*संस्कारी बाप* भाग-१
कथा फ़ार फ़ार जुनी असेल... अस वाटत नाही.
चंद्रपूर नावाचे एक लहानसे नगर होत. त्या नगरात मोहन नावाचा एक शिक्षित शेतकरी राहत होता. त्याच्या शिक्षित पत्नीच नाव राधाबाई अस होत.
त्या शिक्षित दांपत्याला गीरीधर, रामदास, संजय व कुमार अशी चार मुलं होती.
ती चारही मुलं अतिशय कामचोर,उनाड भांडखोर व असंस्कृत होती.
त्या चारही मुलांना चांगले संस्कार देवून कस मोठ करता येईल? याचा मोहन व राधा नेहमीच विचार करीत.
मात्र ती चारही मुलं इतकी बदमाश होती की, आपल्या आई वडलांना अजिबात जुमानत नसत. राधा- मोहनने त्यांना सुधारण्यासाठी कोणतीही योजना आखली की, ती योजना ते चारही जण उधळून लावत .ते चारही जण म्हणजे एक से बढ़कर एक असे होते.
मात्र मोहन देखिल त्यांचा बाप होता. तो आणि राधा त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी नव नवीन शक्कल लढवत असत.
आज त्यांनी काफी सोच विचार करून एक आयडिया काढली.
आज त्यांनी काफी सोच विचार करून एक आयडिया काढली.
आई! काय झाल बाबांना?
अरे! तुमच चार जणांचे पुढे काय होईल? या काळजीने कालपासून ते धड जेवलेले नाहीत .छातीत धडाधडते म्हणे! म्हणुन झोपलेत!! त्यांची तब्बेत खुपच बिघडलीय!
मोहन खाटेवर खीळला होता त्याने सकाळीच राधाला सगळ्या मुलांना बोलवायला संगितले.
चारही मुलं मोहनच्या जवळ आली. बाजुलाच अतिशय पडलेल्या चेहऱ्याने राधाबाई मोहनच डोक दाबत होती.
हे पहा बाळांनो!
माझी तब्बेत बरोबर नाही! कधी काय होईल ते सांगता येत नाही.?
बाबा! कधी काय होईल ते सांगता येत नाही ना? मग राहु दया! कश्याला सांगताय? मोठा गीरीधर म्हणाला.
अरे! गिरी! तुमचा बाप म्हणून मला सांगणे गरजेचे आहे रे! कळवलत मोहन म्हणाला.
ठीक है। आप जो भी कहेंगे वो सच कहेंगे। सच के सीवा कुछ नही कहेंगे। संजय म्हणाला..
पोरांनो! तुम्ही सर्व आपल्या शेतात जा! मी आपल्या शेतात बांबूच्या चार काठ्या ठेवल्या आहेत त्यांतील तुम्ही प्रत्येकजण एक काठी घेवून या!
बाबा! मस्करी नाही पाहीजे हां! आता दांडियाचा सीजन नाही समजल? रामदास म्हणाला.
दांडिया खेळायला नाही रे दास! मोहन आणखी कळवळत
मला समजल!..एक लाठी को तोड्ना आसान है। लेकिन लाठीकें भारे को तोडना मुश्किल है। मैने बचपन में पढ़ा था तिसरी में।
अरे! क्रांतिवीर संजय! तुला कस समजल ? मोहन पुन्हा कळवळत.
संजय दादा! त्या काठ्या आपल्याला मार देण्यासाठी असतील!
संजय दादा! त्या काठ्या आपल्याला मार देण्यासाठी असतील!
तु नेहमी माराचेच सांग कू मार!
कुमार नाही रे!... बाबा नवीन काहीतरी गेम दाखवतील चार काठ्यांचा! रामदास पुन्हा..
बाबा! जो काही गेम असेल तो! मला पहिला चान्स! कारण मी मोठा आहे ना?.. गीरीधर म्हणाला.
पोरांनो! तुम्ही काठ्या आणताय की मी जीव सोडू? मोहन कळवळीत धमकी देत म्हणाला.
आणतो! आणतो!!
चारही मुलं काठी आणण्यासाठी बाहेर पाडली.
काय ग! कसा वाटला माझा अभिनय?
फारच मस्त! तुम्हांला ना तो कुकर का बुकर एवार्ड द्यायला पाहिजे!
कुकर- बुकर नाही ग! ऑस्कर! म्हणतात त्याला ऑस्कर!!
राधा! बुकर तर लेखकांना देतात!
मग कथा तर माझीच आहे ना?
अग! कथा म्हणजे कल्पना तुझी होती. पण शेवटी पटकथा तर मी केली ना?
तरी काय उपयोग झाला. त्या संजयला दूरदृष्टी ना? त्याने वाट लावली आपल्या प्लानची. -मोहन नाराजीने
तुम्ही परत झोपा लवकर! आता येतीलच चारहीजण काठ्या घेवून! -राधा
बाबा! आम्ही आलो काठ्या घेवून!
पोरांनो! एक काठी आणयला इतका वेळ? काय एमेझॉनच्या जंगलात गेला होता की काय? मोहन अभिनयी कळवत.
बाबा! असल्या फालतु काठ्या त्यांच्याकडे नसतात! नाहीतर आम्ही एमेझॉन कडूनच ऑनलाईन मागवल्या असत्या! रामदास अगदी मासुमीयत मध्ये ..
राधा! हे आपलाच पोरग आहे ना? या नजरेने मोहनने तिच्याकडे पाहिले.
राधाने मोहन कडेच बोट दाखवून तुमचेच असं इशाऱ्याने बोलुन सर्वच क्रेडिट मोहनला देवून स्वतः वरची जबाबदरी झटकली.
बाबा काय करायचे या काठ्यांचे? मुलांनी विचारले.
या सगळ्या काठ्या तुमच्या आई जवळ दया! (नवीन स्क्रिप्ट तयार होई पर्यंत! मोहन मनातल्या मनात)
पोरांनो जा आता ! उद्या मी काय ते सांगतो!
मुलं निघुन गेल्यावर राधा मोहनला म्हणाली.
अहो! या काठ्यांचे मी काय करु?
अहो! या काठ्यांचे मी काय करु?
घाल माझ्या डोक्यात!.. मोहन चिडून म्हणला. साला एक प्लान बनवला होता तो देखिल पोरांनी फुस्स.... केला. त्या क्रांतिवीर संजयने आधिच फोल खोल केली!
अहो! यानां ताळ्यावर आणायला काहीतरी नवीन योजना करायला हवी!
हो! राधा बरोबर काहीतरी युनिक आइडिया काढलीच पाहीजे!
हर चीज में गुड होता हे जी!
आपण या काठ्यांचाच उपयोग करु! कान इकडे आणा पुढील स्टोरी सांगते!-राधा खुशीत
दुसऱ्या दिवशी सकाळीच परत तोच सॅड सीन
पोरांनो काल तुम्ही गेल्यावर एक सिध्द साधु बाबा आले होते. ज्यांचे दर्शन फक्त पुण्यवान लोकनांच होत.
तुमच्या आईने या चार काठ्या त्यांना दाखवल्या तेंव्हा त्या सिध्द साधूने मंत्र मारून या काठ्या तुमच्या आईकडे परत दिल्या..
आता या चार काठ्या तुमच्या पाप- पुण्याचा हिशेब करतील!-मोहन
म्हणजे? -चारही जण
म्हणजे! म्हणजे!! कुत्र्याचे पंजे गाढवाचे कान! आणि मांजरीची घाण!!
बाबा! मिसाल तो ठीक से दिया करो। कूत्ते कें नही बाघ के पंजे।
-संजय
-संजय
पोरांनो! म्हणजे असं.. या चारही काठ्या सारख्या मापाच्या आहेत. प्रत्येक काठीवर त्या साधुने तुमचे नाव कोरले आहे.. आता तुमच्या पैकी जो पाप करेल तसा त्याच्या काठीची लांबी कमी होत जाईल. आणि जो पुण्य करेल त्याच्या काठीची लांबी वाढत जाईल. एक वर्षा नंतर हया सगळ्या काठ्यांची उंची मोजली जाईल. ज्याची काठी सगळ्यात लांब असेल त्याला मी माझी सगळी जमीन- जायदाद देवून टाकीन. बाकीच्यांना फुटी कवडी देखील मिळणार नाही. हे माझ वचन आहे!-मोहन पुन्हा अभिनयी कळवळत
और आपका वचन ही शासन है! बरोबर?-संजय
हो पोरा ! अगदी बरोबर!-मोहन
आता मात्र मोहन आणि राधाने अतिशय गेहरी चाल चालली होती. त्यांनी चारही मुलांना अगदी चेक - मेट करून टाकले होते. कारण आता चांगले वागले नाही. अर्थात पुण्य मिळवले नाही तर प्रॉपर्टीचा प्रश्न होता.
यार ये अपना बाप तो हम चारों का बाप निकला। - संजय
अरे! संज्या बापच आहे तो आपला. यात \"निकला\" काय? -गीरीधर
पुण्य मिळवायचे म्हणजे काय करायचे भाई लोक?-रामदास
त्या साठी मार खायचे धंदे बंद करावे लागतील!- कुमार
राधा! मी पण बाप आहे त्यांचा बाप!! आता बघतो हे चौघे कसे ठिकाणावर येत नाही ते?- मोहन
अहो! जास्त हवेत उडू नका! तुमचीच मुलं आहेत ती! कधी डाव उलटून टाकतील त्याचा भरोसा नाय!- राधा
राधा! सारखी-सारखी माझी मुलं काय? तूझा काहीच सहभाग नाही यात?-मोहन
मी काय गरीब गाय राहते गप पडून!-राधा
हो! माहिती आहे!! तु किती गप पडून राहतेस ते?
बरोबर! मी आंधळी बॅट फिरवली आणि हा चौकार लागला!
बरोबर! तूझा काहीच दोष नाही यात! कारण तु तर गप पडून होतीस ना?- मोहन काहीश्या रागात.
नशीब! या चौकारा नंतर मी निवृत्ती घेतली नाहीतर तुम्ही षटकार टोकाला असता! - राधा
राधा! आता जुने रेकॉर्ड जाऊ दे! यापुढे हा आपला प्लान उधळून टाकण्यासाठी आपली मुलं काय काय नाटक- तमाशा करतील या कडे आपण लक्ष केंद्रित करु!- मोहन
यार! कुछ तो करना पडेगा। - संजय
तस माझ्या कडे यावर ढासु प्लान आहे. तो नक्की काम करेल!- गीरीधर
गीरीधर ने प्लान आपल्याला ऐकू जाईल म्हणून त्याने तो तिघांच्या कानात सांगितला.
गीरीधरचा तो प्लान ऐकून सगळे खूष झाले त्यांनी एकमेकांच्या हातावर टाळी देवून गळा भेटी घेतल्या.
(काय आहे तो गीरीधर चा ढासु प्लान जानने के लिए पढिये अगला एपिसोड ..टिंग ..टोंग)
-चंद्रकांत घाटाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा