सप्तपदी कि तप्तपदी...
प्रयत्न आहे कि प्रत्येक भागात एका नवीन जोडप्याची नवीन कथा घेऊन येण्याची...
आजची गोष्ट आहे अर्चना आणि आदित्यची...
दोघांचाही प्रेमविवाह झाला होता ते ही दोन्ही घरांच्या परवानगीने साग्रसंगीत...त्यामुळे दोघेही अत्यंत आनंदी होते.. अर्चनाला एकच भाऊ, पण तोही परदेशी, आईवडील दोघेही सुस्थितीत त्यामुळे तिच्यावर माहेरची जास्त जबाबदारी नव्हती.. आणि आदित्यच्याही मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते त्यामुळे आईवडील आणि हे दोघे असे चौघांचे छान, छोटे कुटुंब होते..नव्याचे नऊ दिवस संपल्यावर सासूसुनेची कुरबूर सुरू झाली..पण येणाऱ्या बाळाच्या चाहूलीने थोडी कमी झाली.. आणि त्यांच्या छोट्याश्या कुटुंबात एका राजकुमाराचे आगमन झाले.. अर्चनाला वाटले आता सगळेच छान होईल, पण नाही.. तिच्या आणि तिच्या सासूबाईंचे संबंध बिघडायला लागले होते.. आणि त्याचा परिणाम बाळावर व्हायला लागला होता.. नाही म्हटले तरी अर्चना थोडी लाडावलेली होती.. त्यामुळे स्वयंपाकपाणी, बाळाचे संगोपन आणि ऑफिस हे सगळे सांभाळताना तिला खूप त्रास होत होता.. आणि एका बाजूला सासूसासर्यांचे असहकाराचे धोरण.. आदित्य सकाळी कामाला जायचा ते थेट रात्री उशीरा यायचा त्यामुळे त्याला काही सांगण्यात अर्थच नव्हता.. आणि सांगितले तरिही मी आईबाबांना काही बोलणार नाही असेच त्याचे धोरण होते..
शेवटी या सगळ्याला कंटाळून तिने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.. तिचे नवीन घर तिच्या आईच्या घराजवळच होते त्यामुळे ती बाळाला,वीरला आईकडे ठेवून कामाला जात होती.. सासरी सुद्धा जाऊन येऊन होती.. दूर राहिल्याने प्रेम वाढते, तसेच काहिसे झाले.. त्यामुळे सासरी आता सगळ्यांशी छान संबंध झाले होते.. असेच दिवस खूप छान जात होते.. आणि मध्येच आला करोना.. अनेकजणांप्रमाणे अर्चना आणि आदित्य ही work from home करत होते..पण आदित्यच्या ऑफिस मधून काही लोकांना कामावरून कमी करण्यात येत होते आणि त्यात आदित्यचे नाव होते..छोटे बाळ, नवीन घेतलेले घर हे सगळे कसे सांभाळायचे या सगळ्याचे त्याला खूप टेन्शन आले.. पण घरात कोणालाही याची कल्पना न देता त्याने दारू प्यायला सुरुवात केली...
"बाबा , आज आपण चायनीज खायला जाउ या?" वीरने आदित्यला विचारले.."बेटा, तुला माहिती आहे ना, बाहेर अजून करोना चालू आहे. मी एक काम करतो , ऑफिसमधून येताना घेऊन येतो. चालेल?"
" हो बाबा, आईस्क्रीम पण आणा, मग आपण तिघे मजा करू."
हे सगळे आतमधून अर्चना ऐकत होती. तिने हळूच आदित्यला विचारले, " त्या बिचार्या पोराला सांगतो आहेस, पण नक्की लवकर घरी येणार आहेस का?"
"तुझा माझ्यावर एवढाही विश्वास नाही का?" आदित्य
"प्रश्न विश्वासाचा नाहीये, पण सध्या.. जाउ दे. संध्याकाळी लवकर घरी ये म्हणजे झाले."
त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजले तरी आदित्यचा काहीच पत्ता नव्हता..
"आई, बाबांना फोन लावना" वीर.
"अरे हो बाळा, मगाशी लावला होता, पण ते उचलत नाही.तू एक काम करतोस का? मी पटकन गरम गरम वरणभात करते. तो थोडा खाउन घे. मग बाबा आल्यावर चायनीज खा. ओके?"
"नाही, मी बाबांसोबतच जेवणार" चार वर्षांचा वीर काही आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. इथे अर्चना आदित्यला फोन वर फोन करत होती. पण तो ही फोन उचलत नव्हता. शेवटी रात्री बारा वाजता घराची बेल वाजली. रडून रडून झोपलेला वीर आवाज ऐकून "बाबा , बाबा" अशी हाक मारत दरवाजा उघडायला धावला. दरवाजात दारू पिऊन उभाही राहू शकत नसलेला आदित्य उभा होता. "बेटा, मी तुझ्यासाठी चायनीज आणले आहे"
"बाबा, आपण सगळे मिळून खाऊ या ना?"
"मला खूप झोप येत आहे रे. तू आणि तुझी आई खा, मी झोपतो."
"बाबा, प्लीज, एक घास?"
पण वीर हे बोलेपर्यंत आदित्य तसाच झोपून गेला होता. आणि रडणारा वीर एका बाजूला आईला चायनीज भरवत होता.
दुसर्या दिवशी सकाळी अर्चनाने आदित्यशी शेवटचे बोलायचे ठरवले होते.
"आदित्य, तू काय ठरवले आहेस?"
"कशाबद्दल?
"आपल्या संसाराबद्दल"
" काय करायचे म्हणजे?"
" हे बघ , एक तर तू दारू सोड , नाही तर मला. ...मी हे रोज रोज नाही सहन करू शकत. आणि माझे सोड. वीरचे काय? काल तो तुझी किती वाट पहात होता. तुला त्याचेही काही वाटत नाही?"
"खरेच सॉरी कालच्यासाठी. पण एक मिटिंग होती. तिथे मला थोडी घ्यावी लागली."
"कोणाशी खोटे बोलतो आहेस?काल तू फोन उचलत नव्हतास म्हणून मी तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता. तिथे त्यांनी मला सांगितले कि तू ऑफिसमधून कधीच निघाला आहेस."
"हे बघ अर्चना , काही अशा गोष्टी आहेत कि मी तुला नाही सांगू शकत."
"ठिक आहे मग. मी आत्ता हे घर सोडते आहे, तुला जेव्हा सांगावेसे वाटेल तेव्हाच मी घरी परत येईन."
"अर्चना, प्लीज मला थोडे समजून घे."
"मी खूप प्रयत्न केला, पण आता नाही. तुला दारू सोडायची नाही, मुलाकडे दुर्लक्ष करायचे आहे. गेले काही दिवस घरात पैसेही देत नाहीस. मी घर कसे चालवते हे ही समजून घेत नाहीस. त्यामुळे आत्ता नाही. रोज आई विचारते, पण तिला टेन्शन येउ नये म्हणून मी कोणालाच काही बोलले नाही, पण आता मला शक्य नाही."
आणि शेवटी अर्चनाने घर सोडले. तिला वाटत होते कि त्यामुळे तरी आदित्यला काही फरक पडेल, पण नाही. उलट आता त्याचे दारूचे व्यसन फारच वाढले होते.आणि आता तर त्याने ओळखीच्या माणसांकडून पैसे घ्यायलाही सुरुवात केली होती.
शेवटी असह्य होऊन तिने आदित्यच्या बहिणीला फोन केला.
" हॅलो ताई, अर्चना बोलते आहे"
"बोल अर्चना, कशी आहेस? वीर काय म्हणतोय?"
"तो छान आहे ताई. मला थोडे महत्त्वाचे बोलायचे होते तुमच्याशी. बोलू का?"
"अग त्यात काय? बोल ना"
"ताई, तुम्हाला माहित असेलच ना सध्या माझ्या आणि आदित्य मध्ये जे काही सुरू आहे, याबाबत ."
"हे बघ, माझ्या कानावर काही आले होते. पण तुला माहित आहे कि मी सांगोवांगी गोष्टींवर विश्वास ठेवत नाही."
"ताई मी वेगळे व्हायचे ठरवले आहे." अर्चनाने रडत सांगायला सुरुवात केली.
"मी यात काही बोलले तर तुला चालणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे तुला मनापासून वेगळे व्हायचे आहे?"
" नाही ओ ताई, पण आत्ता जे आदित्य वागत आहे ते खरेच मला सहन होत नाही. आम्ही खूप सुखात होतो. पण गेले दोन महिने जणू कोणाची दृष्ट लागली आहे आमच्या संसाराला. तो खूप बदलला आहे. आणि त्याचा माझ्या बाळाला त्रास होतो आहे.
" या विषयावर तू त्याच्याशी बोललीस का?"
"मी खूप प्रयत्न केला , पण त्याचे एकच पालुपद थोडा वेळ दे. पण काय झाले आहे हे तो सांगतच नाही. माझ्या आईबाबांनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो भांडला त्यांच्याशी. तो कधीच असा नव्हता. माझा जुना आदित्य कुठेतरी हरवला आहे." अर्चनाला रडू आवरत नव्हते.
"एक काम कर , मला थोडा वेळ दे मी बोलते आदित्यशी. तोपर्यंत तू शांत रहा. वीरची आणि तुझ्या आईबाबांची काळजी घे. सगळे नीट होईल."
ताईचे बोलणे तिचे यजमान ऐकत होते. "काही अडचण आहे का?"
" हो आपल्या कानावर आलेले खरे आहे. तशी आईने सुद्धा मला कल्पना दिलीच होती या दोघांबद्दल. पण मीच ठरवले होते कि जोपर्यंत माझ्यापर्यंत काही येत नाही तोपर्यंत होता होईल तेवढे मध्ये पडायचे नाही. आता बहुतेक ती वेळ आली आहे. मी आदित्यला भेटून येते."
"मी यायची गरज आहे का?"
"सध्या नको. उगाच त्याला ऑकवर्ड वाटायला नको."
" ठिक आहे. तुझी इच्छा. पण त्याला काही गरज लागली तर नक्की सांग. आपण करू त्यांच्यासाठी काही तरी"
ताई आदित्यच्या घरी आली. तेव्हा तो बाहेर जाण्याच्या तयारीतच होता.
" काय बहिणाबाई, आज एकदम इथे धाड?"
" हो काय करणार, आजकाल तू आम्हालाच काय तुझ्या भाचरांनादेखील विसरला आहेस. बिचारे मामा मामा म्हणून तुझी आठवण काढतात, तुला फोन करतात. तर तू भेटतही नाहीस आणि फोनही उचलत नाहीस. म्हणून म्हटले आज तुला surprise द्यावे. चालेल ना?"
"हे काय विचारणे झाले" पण हे बोलताना आदित्यचा चेहरा खूपच पडला होता. तो खरेतर स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा गेले काही दिवस भेटला नव्हता. आता अचानक ताईला बघून त्याला खूप भरून आले होते आणि आता त्याला रडू आवरेना.. त्याचे रडणे पाहून ताईला खूपच धक्का बसला.
" अरे झाले तरी काय? आणि असा का रडतो आहेस? तिथे ती अर्चना रडती आहे इथे तू. अरे त्या छोट्या मुलाचा आणि आईबाबांचा तरी विचार कर. ते एवढेसे पोर किती घाबरले आहे. कोणाकडे जायला मागत नाही कि यायला. आईचे बिपी वाढले आहे. पण तू तिलाही भेटत नाहीस.. एवढे काय झाले आहे?"
हे सर्व ऐकून मात्र आदित्यला राहवेना. त्याने ताईला जे काही त्याला ऑफिसमधून कमी करण्याचा विचार चालू आहे ते सांगितले. त्याने अजून काही ठिकाणी सुद्धा इंटरव्ह्यू दिले होते. पण कुठेच त्याची निवड होत नव्हती. हे सगळे अर्चनाला सांगायची हिंमत होत नव्हती.
"अरे पण, तिला नव्हते सांगायचे. पण मला तरी सांगायचे. किंवा इतर वेळेस तुझ्या भावजींशी बोलतोस त्यांच्याशी तरी बोलायचेस."
" माझी खरेच चूक झाली. पण माझ्या लक्षातच आले नाही ग. मला सगळेच हवे आहेत. तूच सांग मी आता काय करू?"
"अरे वेड्या, या अशा गोष्टी घरातल्यांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? आणि अशा वेळेस जवळची माणसेच कामाला येणार ना? चल डोळे पूस. आपण घरी जाऊ. तिथे यांच्याशी बोलून काही तरी ठरवू"
सगळी चर्चा करून नंतर आदित्यने एक नवीन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला ज्यात भांडवल अर्चनाच्या वडिलांनी आणि त्याच्या ताईने गुंतवले. काही महिन्यातच त्याचा जम बसला आणि परत सगळ्यांच्या चेहर्यावर हास्य आले. त्यानिमित्त त्यांनी घरी सत्यनारायणाची पूजा केली आणि सर्वांनाच जेवायला बोलावले. ताई घरी येताच अर्चनाने त्यांचे पाय धरले आणि म्हणाली आज तुमच्यामुळेच हा दिवस आम्हाला दिसतो आहे. नाही तर घटस्फोटाचे विचार माझ्या मनात येत होते. तुमचे कसे उपकार मानू हेच कळत नाही..
ताई तिला जवळ घेऊन म्हणाली " अग, आपल्या माणसांचे का उपकार मानतात. पण हिच गोष्ट तू जर आधीच आम्हाला विश्वासात घेऊन सांगितली असतीस तर ती वेळच आली नसती. असो शेवट गोड तर सगळेच गोड.. झाले गेले सोडून द्या आणि असेच सुखात राहा."
हे ऐकून वीर जोरात हो म्हणाला आणि त्याचा होकार ऐकून सगळेच हसू लागले..
गोष्ट लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा