संतान

This poem is about father and son who has made unhappy his father

                                                                              संतान

मी एका शाळेचा मुख्याध्यापक

माझी सुमंगला सुद्धा शिक्षिका

आम्ही दोघे शाळेला जायचो

कुमारला सुद्धा न्यायचो

आजवर मला अभिमान होता

मी सगळ्या जगाला घडवितो

पण..

आज माझा अभिमान धुळीस मिळाला

जेव्हा मी माझ्या मुलाला सिग्रेट ओढताना पहिला

एका क्षणात त्याने माझी इज्जत मातीत मिळवली

मनात विचार आला अख्ख आयुष्य कशासाठी घालवली

माझ्या मनानं हेरलं त्याला पैसा  नाही द्यायचा

मनात विचार आला मग काय दोघांनीच खायचा ?

 शेवटी बापाचचं मन माझं मायेने धरलं

कधी नव्हे ते एकदा सुमंगलाच ऐकलं

लग्न द्या लावून होईल सारे ठीक

आयुष्यभर कमवून वृद्धपकाळात मागतोय भीक

पण काहीही असो हि दुनियाच दुखी

असं म्हणत सोडून गेली सखी

या जगाच्या महासागरात माझ्या जीवनाची नाव तरत नव्हती

तरिसुद्धा  पुत्राला बापाची किंवा येत नव्हती

बस एवढेच खरे

असे संतान असेल तर

अशी वेळ येणार असेल तर

असे संतान नसलेले बरे

© शीतल महामुनी माने