जरा दिवसभर आराम नाहीं, घरात मोलकरीण ठेवली आहे ना, करेल ती कामे एकटीच सर्व अशी बडबड करत अस्मिता स्वतःशीच बोलत होती. नवऱ्यावर कधी न निघणारा राग नेहमी असा ती एकटी असली कि बडबड करत बोलत असे.
आदेश बाहेर कुणाशी तरी फोनवर बोलत हसत होता. त्याचे ते हसणे ऐकुन अस्मिता अजून जास्तच चिडली, तेवढ्यात आदेश घरात येऊन बोलला अगं अस्मिता आज ऑफिस मधले कलीग संध्याकाळी आपल्या घरी जेवायला येणार आहेत. अस्मिता फक्त हो म्हणाली. आणि थोड्या वेळाने जेवणाच्या तयारी ला लागली.
ऑफिस कलीग आले, मस्त जेऊन गेले. वहिनी काय छान चव आहे तुमच्या हाताला, वहिनी ह्या मटार पनीर चीं रेसिपी पाठवा हा, मग मी हि घरी जाऊन बायकोला सांगेन करायला. अशा सर्व गोष्टी चालल्या होत्या.
नवरा कधी सुंदर होते आज जेवण असे चांगले बोलत नाही, त्याचे मित्र तरी कौतुक करतायेत ऐकुन अस्मिता ला छान वाटलं.
लग्नाला दोन वर्ष झाली होती. वर्ष छान गेलं पण मग नंतर मात्र आदेश ने स्वतःला कामात अडकवून घेतले.
एवढ्यात फोनची रिंग वाजली. अस्मिता च्या आईचा कॉल होता, अस्मिता सर्व आईला सांगू लागली, आज आदेश चे ऑफिस मधले मित्र जेवायला आले होते वैगरे, त्यावर आई म्हणाली अरे वा छान चं तर अस्मिता आई वर चिडली आणि म्हणाली अगं तू मस्त काय म्हणतेस मी एकटीच इथे राबतेय दिवसभर. त्यावर आई ने हसून फोन ठेवला.
दोन दिवसांनी अस्मिता चा वाढदिवस होता खरतर त्या दिवशी आदेश ने अस्मिता ला वेळ द्यायला हवा होता. पण तो त्याच दिवशी शहराच्या बाहेर गेला होता. ऑफिसची एक महत्त्वाची मीटिंग होती. म्हणून त्याला जावे लागणार होते.
तेव्हा अस्मिता चा पारा जरा जास्तच चढला. खूप भांडण केले तिने आदेश बरोबर त्यादिवशी पण तरीही तो निघून गेला. तो दिवस अस्मिता नाराज चं होती आदेश ने नंतर दोनदा फोन केला पण अस्मिता जास्त बोललीच नाहीं त्याच्याशी.
अस्मिता ला वाटत होत, आदेश ने तीला वाढदिवसाच्या दिवशी छान हॉटेलमध्ये घेऊन जावं , छान गिफ्ट द्यावं, पण आदेश ने त्या दिवशी तो बाहेर जाणार आहे हे जेव्हा पासून सांगितलं तेव्हापासून अस्मिता चा मूड चं गेला होता.
वाढदिवसाच्या दिवशी अस्मिता एकटीच घरी असल्यामुळे बिग बाजार ला सामान घ्यायला गेली. तिथे आदेश च्या ऑफिस मधली कविता तीला भेटली. काय ग अस्मिता कशी आहेस? असं ती बोलू लागली, किती महिन्यांनी दिसतेस? चल ये इथेच नाश्ता च्या हॉटेलमध्ये बसू, खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी.
आहेस कुठे मेसेज पण करत नाहीस मोबाईल नंबर असून पण असा कविता म्हणू लागली. अस्मिता म्हणाली , घरातल्या गोष्टीतून वेळच मिळत नाही.
आदेश नेहमी ऑफिस मध्ये तुझं कौतुक करत असतो. नेहमी बोलत असतो हे करते अस्मिता ते करते, घरातले एवढे करून पण कधी बोलून दाखवत नाही.
अस्मिता साठी नवीन मोठं घर घ्यायचे आहे. तिला छान सुखात ठेवायचं आहे, म्हणून तर एवढा काम करून प्रमोशनच्या मागे लागलोय. जेणेकरून मोठं घर घेता येईल. जगातील सर्वात सुंदर स्वयंपाक माझी बायको करते तिच्या हाताची चव कुणालाच येणार नाही असे नेहमीच तुझ्याबद्दल ऑफिसमध्ये बोलत असतो.
त्याचे हे सर्व बोलणे ऐकुन आम्हाला तुझाच राग येतो एवढी कशी लकी ग तू? की एवढं तुझ्याबद्दल भरभरून बोलणारा नवरा तुला मिळाला. नाहीतर आमचे नवरे कधी कौतुक पण करत नाही.
खूप लकी आहेस तू अस्मिता . अस्मिता विचार चं करत राहिली किती चुकीचे समजत होतो मी आदेश ला ? का वागली मी त्यासोबत अशी? सर्वच बाबतीत मी स्वतःला दोष देत होते.
कधी विचार करता करता अस्मिता चीं पावले घराकडे वळली ते तिलाही कळले नाही. एव्हाना आदेश चे अनेक कॉल मेसेज मोबाईलवर येऊन गेले होते.
घरी पोहोचताच एक कुरीयर बॉय अस्मिता च्या घरा समोर उभा होता. मॅडम तुमच कुरिअर असं बोलला.
अस्मिता ते पार्सल घेऊन घरात आली . काय असेल ह्यात? आदेश ने काही पाठवले नसेल ना? म्हणून बॉक्स उघडून पाहिला आणि ती चकित चं झाली.
आदेश ने गिफ्ट म्हणून 1 बॉक्स अस्मिता ला पाठवला होता. ही तीच साडी होती जिच्यासाठी तिने सहा महिन्यापूर्वी एकदा आदेश कडे हट्ट केला होता. पण खूप महाग असल्याने तो नाहीं म्हणाला होता तीला.आणि सोबत एक पत्र देखील होत.
.अस्मिता खरतर मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तू आहेस. तू आपला संसार असा काही छान सांभाळतेस कि मला त्यात डोकावण्याची कधी गरजच भासली नाही. म्हणूनच मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकलो. मागील दोन वर्षात माझी जी काही प्रगती झाली आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे.
खरतर पत्र लिहतोय म्हणून मलाच हसू येतेय पण काय करणार माझी बायको रुसली आहे ना म्हणून हे असे बोलावे लागत आहे.
आणि हो हि साडी आठवतेय ना? तुला खूप आवडली होती पण मी घेऊ शकलो नव्हतो. खरतर खूप म्हणजे खूप वाईट वाटलं होत मला त्या दिवशी. तुझ्यासाठी एवढेही करू शकत नव्हतो मी. मला सॉरी सुद्धा म्हणायचं आहे तुला? खूप कमी वेळ देतोय ना मी हल्ली तुला? पण फक्त काही महिने एकदा का हे प्रमोशन मिळाले कि - मग माझ्याकडुन तुला कोणतीच तक्रार नसेल.
पत्र वाचून झाल्यावर अस्मिता च्या डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर पडत होते. अस्मिता च मनोमन म्हणाली खरं आहे तुझं आदेश हा - संसार - आपल्या दोघांचा आहे.
नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )
.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा