संरक्षण भाग दोन

It's A Story Of Lady Struggle
संरक्षण भाग दोन.

निरजला येऊन आठवडा झाला होता. पण तेवढ्यात अंकिता आणि नंदिनी ची छान मैत्री झाली होती. तर अभी निरज च्या दोन मुलांसोबत छान मिक्स झाला होता. अंजली आणि आयुष ही निरज ची दोन मुले सतत अभी सोबत खेळत होती आणि एकमेकांच्या घरात धुडगूस घालत होती. अभीच्याच शाळेत घातले होते अंजली आणि आयुष ला. अंजली तर नंदिनी ची लाडकी झाली होती. अंजली सतत नंदिनी आंटी म्हणत तिच्या मागे पुढे फिरत होती आणि नंदिनी ला पण मुलींची आवड असल्यामुळे ती पण अंजली वर खूप प्रेम करत होती. मुलांना सांभाळत नंदिनी आणि अंकिता दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवत, काहीही खायला केले तरी दोघी एकमेकींना सोडून खात नव्हत्या. एक फॅमिली सारख्या रहात होत्या दोघीही.

अशातच अजून काही दिवस गेले आणि नंदिनी नेहमी प्रमाणे मुलांना शाळेत सोडून सरळ अंकीताच्या घरात जाण्यासाठी दारात उभी होती. तिने बेल वाजवली तर दार निरज ने उघडले. आज पहिल्यांदाच असे झाले होते कारण निरज रोज सकाळी लवकर ऑफिस मध्ये जात होता तेंव्हा च नंदिनी अंकिता कडे येत होती. एव्हाना निरज च्या पण ते लक्षात आले होतेच पण त्याची आणि नंदिनी ची भेट न झाल्याने त्याने बोलून दाखवले नव्हते इतकचं. अरे नंदिनी, तू ये ना आत, म्हणत तो जरा बाजूला झाला पण नंदिनी दारातच थांबली.
नाही नको, अंकिता नाही का घरात ?? नंदिनी.
अग काय झालं आज सकाळी मी गेलो होतो ऑफिस मध्ये पण अचानक जरा अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे पुन्हा घरी आलो, येता येता डॉक्टर कडे गेलो होतो पण मला खूपच अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे औषधे न घेताच परत आलो. आता अंकिता तेच आणायला गेली आहे येईलच इतक्यात पण तू ये ना अशी दारातच का उभी ?? निरज.
त्याच्या या बोलण्यावर नंदिनी म्हणाली, मी येईन नंतर तू आराम कर, परत भेटेन अंकितला तसेही नेहमीच्या गप्पा मारायला आले होते मी म्हणून नंदिनी वळली तसा निरज ने तिचा हात पकडला. त्याचा इतक्या वर्षांच्या स्पर्शाने नंदिनी चे अंग मोहरुन निघाले पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत सांगितले मी येईन परत निरज प्लीज मला जाऊदे. अजूनही ती त्याला पाठमोरी च होती. तिच्या या बोलण्यावर निरज म्हणाला तू काय शपथ घेतली आहेस का मी नसताना च माझ्या घरचा उंबरठा ओलांडनार अशी ?? तिचा हात ओढत तिला स्वतःकडे वळवून निरज ने तिला विचारले आणि तिला काहीच बोलू न देता सरळ घरात ओढून घेतले.

नंदिनी ला हे सगळे नवे नव्हतेच. लहानपणी ही निरज असेच तिला हात धरून ओढून घेत होता आणि डोळ्यात डोळे घालून बोलत होता म्हणूनच तर निरज नसताना च नंदिनी अंकीतला भेटायला येत होती. आजही तसेच घडले होते पण फरक इतकाच होता की हे तब्बल पंधरा वर्षांच्या मोठ्या काळानंतर घडले होते. एका तपापेक्षा ही जास्त काळ लोटला होता आणि त्यावेळी नंदिनी आणि निराजला पण इतक्या वर्षांच्या काळाने असे भेट होईल असे वाटले नव्हते. नेहमी प्रमाणे निरज नंदिनी च्या डोळ्यात पहात होता आणि नंदिनी त्याच्या डोळ्यात पाहून स्वतःला हरवून गेली होती. बऱ्याच वेळाने ती भानावर आली आणि स्वतःचा हात तिने सोडवून घेतला. तिची घालमेल पाहून निरजला खरे तर हसू येत होते तिच्याकडे पाहून तो म्हणाला लहानपणी भांबावून जात होतीस आजही अगदी तशीच भांबावलीस तू नंदू. निरज च्या तोंडून नंदू अशी हाक ऐकून नंदिनी चे डोळे पाणावले आणि निराजच्या ते चांगलेच लक्षात आले. तू तुझ्या संसारात सुखी आहेस ना नंदू ?? त्याने तिचे दोन्ही खांदे पकडुन तिला स्वतः समोर उभे करत तिच्या डोळ्यात बघत विचारले. आता मात्र नंदिनी ला काय उत्तर द्यावे समजले नाही कारण निरज ने तिची दुखरी नस बरोबर पकडली होती आणि तिला हेच तर नीरजला समजू द्यायचे नव्हते पण निरज ला न सांगताच अनेक गोष्टी आजवर समजल्या होत्या आणि हे सत्य ही समजणार याचीच नंदिनी ला भीती होती. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत निरज म्हणाला हरकत नाही नंदू, तुला हवा तेवढा वेळ घे पण तुझ्या तोंडून सगळं ऐकण्याची वाट पाहतोय मी. बरं जाऊदे ते सगळं आपण कॉफी घेत गप्पा मारुया का ?? अंकिता येई पर्यंत मी कॉफी बनवतो मग तुम्ही गप्पा मारा. नाही मला नको कॉफी आणि तुला हवी असेल तर मी देते करून तुला बरं वाटत नाही ना ?? नंदिनी च्या या बोलण्यावर निरज म्हणतो, म्हणजे तुला अजूनही माझी काळजी वाटते तर नंदू ?? त्यात काळजीच काय आहे, आता तूच म्हणालास ना, बरं वाटत नाही म्हणून मी म्हणाले. त्यांचं बोलणं सुरु असतानाच अंकिता येते आणि समोर नंदिनी ला पाहून खुश होते आणि निरज च्या हातात गोळ्या देत म्हणते, तुम्ही गोळ्या घेऊन आराम करा आम्ही गप्पा मारत बसतो. त्यावर निरज गोळ्या घेतो आणि कॉफी करायला सांगून निघून जातो.

नंदिनी तिच्या घरात निवांत बसलेली असताना तिला बँकेतून फोन येतो, जिथून तिच्या नवऱ्याने घरासाठी लोन घेतले होते. ते बँकेतील लोक हफ्ते बाकी असल्याचे सांगून फोन ठेवतात आणि नंदिनी ला खूप धक्का बसतो. घराचे हफ्ते पेंदिंग असल्याचे कुणाल तिला एका शब्दाने ही सांगितले नव्हते खर तर त्याच्याकडून हे अपेक्षित नव्हतेच पण तरीही नात्यात निदान व्यवहार तरी पारदर्शी असावा. तो व्यवहार अंगाशी येत आहे अशी परिस्थिती असताना तरी. पण तरीही कुणाल काहीच न झाल्यासारखे घरात हसून खेळून कसा वावरत होता याचाच विचार नंदिनी करत असताना कुणाल घरात आला होता तेंव्हा नंदिनी ने सगळे कुणाल ला विचारले होते पण त्याने सराईत पने खोटे बोलून वेळ मारून नेली होती. तो खोट बोलत आहे याची नंदिनी ला स्पष्ट कल्पना आली होती पण बोलून काहीही फायदा होणार नाही हे ही तिला कळून चुकले होते. त्यात कुनालचा नालायक पने म्हणजे त्याने केलेल्या चुकीच्या व्यवहाराचे खापर नेहमी प्रमाणे त्याने नंदिनी वर फोडले होते आणि तुझी इच्छाच नव्हती हे घर घेण्याची म्हणून असे झाले असे बोलून तो मोकळा झाला होता. त्याच्या या आरोपाचा आणि खोटे पणाचा नंदिनी ला विलक्षण संताप आला होता पण प्रत्येक वेळी मुलासाठी ती गप्प राहिली होती. पण तो घराच्या व्यवहाराचे असा खेळ करेल असे नंदिनी ला स्वप्नातही वाटले नव्हते.

रात्रभर नंदिनी नीट झोपू शकली नव्हती. तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. अभी ला शाळेत सोडून ती सरळ मंदिरात जाऊन बसली होती. कारण तीच एक अशी जागा होती जिथे तिला बोलता येत होते आणि बोलून शांत वाटत होते. बराच वेळ बसून राहिल्यावर तिला आठवले आज तिने आई बाबांची खुशाली विचारली नाही आणि स्वतःची ही कळवली नाही. पण तिच्या आवाजावरून तिच्या घरच्यांना तिची मानसिकता लगेच लक्षात येत असल्याने तिने शक्य तितक्या नॉर्मल आवाजात बाबांची विचारपूस केली पण आईशी बोलताना मात्र तिचा संयम सुटला आणि तिने सगळे काही आईला सांगितले. आईने तिला खूप समजावले आणि देवावर हवाला टाकून मोकळी होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ती थोडी शांत झाली पण कुनालचे आरोप तिच्या डोक्यातून जाता जात नव्हते. पण आता अभी ची शाळा सुटण्याची वेळ झाली म्हणून ती घराकडे निघाली आणि अभी ला घेऊन घरी आली. आज नंदिनी चे मन कशातच लागत नव्हते. नंदिनी आणि कुणाल चे नाते फारच डगमगले होते. त्यांच्या नात्यात विश्वास, प्रेम या नात्याला आवश्यक गोष्टी नव्हत्याच शिवाय हे वाद पण सतत चे होते तरीही नंदिनी ला त्याचे बोलणे नेहमी मनाला लागत होते कारण तो मनाला लागेल असेच आणि खोटे आरोप करत आला होता त्यामुळे नंदिनी स्वतःचे मन मारत होती, रडत होती, त्रास करून घेत होती पण कुणाल मात्र कशाचाच फरक पडत नसल्याने मस्त रहात होता. अभी आज त्याच्या मित्रांसोबत म्हणजे अंकिता च्या मुलांसोबत खेळायला गेला होता.

🎭 Series Post

View all