अमित, रोहन, वृंदा आणि दिव्या हे कॉलेजचे अगदी जिगरी दोस्त. अजूनही खूप मोठी गँग होती त्यांची, पण त्यातल्या त्यात हे चौघे अगदी क्लोज फ्रेंड होते एकमेकांचे. पुढे रोहन आणि वृंदाचे लव मॅरेज झाले. नंतर दिव्याचेही एका बिझनेसमन मुलाशी लग्न झाले. सर्वात शेवटी रोहनचे त्याच्या आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी म्हणजेच अस्मीसोबत अरेंज मॅरेज झाले. योगायोगाने सगळे मित्र एकाच शहरात होते. त्यामुळे काही महत्त्वाच्या प्रसंगी ते एकमेकांना भेटू शकत होते. पण हल्ली सगळेच संसारात आणि आपापल्या कामात खूपच बिझी झाल्यामुळे जास्त भेटीगाठी होत नव्हत्या. फक्त अमित आणि रोहन एकत्र काम करत असल्यामुळे रोज भेटायचे.
त्यातच रोहनने बायकोपेक्षा जास्त मित्र मैत्रिणींना वेळ देणे अस्मीला अजिबात पटायचे नाही. मुलींसोबत बोललेले तिला अजिबात आवडायचे नाही. त्यावरून सतत दोघांमध्ये कुरबुरी व्हायच्या. या कारणांमुळे रोहन खूपच डिस्टर्ब होता. सर्वांपासून जरा तो अलिप्तच राहत होता.
बघता बघता दोघांच्याही आयुष्यात वेदाच्या रूपाने आनंद आला. आता तरी परीस्थिती बदलेल असे रोहनला वाटले होते पण झाले मात्र सगळे उलटच. एकीकडे रोहनचा कामाचा व्याप वाढला आणि दुसरीकडे अस्मीचा चिडचिडा स्वभाव देखील. सांसारिक जबाबदाऱ्यांमधे रोहन पुरता अडकून गेला.
'लग्न झाले आणि तू पुरता बदलला.' हे आता रोहनला त्याच्या मित्र मैत्रिणींकडून नेहमी ऐकून घ्यावे लागायचे. त्यामागे खरी कारणे वेगळीच होती.
रोहनचे बदलले वागणे सर्वांना जाणवत होते. बाकीच्यांना खात्री नव्हती, त्याबाबतीत फक्त अंदाज होता. कारण स्वतःचे दुःख लपवून तो सर्वांसोबत शक्य तितका हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे इतका काही कोणाला डाऊट आला नाही की गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या असतील. नवरा बायकोमध्ये वाद व्हायचे याची कल्पना होती सर्वांना, पण ते कोणात होत नाहीत...असे म्हणून सर्वजण गमतीत घ्यायचे आणि विसरुन देखील जायचे. जवळपास चार वर्ष होत आली पण अजूनही रोहनने कोणालाही याचा थांगपत्ता लागू दिला नाही.
आज मात्र अमितला रोहनच्या बदललेल्या वागण्यामागे नक्कीच मोठे कारण आहे याची जणू खात्रीच पटली. म्हणूनच त्याने खूप प्रयत्नांती रोहनच्या मनातील सर्व जाणून घेतले. त्यामुळे रोहनदेखील खूपच हलके फील करत होता.
'खरंतर याआधीच मी अमितला सर्वकाही सांगायला हवे होते, असे मनोमन रोहनला वाटले.
कॉफी संपवून दोघेही जायला निघाले तेवढ्यात अमितला दिव्याचा कॉल आला.
'हिने का मला कॉल केला असेल? तेही नेमकं आजच? नक्कीच काहीतरी अर्जंट असणार. हिला समजलं की काय काही?त्याशिवाय ती मला कॉल करणार नाही." अमित विचार करत होता.
"अरे उचल की कॉल. इतका काय विचार करतोस? बरं तुझं बोलून झालं की तू ये, मी जातो पुढे. तसाही खूप वेळ झालाय, दुपारच्या मीटिंगचे प्रेझेंटेशन पण थोडे बाकी आहे. ये तू मी जातो पुढे." म्हणत रोहन निघून गेला.
रोहनला माहीत नव्हते की तो कॉल दिव्याचा होता म्हणून.
"हॅलो...हा दिव्या बोल ना."
"रोहन नाही ना तुझ्या सोबत?"
"अगं आम्ही सोबतच होतो. आताच तो गेलाय. तू बोल ना."
"रोहनने तुला काही सांगितले का म्हणजे अस्मि आणि त्याच्या नात्याबद्दल."
"गेल्या तासभर तोच गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. पण सगळंच बिघडलंय गं दिव्या. स्वप्नातही मी विचार केला नाही की रोहन कोणत्या त्रासातून जातोय. आपल्या कोणालाच याची कल्पना देखील नाही गं आणि हा शहाणा देखील आजपर्यंत काहीच बोलला नाही बघ ना."
"हो ना. शॉकींग आहे रे सगळं आणि त्या सगळ्याला मी कारणीभूत आहे. हे नाही सांगितलं का त्याने?"
"काहीही काय बोलतेस. असं काही नाहीये आणि असं का बोलेल तो? तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस."
"अमित.. अस्मीचा जस्ट कॉल आला होता मला. नाही नाही ते बोलली ती मला. कोणाशी बोलू काही समजेना म्हणून तुला कॉल केला मी. ॲक्चुअली आधी वृंदाला कॉल केला होता मी, पण तिने उचलला नाही. म्हणून मग तुला केला."
"अगं वृंदा अन्वीच्या स्कूलमध्ये गेलीये. म्हणून नसेल रिसिव्ह केला तिने तुझा कॉल. बरं ते जाऊ दे. अस्मी वहिनी काय बोलली तुला?"
"खरंच रोहनची बायको मंद आहे रे. वाटलं नव्हतं मला ती इतकी संकुचित विचारांची असेल. खरंच रोहनच्या आई बाबांची त्याच्यासाठीची निवड चुकली यार अमित. इतका बोल्ड मुलगा पण मला नाही वाटत हा तिच्यासमोर वर मान करत असेल."
"बाकी सांगतो मी सगळं, पण ती काय बोलली ते तर सांगशील आधी?"
"अरे मला म्हणते, तुम्ही कारण नसताना माझ्या नवऱ्याला मेसेजेस कॉल करता हे पटतं का तुम्हाला. त्याला एक कळत नाही पण तुमचं काय? इतकी साधी गोष्ट तुम्हाला तरी कळायला हवी ना. एका लग्न झालेल्या पुरुषाला बायको असते त्याची काळजी घ्यायला. मग तुम्ही का इतकी लुडबुड करता त्याच्या आयुष्यात. तुमच्या नवऱ्याला जर त्याच्या मैत्रिणीने वरचेवर असे कॉल मेसेजेस केलेले चालेल का तुम्हाला?
तिचं हे असं बोलणं ऐकून खरंच दोन कानाखाली द्याव्यात तिच्या असं क्षणभर मनात आलं पण काही करू शकत नाही याचं खूप दुःख झालं."
तिचं हे असं बोलणं ऐकून खरंच दोन कानाखाली द्याव्यात तिच्या असं क्षणभर मनात आलं पण काही करू शकत नाही याचं खूप दुःख झालं."
"दिव्या शांत हो आधी. इतका त्रागा करून घेवू नकोस."
"काय करू मग. डोक्यात गेली यार ती माझ्या. असं मॉडेल रोहनच्याच गळ्यात पडायला हवं होतं का रे. त्याच्या लग्नाआधी काय काय विचार केले होते आपण, चला एक ग्रुप मेंबर वाढला आता आपल्यात, या विचाराने किती खुश झालो होतो आपण. पण सगळं उलटंच झालं रे. एवढं सगळं होवूनही रोहन शांत आहे, याचंच जास्त नवल वाटतंय मला. इतकं कसं बायकोवर आंधळं प्रेम करू शकतं कोणी. तिच्या चुकांना हा का पाठीशी घालत असेल?"
"दिव्या, तुला खरंच काही माहिती नाहीये म्हणून तू रागाच्या भरात रोहनला असं काहीबाही बोलत आहेस, पण या सगळ्यांत खरंच त्याची काहीच चूक नाहीये गं. मलाही आज बऱ्याच गोष्टी समजल्या."
"म्हणजे काय झालंय नेमकं मलाही सांग बाबा. नाहीतर खरंच नी काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल. खरं तर मी त्यालाच कॉल करणार होते पण म्हटलं त्याआधी तुम्हाला काही माहिती आहे का ते पाहावं आणि मग त्याच्याशी बोलावं की बाबा तुझी बायको तुला लखलाभ. यापुढे मला कॉल काय मेसेज पण करू नकोस. भेटणं तर खूप दूरची गोष्ट. आज सगळ्याचा द एंड करून टाकावा असं वाटत आहे."
"दिव्या...इतकी टोकाची भूमिका नको ना घेऊस."
"तू सांग आधी मला नेमकं झालंय काय? नाहीतर मी बोलले ते खरंच करून दाखवील अमित."
"अगं ऐक ना तू...आता मला खरंच वेळ नाहीये गं. ऑलरेडी मी आणि रोहन अर्धा तास झाला कॅन्टीन मध्येच होतो. त्यात दुपारी एक मीटिंग पण आहे त्याचे प्रिप्रेशन करायचे आहे. मी तुला रात्री सांगतो सगळं. पण या साऱ्यात रोहनची काहीच चूक नाहीये हे मी बोललेलं लक्षात ठेव."
"बरं ऐक वृंदा ला माहितीये का? मी तिलाच विचारते. तसाही माझा मिस्ड कॉल पाहून ती मला कॉल बॅक करेलच."
"तिला कसं माहीत असेल दिव्या. मलाही आजच समजलं ना."
"तू आता जास्त टेन्शन नको घेवू. मी करतो तुला कॉल संध्याकाळी." अमित म्हणाला.
"बरं चल बोलू नंतर." म्हणत दिव्याने फोन ठेवला.
क्रमशः
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा