संसार भातुकलीचा भाग ६(अनोखी प्रेम कथा)

अधुरी प्रेम कहाणी
विक्रांतला फक्त अर्पिता महत्वाची होती तिचा भूतकाळ नाही ज्यात तिचा काहीच दोष नव्हता. मोजक्याच माणसात विधिवत दोघांचं लग्न झालं. गणपत आणि माझी मैत्री आणखी एका नात्यात घट्ट बांधली गेली. माझ्या लेकीचा सुखाचा संसार व्हावा इतकंच वाटत होत. प्रत्येक बापाची इच्छा असते लेकीचा संसार सुखाचा व्हावा. अर्पिताने काम सोडलं आणि संसारात रमली.

दोन वर्षांनी अर्पिताला दिवस गेले. मी आजोबा होणार कळताच लागलीच तिला भेटायला आलो. विक्रांतची आई त्यांच्या सोबत रहायला आली. अर्पिताचे सगळे लाड..तिचे डोहाळे सगळ काही वहिनींनी अगदी आई असल्या प्रमाणे पुरवले. माझी लेक आई होणार होती. खूप खुश होतो आम्ही सगळे. डोहाळे जेवण होत त्याच दिवशी अचानक अर्पिताच्या पोटात दुखू लागलं. आम्ही तातडीने तिला दवाखान्यात नेल आणि..पुढे जे नको होत तेच घडलं..

************

"डॉक्टर..अर्पिता कशी आहे?" विक्रांतने विचारलं.

विक्रांतची पाठ हळुवारपणे थोपटत डॉक्टर म्हणाले.

"त्यांना भेटून घ्या. त्यांच्याकडे फार वेळ नाही पण तरी त्यांना आता सगळ्यात जास्त तुमची गरज आहे..आणि हो..तुम्हाला मुलगी झाली बर..जा.. आत जाऊन तुमच्या पत्नीला भेटून घ्या." डॉक्टर म्हणाले.

आमचे पायच जड झाले. आम्ही सगळे आतमध्ये गेलो.. एवढंस ते छोटंसं बाळ..डोळे बंद करून निवांत होत..पुढे काय होणार आहे हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हत. माझी लेक कितीवेळ आमच्याशी बोलणार आहे काहीच माहिती नव्हत. डॉक्टरांनी मोजक्या शब्दात जे सांगितल होत ते घडू नये असच वाटत होत.

आम्हाला सगळ्यांना बघून अर्पिता रडू लागली. तिचा श्वास वाढू लागला . तोंडाला लावलेलं मास्क एका हाताने काढून तिने विक्रांतकडून वचन घेतल.

**************

"विक्रांत.. ए विक्रांत..इकडे बघ. हे बघ..माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मला वचन दे.. वचन दे विक्रांत..तू आपल्या मुलीचा नीट सांभाळा करशील. मी आईविना वाढलेली आहे त्यामुळे आईच प्रेम कधीच वाट्याला आल नाही, पण माझ्या लेकीला आईविना मोठी करू नको. विक्रांत...मी गेल्यानंतर पुन्हा लग्न कर. आपल्या लेकीला आई घेऊन ये आणि तुला जीवन संगिनी.. " त्याच्या गालावरून हात फिरवत अर्पिता म्हणाली.
आम्हाला अश्रू अनावर झाले. विक्रांत तिचा हात घट्ट पकडुन आम्हाला सोडून कुठेही जाऊ नको म्हणून तिला विनवू लागला.

आमच्याकडुन पण तिने हेच वचन घेतल. इवल्याश्या त्या परीला जवळ घेऊन तिने तीच नाव ठेवलं... शिवंण्या..आणि मग अखेरचा श्वास घेतला. विक्रांतच्या हातातून तिचा हात निसटला..कायमचा.. एवढा वेळ शांत निजलेली शिवू अचानक रडायला लागली. विक्रांत चक्कर येऊन पडला. दोन दिवस शुद्ध नव्हती त्याला. आम्ही अर्पिताची बॉडी दोन दिवस शवागारात ठेवून घ्यावी म्हणून डॉक्टरांना विनंती केली. दोन दिवसात जर विक्रांतला शुध्द आली नाही तर आम्ही तिचे अंतिम कार्य करू अस सांगितलं पण दोन दिवसांनी विक्रांत शुद्धीत आला. शिवूला जवळ घेत त्याने तिचे पटापट मुके घेतले. तिला छातीशी कवटाळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आम्ही अर्पिताची बॉडी ठेवून घेतली आहे अस त्याला सांगितल आणि शेवटचे विधी करायचे बाकी आहेत हे सांगून काही वेळासाठी विक्रांतचा डिस्चार्ज मागितला. एक नर्स आणि वॉडबॉय सोबत पाठवून त्यांनी विक्रांतला सोडलं. अर्पिता वर शेवटचे संस्कार मी आणि विक्रांतने केले.

मी आणि गणपत घरी गेलो. वहिनी मात्र विक्रांत आणि शिवुला सोबत घेऊन हॉस्पिटलमधे गेल्या. आईच दूध नसल्यामुळे शिवुला कावीळ झाली. तिला ऍडमिट केलं. विक्रांतच्या बाजूलाच शिवुला ठेवलं.
हिरव्या रंगाच्या लाईट खाली आपली शिवू होती. पाहिलं होतस ना तू!" डोळ्यातले अश्रू पुसून एक नजर अर्पितावर टाकत मधुकरराव म्हणाले.


"हो काका, नुकतच स्वतःच बाळ गमावलं होत मी. वंशाचा दिवा खाल्लास. कैदाशिन आहेस तू औदसा कुठली असे नको नको ते बोलून सासरच्यांनी मला नाकारलं. दुधाने गच्च झालेली छाती..आईच्या दुधासाठी तडपडणारी शिवू..मला माझ मातृत्व शिवू कडे घेऊन गेलं. क्षणाचा विचार न करता मी तिला छातीशी लावलं आणि आम्ही दोघीही तृप्त झालो. जे झालं त्यामुळे मी विक्रांतची माफी मागितली होती पण त्याने तर काही दिवस आमच्या सोबत राहाल का अशी विचारणा केली. माझ्या आईबाबांनी लगेच होकार दिला कारण तिला माझी अवस्था समजत होती." अर्पिता म्हणाली.


"हो, त्यानंतर आम्हाला तुझ्यासोबत काय घडलं हे समजल. अर्पिताचे दिवस कार्य होते त्या दिवशी तिच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. विक्रांतने पिंडासमोर हात जोडून मी दुसर लग्न करेन अस वचन दिलं. तुझे आईबाबा सुद्धा त्यावेळी तिथे हजर होते. अचानकपणे त्यांनी तुझ्या सोबत लग्न करणार का अस विचारल. वेळ न दवडता विक्रांतने सुद्धा होकार भरला.


"हो, चांगलच आठवत मला. मी पुरती गोंधळले होते. बाबांनी अचानक लग्नासाठी विचारणा केली आणि विक्रांत सुद्धा हो म्हणून तयार झाला." अर्पिता म्हणली.


"ते पण एका अटीवर!" गॅलरीत जात मधुकरराव म्हणाले.


"हो..आहे लक्षात. ' मी माधुरी सोबत दुसर लग्न करायला तयार आहे. बायकोचं स्थान तिला मी द्यायला तयार आहे. माझ्या मुलीची आई म्हणून मी माधुरीचा स्वीकार करतो.' अस म्हणताच अर्पिता ताईंच्या पिंडाला कावळा शिवला.


" आणि अर्पिताचे दिवस कार्य झाल्यानंतर तुझी आणि तुझ्या पहिल्या नवऱ्याची घटस्फोटाची फाईल स्वतः विक्रांतने पुढे केली होती. सहा महिन्यांच्या कालावधी नंतर तुमचा घटस्फोट झाला."मधुकरराव म्हणाले.


"घटस्फोट घेतल्यानंतर पुढच्या तीन दिवसातच आमच लग्न झालं आणि अर्पिता ताईंच्या फोटो समोर उभ राहून शपथ घेतली मी. तुमच्या लेकीचा सांभाळ माझी लेक म्हणूनच करेन. विक्रांतने सुद्धा माझ माधुरी नाव बदली करून अर्पिता ठेवलं. त्याला त्याच्या आयुष्यातून अर्पिता ताईंना कधीच वजा होऊ द्यायचं नव्हत. मनाविरुद्ध असल तरी मी पण ते नाव स्वीकारलं आणि माधुरीची अर्पिता झाले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच विक्रांतने मला सांगितल होत. शिवंण्या त्याची आणि अर्पिताच्या प्रेमाची निशाणी आहे आणि आई म्हणून त्याला शिवंण्याच्या नावापुढे अर्पिता ताईंच नाव हवं होत. मी ही समजून घेतल्या त्यांच्या भावना कारण मी माझं बाळ गमावलं होत. इतके महिने शिवंण्यासाठी घरी ये जा करत होते त्यामुळे विक्रांतचा स्वभाव ओळखायला लागले. आधीपासून प्रेम नसल म्हणून काय झालं सहवासातून प्रेम निर्माण होऊच शकत. मला विक्रांत आवडायला लागला. आम्ही कधी जवळ आलो आणि एक झालो समजलच नाही. आज सहा वर्ष झाली आमच्या नात्याला. विक्रांत आता असा का वागतोय समजतच नाहीये. कधी काळी प्रेमाने जवळ येणारा, आम्हाला वेळ देणारा विक्रांत दुरावत चालला आहे अस वाटते. हल्ली तो वासनांध झालेला असतो. घरी उशिरा येणे, मित्रांसोबत रोज ड्रिंक करणे हे त्याच सवयीचं होत चाललंय." अर्पिता म्हणाली.


"अर्पिता..हे तू स्वतःला का नाही विचारत!" पाठीमागून विक्रांत येत म्हणाला.


"काय विचारू स्वतःला? मी मान्य करते माझ्याकडुन चूक झाली. मी त्याची माफी सुद्धा मागितली. आमच्यात अस काही नाही पण तो क्षण असा आला आणि आम्ही त्यात कधी बंदिस्त झालो नाही कळलं मला." अर्पिता काकुळतीला येऊन म्हणाली.


"विक्रांत..हे बघ, तिने माफी मागितली आहे ना आणि ती म्हणते ना तिच्याकडून चुकून झालं. अश्यावेळी नाही थांबवता येत स्वतःला. तिच्या जागी तू असतास तर तू स्वतःवर ताबा ठेवू शकला असतास का? या गोष्टी आपल्या हातात नसतात." मधुकरराव म्हणाले.


"बाबा अहो.. पण तो घरी आला होता फक्त माफी मागायला मग माफी मागून निघून जायचं होत ना! त्याने आणि त्याच्या कुटुंबाने तिच्यावर आरोप लावले होते. ते पण कधी? सहा वर्षांपूर्वी. घटस्फोट झाला तेंव्हा तर मोठ्या रुबाबात म्हणाला होता तुझ्यासारख्या छप्पन भेटतील मग का नाही गेला तिकडे. की छप्पन पैकी एकही भेटली नाही त्याला! माझा विश्वासघात केला हिने… वाढदिवस होता हीचा म्हणून लवकर आलो होतो हिला..या बाईला सरप्राइज द्यायला पण..पण मलाच धक्का दिला हिने. आता अस वाटते उगाच हिला माझ्या अर्पिताच नाव दिलं. माझ्या अर्पिताच्या नावाला कलंक लावला हिने..

🎭 Series Post

View all