर आली आणि खाली उतरली. तेवढ्यात तिचा अभिषेक खाली उतरून थेट हॉटेलच्या दिशेने धावत सुटला, त्याच्या मागे नंदिनी पण धावली कारण अभिषेक जेमतेम सहा वर्षांचा होता आणि खूपच धडपडा होता त्यामुळे ती ही त्याला आवाज देत धावत होती. तिचे सगळे लक्ष अभिषेककडेच होते धावण्याच्या नादात तीचा धक्का कोणालातरी लागला. नंदिनी जरा वेगात धावत असल्याने धक्का जरा जोरातच बसला आणि समोरची व्यक्तीही घाईत पुढे जात असल्याने टक्कर जोरात बसली. तशी नंदिनी मागे तोल जाऊन पडणार तेवढ्यात त्या व्यक्तीने तिच्या कमरेत हात घालून तिला दुसऱ्या हाताने स्वतःकडे खेचले. नंदिनीला काही कळण्याच्या आत हे घडले आणि समोरच्या व्यक्तीला तिने पाहिलं तर आश्चर्याने ती आवक झाली.

जवळपास वीस वर्षांनी ती त्याला पहात होती. इतक्या वर्षांनी त्याला अचानक असे समोर पाहिल्यावर तिच्या काळजाचा ठोका काही क्षण चुकला. आजही त्याच्या डोळ्यात तेवढीच चमक होती शिवाय त्याची भेदक आणि समोरच्याला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखण्याची कला तशीच टिकून होती. तो ही तिच्या नजरेत हरवला होता आणि चेहऱ्यावर हलकीच स्माइल आणून तिच्याकडे पहात होता. अभिषेकच्या आवाजाने ती भानावर येत पटकन बाजूला झाली. तेवढ्यात कुणाल म्हणजेच नंदिनीचा नवराही गाडी पार्क करून आला.

कुणालने समोरच्या व्यक्तीला पाहिले आणि तो पटकन त्यांना शेक हॅण्ड करत म्हणाला, अरे सर तुम्ही इथे ?? खूप छान वाटले तुम्हाला भेटून, खरतर मी इथे माझ्या फॅमिली सोबत डिनरसाठी आलो होतो. तुम्ही पण आम्हाला जॉईन केलत तर मला खूपच छान वाटेल हो ना नंदिनी ?? कुणालने नंदिनीकडे बघत विचारले तसे सरांनी नंदिनीकडे पाहिले आणि नंदिनीने सरंकडे. दोघांची पुन्हा नजरानजर झाली आणि नंदिनी किंचित हसून फक्त हो म्हणाली तसे सर गालात हसले. कुणाल सरांकडे पाहून म्हणाला, अरे सॉरी मी तुमची ओळख करून द्यायचे विसरलो. ही माझी बायको नंदिनी. तसे सरांनी नंदिनीकडे पाहिले आणि हात पुढे करत म्हणाला, नाइस टू मीट यु मिसेस नंदिनी, नंदिनीने ही हात पुढे केला आणि सेम टू यू म्हणाली तसा निरजने तिचा हात घट्ट पकडला त्यामुळे नंदिनीने त्याच्याकडे चमकून पहिले आणि त्याने हसुन तिचा हात सोडला. आणि हे माझे सर मिस्टर निरज. खरतर सर माझ्याच वयाचे असतील पण यांचे इथे काही व्यवसाय पण सुरू आहेत आणि नोकरी पण. खूप लहान वयात मोठे यश मिळवले सरांनी. कुणालच्या या बोलण्यावर निरज म्हणाला कुणाल तू मला माझ्या नावाने हाक मारली तर चालेल मला आता आपण ऑफिस मध्ये नाहीत त्यामुळे तेच बरं पडेल.

आई, बाबा चला ना लवकर जेवायला मला भूक लागली आहे म्हणत अभी नंदिनी आणि कुणालचा हात पकडून ओढत नेऊ लागला तसे सगळेच हसत आत गेले.

निरज नंदिनीच्या एकदम समोर बसला होता. त्याचे सगळे लक्ष नंदिनीकडेच होते. नंदिनी मात्र अभी सोबत खेळण्यात आणि बोलण्यात गुंग होती आणि तिला अभी सोबत लहान होताना पाहून निरज तिच्यात पूर्ण हरवून गेला होता. कुणालने काय काय ऑर्डर द्यायची हे विचारले तेंव्हा प्रत्येकाने आपली ऑर्डर सांगितली आणि अभी धावत कुणालकडे गेला. थोड्याच वेळात ऑर्डर आली आणि सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. नंदिनीचे मात्र जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हते. निरजच्या लगेच ते लक्षात आले आणि त्याने खाकरून नंदिनीचे लक्ष वेधून घेतले आणि डोळ्यांनीच खून करून तिला नीट जेव असे सांगितले. तेंव्हा तिला आठवले की लहानपणी पण निरज असेच मला सगळ्यांसमोर खूनवून नीट जेवायला लावत असे आणि नाही ऐकले तर डोळे मोठे करून बघत असे आणि त्यामुळे नंदिनी पोटभर जेवत असे. त्यामुळे आताही ती खाली मान घालुन जेवायला लागली.

थोड्या वेळात जेवणं आतपली आणि बाहेर आल्यावर कुणालने विचारले तुमची फॅमिली इथे कधी येणार आहे ?? आणि कोण कोण असते तुमच्या फॅमिली मध्ये ?? तसे निरज नंदिनीकडे बघत म्हणाला, माझी बायको, दोन मुले आणि मी. निरज पुढे म्हणाला, आता माझी बायको गावाला गेली आहे ती आली की सामान घेऊन फ्लॅट मध्ये शिफ्ट होईन मी. तेंव्हा भेटूच. यातील भेटूच या शब्दावर जोर देऊन त्याने नंदिनीकडे पाहिले आणि तो निघून गेला.

नंदिनी अंथरुणावर पडली होती खरी पण काही केल्याने निरजचे विचार तिच्या डोक्यातून जात नव्हते. आज इतक्या वर्षांनी निरज असा तिला भेटेल आणि तो तिच्याच नवऱ्याचा बॉस म्हणून समोर येईल याची कल्पना ही तिने स्वप्नात केली नव्हती. पण तेच प्रत्यक्षात घडले होते. बराच वेळ विचार करून शेवटी नंदिनी थकली आणि झोपी गेली.

नंदिनी नुकतीच तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली होती. तिच्या नवऱ्याने अभिषेकसाठी फ्लॅट घेतला होता. सोसायटी तशी छान होती, एरिया चांगला होता पण घराचे स्त्रकचार मात्र नंदिनी ला आवडले नव्हते आणि त्याच्याशी कुणालला खरं तर काही घेण देण नव्हतेच. त्याने फ्लॅट घेण्या आधी फॉर्मलिटी म्हणून नंदिनी ला दाखवले होते बाकी कोणत्याच व्यवहारात तिला गृहीत धरले नव्हते आणि तशी अपेक्षा ही खरतर नंदिनी ला नव्हती. नंदिनी तिच्या अभी ला पार्किंग मध्ये खेळायला घेऊन आली होती तेंव्हा तिच्या सेक्युरिटी गार्ड ने तिला सांगितले होते तुमच्या शेजारचा टू bhk फ्लॅट भाड्याने गेला आहे आणि थोड्याच दिवसात तिथे राहायला येत आहे ते लोक. हे ऐकून तर नंदिनी ला खूप आनंद झाला होता कारण तिला कोणीतरी शेजारी आल्यामुळे छान शेजार मिळणार होता आणि अधून मधून त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारण्याची इच्छा पूर्ण होणार होती. शिवाय अभी पण माणसांना लागून असल्याने जितके लोक असतील तितके त्याला बरे वाटत होते. शिवाय येणाऱ्या बिऱ्हाड च्या घरी लहान मुले असल्याचे सेक्युरीतटी गार्ड ने सांगितल्यामुळे अभिला खेळायला कोणीतरी मिळणार म्हणून दोघेही खुश होते.

काही दिवस असेच निघून गेले आणि नंदिनी काम करत असताना तिच्या शेजारच्या फ्लॅट मध्ये माणसांची कुजबुज आणि सामानाचे आवाज आला तसे तिला वाटले चला आता आले वाटत शेजारी. अभीला शाळेतून आणण्याची वेळ झाली होती म्हणून घरातली कामे आटपून घाईघाईने नंदिनी बाहेर पडली तर बाहेर एक बाई दोन मुलांसह फ्लॅट मध्ये सामान चेक करत होती. तिची आणि नंदिनी ची नजरा नजर झाली तशा दोघीही एकमेकींकडे पाहून हसल्या. नंदिनी लिफ्ट कडे वळली तर पुन्हा क्षणभर तिथेच थांबली. समोरून येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून निरज होता. त्याने नंदिनी ला पाहिले आणि म्हणाला हॅलो नंदिनी तू ईथे कशी?? त्याच्या प्रश्नाने भानावर येत नानदिनी म्हणाली मी इथे या फ्लॅट मध्ये रहाते, समोरच असणाऱ्या फ्लॅट कडे तिने बोट दाखवले आणि निरज एकदम आनंदाने म्हणाला, अग काय योगायोग आहे हा मी एकदम तुला चीतकुन च फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट इथे मी आताच शिफ्ट करतोय नाज सामान. तेवढ्यात त्याची बायको ही बाहेर आली आणि तिने विचारले, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का ?? त्यावर नंदिनी काही बोलणार इतक्यात निरज म्हणाला, मी ज्या ऑफिस मध्ये काम करतो ना तिथे मला असिस्टंट असणाऱ्या कुनालची वाइफ आहेत या. मिसेस नंदिनी आणि मिसेस नंदिनी ही माझी बायको, अंकिता. नंदिनी ला समजले नाही निरज ने तिची ओळख का लपवली ?? हॅलो नंदिनी, तुझ्या बद्दल थोड फार ऐकलं होत तेंव्हा पासूनच तुला भेटायची इच्छा होती पण आज पूर्ण झाली. अंकिता च्या बोलण्यामुळे नंदिनी भानावर आली आणि ती म्हणाली, हो मलाही खूप छान वाटले तुला भेटून. आता मी जरा घाईत आहे, मला अभिला शाळेतून आणायला जायचे आहे मी आले की भेटू, तुला सामान लावायला काही मदत हवी असेल तर नक्की सांग मी करेन. नाही,सामान लावायला मदत नका करू पण हा संध्याकाळी गप्पा मारायला नक्की या अंकिताच्या या बोलण्यावर हो म्हणून नंदिनी निघाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all