Login

सप्तर्षी एक अनोखे मायाजाल भाग 1

इतिहास,विज्ञान आणि कल्पना यांची एक अद्भुत जगातील सफर
सप्तर्षी एक अनोखे मायाजाल भाग 1

आजचा दिवस उगवला वार माहित नाही , महिना नाही सांगता येणार आणि वर्ष ते तर आठवतच नाहीय .
आठवतोय फक्त आणि फक्त एक मोठा प्रकाशाचा लोळ आणि नंतर सगळीकडे पसरलेला अंधार .

मग मी जिवंत कसा? मी आत्ता कुठेय ? आणि माझं शरीर आहे तसेच आहे एवढा आगीचा लोळ अंगावरून जाऊनही ? नक्की काय झालं आणि काय चाललंय ? मला काहीही सुचत नाहीय आणि शरीर हलत नाहीय .


मेंदू मात्र पूर्णपणे काम करतो आहे .तेवढ्यात एक सुंदर डॉक्टर जवळ आली . रिपोर्ट वाचत असताना ती माझ्याकडे पहातच नाहीय ? आणि तिचे डोळे ?अरे हि तर मशीन आहे .


अचानक लख्खन काहीतरी हलले आणि मला जाणीव झाली डोळ्यांची . मेंदू वयतिरिक्त मला जाणवलेला पहिला अवयव . म्हणजे मी जिवंत आहे तर! हळूहळू हॉस्पिटल सुरु झाले आहे पण मला एकही माणूस दिसत नाहीय.

खूप खूप ताण देऊनही काहीच आठवत नाहीय .
पण आज मला हात आणि पाय सुद्धा जाणवत आहेत .फक्त हॉस्पिटलच्या खिडकीतून आकाश दिसत.त्यावरून मी मोजत आहे ,रात्र आणि दिवस.

मला जाग आल्यापासून किमान चारशे वेळा सूर्य उगवून मावळला आहे .अचानक मेंदूत आवाज झाला अरे ! म्हणजे एक वर्षांपेक्षा जास्त काळ मी इथं आहे .

अच्छा ! म्हणजे वर्ष नावाचं काहीतरी मोजायला वापरतात वाटत . खिडकीबाहेर अंधार पडत चालला आहे .
आणखी एक दिवस संपला . मला अचानक एक तीव्र प्रकाश दिसतोय .
त्यापलीकडे कोण आहे?कोण ?थोडा वेळ गेला आणि प्रकाश विरत जाऊन पुसटशी अक्षरे मला दिसली.भारतीय अवकाश संशोधन केंद्र उत्तर ध्रुव .


ती अक्षरे दिसताच स्मृतींच्या जाणीव जागृत होऊ लागल्या.
मी डॉक्टर चंद्रशेखर . भारतीय संशोधन संस्था इस्त्रो मधील तरुण वैज्ञानिक . उत्तर ध्रुवावर होत असलेल्या संशोधन तुकडीचा प्रमुख . मग मी इथे कसा ? माझ्या तुकडीतील सहकारी कुठे आहेत ? असंख्य प्रश्न पुन्हा एकदा फेर धरून नाचू लागले .


अजूनही मी इथे कसा पोहोचलो मला आठवत नव्हते. इतक्यात कोणाची तरी चाहूल लागली आणि मी झोपण्याचे नाटक केले. मला माझ्या शरीरात काही इंजेक्ट केल्याचे जाणवले. सगळीकडे एक सुखद संवेदना पसरत होती.


तरीही मला एक प्रश्न छळत होता. माझ्या घरचे,भारत सरकार आणि मीडिया मला शोधत असेल का ? किती दिवस मी इथे आहे ? प्रश्न पडत असतानाच डोळ्यांवर झोपेचा अंमल सुरू झाला आणि विचारांची साखळी तुटली.


मी डॉक्टर चंद्रशेखर आहे इतकेच मला आठवत आहे. माझे आई वडील,नातेवाईक,बालपण काहीही मला आठवत नाही. माझे बालपण कुठे गेले असेल? असा विचार करत असतानाच मला हळूहळू जाग येऊ लागली. मला इतर अवयव देखील जाणवू लागले होते. आता माझे शरीर संपूर्ण असल्याची जाणीव होत होती.


इस्रोने भारतभर शोधून निवड केलेल्या टॉप दहा भारतीय वैज्ञानिक टीममध्ये मी होतो. अंटार्क्टिका खंड माझ्या अभ्यासाचा विषय होता. आईस एज पासून किंवा त्याही आधीपासून तिथले वातावरण बदलले नव्हते. तिथे जाऊन त्या काळी पृथ्वीवर अस्तित्वात असलेले सूक्ष्मजीव आणि त्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी आमची टीम काम करत होती. सूक्ष्मजीव शास्त्र माझा आवडीचा विषय.


सूक्ष्मजीव मानवाला दही बनवायला मदत करतात तसेच अनेक भयंकर रोग देखील उत्पन्न करतात. त्यांचा अभ्यास मानवी जीवन अनेकदा बदलवून गेला होता. आम्ही जानेवारी 2022 रोजी मोहिमेच्या ठिकाणी पोहोचलो.


नुकताच कोविड काळ संपला होता. मानवी जीवन पुन्हा पूर्व पदावर आले होते. आता पुढची दोन वर्षे इथे आम्हाला अभ्यास करायचा होता. आमच्यापासून पंचवीस मैलांवर अमेरिकन टीम काम करत होती. जेनी नावाची तरुण वैज्ञानिक त्यांची प्रमुख होती.


अंटार्क्टिका आपल्या बर्फाच्या खाली अनेक रहस्य सामावून असल्याची मला खात्री होती. कारण इथे प्राचीन काळी बर्फ नव्हते आणि त्यानंतर लाखो वर्षे हा भूभाग बर्फाने आच्छादित होता. ह्या बर्फाचे थंडगार आवरण आणि त्याच्या खालून वाहणारे उष्ण सागरी प्रवाह असा निसर्गाचा अनोखा खेळ पुढील दोन वर्षे जवळून पाहता येणार होता. मला आता हळूहळू स्वच्छ आठवत होते. आठवणींचे तुकडे जुळत होते. तेवढ्यात कोणाची तरी चाहूल लागली आणि मी झोपण्याचे नाटक केले.



एक रोबोट महिला माझ्याजवळ आली . तिने रक्ताचे नमुने घेतले आणि काही नोंदी करू लागली. मी निपचित पडून होतो. थोड्याच वेळात तिच्या नोंदी पूर्ण झाल्या आणि मग मला इंजेक्शन देऊन ती निघून गेली. हळूहळू डोळ्यासमोर अंधार यायला लागला. जागे राहायचे प्रयत्न अपुरे पडू लागले.


आज पुन्हा सूर्य उगवल्याची जाणीव मला झाली. खिडकीच्या बाहेर प्रकाश होता. आता माझी विचारशक्ती पुन्हा जागेवर येऊ लागली. मला माझ्या संशोधन तळावरील गोष्टी आठवू लागल्या.


एक बर्फाळ इमारतीचा दरवाजा आहे.अरे दरवाजा उघडला.आत खुप खोल्या आहेत.माझी नजर एका ठिकाणी स्थिर झाली.केबिनवर नाव आहे. डॉ. चंद्रशेखर आणि अचानक तोच मोठा आगीचा लोळ पुन्हा मोठा अंधार.
पाणी! पाणी! आग! आग! मोठ्याने ओरडून मी बेडवर उठून बसलो.


माझ्या अंगाला अजूनही त्या आगीची धग जाणवत होती का ? मी जागा आहे का? माझा मेंदू सगळ्याचे अर्थ लावायचा प्रयत्न करत होता. मला नक्की काय झाले असेल? भारत सरकारने मला इथे ठेवले असेल तर मग मला काहीच कसे आठवत नाहीय ? प्रश्नांची मालिका सुरू झाल्यावर आपण स्वप्नात असल्याचे मला जाणवले.


डोळे उघडले. काचेच्या आत असलेला तो अत्याधुनिक बेड आणि शेजारी असलेली खिडकी दिसली. माझ्या अंगावर कोणतीही सुई,सलाईन काहीच लावलेले नव्हते. मला गंभीर काही झाले असेल का? अणुस्फोट ? विचार करताच अंगावर सरकन काटा आला.


माझा विचार चालू असतानाच अचानक सायरन वाजू लागला. एका पाठोपाठ एक दिवे बंद होऊ लागले. सिस्टिम फेल झाल्याचा इशारा वाजू लागला. भोवताली काळोखात गोळ्या झाडल्या जात होत्या. माणसे ओरडत होती. दरवाजा उघडला गेला .


क्षणात सर्वत्र दिवे लागले आणि पहिल्यांदा मला माणूस नव्हे एक स्त्री माझ्याकडे येताना दिसली.ती समोर आली आणि हातातल्या वॉच कडे पाहून म्हणाली subject is consious. I repeat subject is consious!मी काही बोलणार इतक्यात तिने एक सिरींज माझ्या हातावर टोचली . पुन्हा अंधार.



हळुहळू प्रकाशाचा एक किरण माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता.मी डोळे उघडले ,आता सगळे स्पष्ट दिसू लागले .आता मला सर्व शरीर जाणवू लागले .मी उठायचा प्रयत्न करताच मला समजले मी एका परीक्षानळीत आहे.


एक धूसर आकृती. नाही दोन की तीन. Dr. take him out.
No I can't त्याला इथे बाहेर काढण्या इतका वेळ आपल्याकडे नाही. समोरून उत्तर आले. क्विक, त्याला ट्यूब सकट उचलून न्यावे लागेल. मला काहीही समजत नव्हते. अचानक एका यांत्रिक हाताने मला उचलले. एका चिकट द्रावणात मला आता धूसर दिसत होते. थोड्याच वेळात यान आकाशात उडाले.


एका सुसज्ज प्रयोगशाळेत मध्यभागी मी एका परिक्षनळीत होतो अगदी विवस्त्र. माझ्याभोवती उभे असलेले वैज्ञानिक आपापसात काहीतरी बोलत होते . अचानक खट असा आवाज झाला
पाण्याचा लोंढा वाहिला आणि मी त्या नळीच्या बाहेर फेकला गेलो,अगदी विवस्त्र.उठून उभे राहायला जमतच नव्हते.पाय जाणवत असूनही.मी खुप प्रयत्न करत असताना,मला एका मशीन ने उचलून बेड वर ठेवले.


ते तिघे जवळ आले.मी विचारू लागलो,मी कुठे आहे?मला काय झालंय?असंख्य प्रश्न माझ्या मेंदूत उसळत होते.मी खुप अस्वस्थ होतो.इतक्यात एक वयक्ती माझ्या जवळ आली.तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील!शांत आणि प्रसन्न असा त्यांचा आवाज ऐकून खूप बरे वाटले.इतक्यात मला समोर एक स्क्रीन दिसली.

त्यावर तारीख होती दहा जानेवारी दोन हजार दोनशे पंचवीस .
कस शक्य आहे?
मी जोरात ओरडलो.इतक्यात एक सिरींज टोचल्याचा भास आणि पुन्हा अंधार.

डॉक्टर चंद्रशेखर इथे कसे पोहोचले असतील?
दोनशे वर्ष डॉक्टर जिवंत कसे?
वाचत रहा.
सप्तर्षी....एक अनोखे मायाजाल.


सदर कथा मनोरंजन ह्या हेतूने वाचावी.