"अमित यार तू खूप लकी आहेस वृंदासारखी तुला समजून घेणारी मुलगी तुझ्या आयुष्यात आली. त्यावेळी घरच्यांच्या विरोधात जाऊन तू वृंदाशी लग्न केले, काही काळ घरचे दुरावले तुला, पण आज बघ वृंदाने तिच्या प्रेमळ स्वभावाने सगळं घर पुन्हा एकत्र आणलं."
"खरंय रोहन, त्यावेळी मी माझ्या मनाचे न ऐकता आई बाबांच्या समाधानासाठी त्यांच्या म्हणण्यानुसार लग्न केलेही असते पण वृंदामध्ये माझा जीव अडकला होता. तिची जागा मी इतर कोणालाही देवू शकत नव्हतो. खरंतर तुमच्यासारखे मित्र सोबत होते म्हणून वृंदा माझ्या आयुष्यात आली हेही तितकेच खरे."
"काही नाही रे, शेवटी नशिबाचा खेळ सारा. जे घडायचं तेच घडतं. सारं काही विधिलिखित. माझंच उदाहरण काही कमी आहे का?"
"बी स्ट्राँग रोहन. इतक्यात अशी हार मानू नकोस यार."
"काय करू मग? मलाही माझ्यावर मनापासून प्रेम करणारी बायको हवी होती. मला समजून घेणारी, मी चुकत असेल तर हक्काने कान ओढणारी आणि पुन्हा मायेने जवळ घेणारी. पण सगळंच उलट झालं बघ माझ्या बाबतीत."
"अस्मी वहिनीचं देखील तुझ्यावर तितकंच प्रेम आहे रे फक्त त्यांची पद्धत चुकीची आहे." समजावणीच्या सुरात अमित बोलला.
"मला नाही वाटत तसं. पण आता तूच सांग माझी काय चूक आहे यात?"
"अरे तसं नाही. तुझी काहीच चूक नाहीये. पण आता वहिनीला नाही आवडत त्याला आपण काहीच करू शकत नाही ना. स्वभाव असतो एखाद्याचा."
"मग काय आता मी तिच्या पदराला धरून तिच्या मागे मागे फिरत बसू? चूक असेल तरी ती म्हणेल तसंच वागायचं का मी?"
"अजिबात नाही. फक्त तू थोडे पेशंस ठेव. काढू आपण काहीतरी मार्ग."
"माझे पेशन्स खरंच संपत आलेत यार अमित. इतके दिवस मी तुम्हाला कोणाला जाणवू सुद्धा दिलं नाही माझ्या आयुष्यात काय सुरू आहे आणि आताही सांगणार नव्हतो पण तू ऐकशील तर शपथ. मला बोलायला भाग पाडलंस शेवटी. पण मला एक सांग या सर्वात माझी काय चूक?
दिव्यासारखी मैत्रिण सुद्धा हिच्यासाठी आयुष्यातून काढून टाकू का मी आता? अधूनमधून बोलतो आम्ही एकमेकांसोबत, म्हणून आमच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या विसरतो असे आहे का? की मर्यादा सोडून वागतो? फक्त आणि फक्त निखळ मैत्री आहे आमच्यात."
दिव्यासारखी मैत्रिण सुद्धा हिच्यासाठी आयुष्यातून काढून टाकू का मी आता? अधूनमधून बोलतो आम्ही एकमेकांसोबत, म्हणून आमच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या विसरतो असे आहे का? की मर्यादा सोडून वागतो? फक्त आणि फक्त निखळ मैत्री आहे आमच्यात."
"आय नो...अरे मीही त्या मैत्रीचा एक भाग आहे. मला माहित नाही का हे. ॲज ए फ्रेंड म्हणून आजकाल हे कॉमन आहे रे. हे वहिनीने समजून घ्यायला हवं ना. त्यात दिव्यासारखी मुलगी ज्याला अगदी जवळून ओळखते त्याच्याशीच हक्काने असं बोलते. आपला चार जणांचा ग्रुप सोडता मला नाही वाटत ती इतर कोणाशी असं आपुलकीने बोलत असेल. तूच काय अरे ती माझ्याशी पण असं बोलते. अधूनमधून काळजीने चौकशी करते. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा वृंदाचे आणि तिचे बोलणे होते तेव्हा तेव्हा ती माझ्या बद्दल आवर्जून विचारते. 'त्याला सांग मी आठवण काढली,' असं आवर्जून सांगते.
"असंच नातं असावं रे. त्यात संशयाला मुळी थाराच नसावा, पण माझ्या नशिबी मात्र ते सुख नाही. निदान समोर व्यक्ती कोण आहे? कशी आहे? याचा तरी विचार करायला हवा होता तिने. काहीही म्हण अमित, हिच्या ह्या संशयी स्वभावामुळे आमच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय हे खरं. इतकी साधी गोष्ट हिला कळत नाही."
"डोन्ट वरी, निघेल काहीतरी मार्ग आणि एक ना एक दिवस वहिनींना नक्की समजेल."
"हो..पण तोपर्यंत वेळ निघून गेली नाही म्हणजे मिळवलं."
"मी बोलू का अस्मी वहिनी सोबत?"
"नाही रे बाबा. चुकूनही मनात विचार आणू नको तसा. त्यानंतर जे महाभारत होईल ते फेस करण्याची माझ्यात तरी ताकत नाही."
"बरं बाबा नाही बोलत मी काही. पण काय अवस्था झालीये रोहन तुझी. एकदा बघ स्वतःकडे. कॉलेजला असताना किती स्वच्छंदी होतास तू. कितीतरी मुलींचा क्रश होतास तू तेव्हा. तुझ्या दिसण्यावर वागण्या बोलण्यावर मुलीही लगेच फिदा व्हायच्या. पण तू कधीही कोणत्या मुलीचा गैरफायदा घेतला नाहीस. फक्त सर्वांशी हसून खेळून राहणं एवढंच तुला जमायचं. पण आता तुझी ही अवस्था खरंच पाहवत नाही बघ."
"जाऊ दे, आयुष्याचं गणितच बिघडून गेलंय बघ अमित. तू घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करूनदेखील तुझी फॅमिली आज तुझ्यासोबत आहे आणि मी मात्र आई बाबांच्या मर्जीने त्यांनी शोधलेल्या मुलीशी लग्न करूनही आज माझी फॅमिली मात्र माझ्यापासून दुरावली. आज खूप म्हणजे खूप एकटं वाटतंय रे. आईची बाबांची खूप आठवण येते. ऑफिसमधून घरी गेलं की वाटतं आई असायला हवी घरात. आपल्याला समजून घेणारं घरात कोणीतरी असावं नाहीतर हे असं होतं."
नकळतपणे आज रोहनच्या डोळ्यांत आसवांची गर्दी झाली. आजवर त्याने मनात दडवून ठेवलेल्या सर्व गोष्टी अमित जवळ रित्या केल्या. त्यालाही आज खूप हलके वाटत होते त्यामुळे.
"म्हणजे मी समजलो नाही. आई बाबा घरात नाहीत म्हणजे? कुठे गेले ते?
"ती तर वेगळीच स्टोरी आहे काय सांगावं आता. "
"का रे बाबा. आता काय झालं?"
"कसं सांगू यार अमित तुला. इथेही मीच चुकीचा ठरलोय."
"अरे पण झालं तरी काय?"
"गेल्या दोन महिन्यांपासून मी अस्मी आणि वेदा तिघे वेगळे राहतोय."
"काय? एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने बोलला नाहीस मला?"
"काय सांगणार होतो मी तुला आणि कोणत्या तोंडाने सांगणार होतो."
"पण इतका तडकाफडकी निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे यार तू."
"मग काय करू? रोज अस्मिकडून आई बाबांचा होणारा अपमान नव्हता सहन होत मला. शेवटी आई बाबाच म्हणाले वेगळं झाल्यावर ती कदाचित शांत होईल. काही दिवस ऐक तिचं. तसंही आजकालच्या मुलींना सासू सासरे नकोच असतात. खूप वाईट वाटत होतं रे तेव्हा पण नाईलाज झाला माझा. बुद्धी भ्रष्ट झाली होती तेव्हा माझी. फक्त वेदासाठी हिचे सगळे नखरे सहन करतोय अमित मी. नाहीतर केव्हाच हिला हीची लायकी दाखवून दिली असती. एक एक करत जवळची बरीच माणसं दूर केली मी हिच्यासाठी. आणखी काय करू सांग?"
"सगळं गणितच बिघडलं रे."
"आपली कॉलेज लाईफ खरंच खूप भारी होती यार. खूप मिस करतोय मी ते दिवस." रोहन म्हणाला.
"बरं तू टेन्शन घेवू नकोस. वृंदाशी मी एकदा बोलतो या विषयावर. बघू ती काय म्हणते. ती नक्कीच काहीतरी मार्ग सुचवेल यावर."
क्रमशः
©®कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा