Login

सारिका - ( भाग - 2 )

Sarika


      सारिका ने त्या दिवशी बाबांन बरोबर जास्त काहीन बोलता पटकन फोन ठेवला. बाबांना पण वाटल कि नवीन लग्न झाले आहे गडबडीत असेल म्हणून जास्त बोलली नाही. मग आईने दोन दिवसांनी फोन केला तर सारिका बोलली आई मी ऑफिस ला आहे, काम आहे मी नंतर कॉल करते. आई - बाबांना काळजी वाटत होती कि सर्व ठिक आहे ना, आई सारिका ला सांगणार होती कि वेळ मिळाला कि योगेश ला घेऊन भेटायला ये घरी, पण सारिका जास्त बोललीच नाही, त्यामुळे आई सांगू शकली नाही.

          इकडे  सारिका आणि योगेश ने पळून जाऊन लग्न केले असल्यामुळे त्याच्या घरातल्यांनी त्या दोघांना घराच घेतलेच नाही, त्याची आई दरवाजात त्या दोघांना बघूनच बोलली कि योगेश तू आधीच तूझ्या वागण्याने आम्हाला खूप त्रास दिला आहेस त्यातून आता लग्न करून आलास, तुझ्या रात्री उशिरा येणे, गुटखा खाणे, दारू पिणे ह्या सवयीमुळे आम्ही आधीच खूप त्रासलो आहोत.

        आता बायको ला घेऊन दुसरीकडे राहायला जायचं, तुझा वेगळा संसार थाटायचा, तुम्ही तुमचे वेगळे रहा, सारिका - योगेश कडे बघतच राहिली तीला ह्या सर्वातलं काहीच माहित नव्हत. कधीतरी पार्टी ला वैगरे जराशी ड्रिंक घेतो एवढं चं तीला योगेश ने सांगितले होते, सारिका त्याच्या आई चा तो राग बघूनच घाबरली. आई जोरात ओरडून बोलत होती, त्यामुळे बिल्डिंग मधले लोक पण गोळा होऊ लागले. सारिका योगेश ला थोड्या वेळाने बोलली चल आपण जाऊ दुसरीकडे रूम बघूया.

      योगेश पण तिच्याबरोबर निघाला. सारिका चांगल्या कंपनी मध्ये कामाला असल्यामुळे तीला चांगला पगार होता. योगेश बऱ्या पैकी एका ऑफिस मध्ये जॉब ला होता.  जास्त असा काही पगार नव्हता त्याला. योगेश ने बारावी नंतर, कॉम्पुटर चा साधा कोर्स करून पुढचं शिक्षण थांबवलं होत. 

      सारिका आणि योगेश ने दोन दिवस योगेश च्या मित्राकडे राहिल्यानंतर एका बिल्डिंग मध्ये भाड्याने रूम घेतला.  आणि मग सारिका आणि योगेश ने अगदी शून्यातून सुरवात केली, नवीन भांडी, नवीन वस्तू, सगळा संसार उभा केला. सारिका ची सेविंग होती, योगेश कडे पण थोडे पैसे होते त्यातून ह्या सर्व वस्तू त्यांनी घेतल्या. 

        योगेश च्या एक एक सवयी हळू हळू तिच्या दिसण्यात येऊ लागल्या. योगेश तिच्या एक तास आधीच ऑफिस मधून येत असे, फ्रेश होऊन सिगारेट ओढत टीव्ही बघत असे, सारिका दमून आल्यावर तीला घरात असलेल्या त्या सिगारेट च्या वासानेच नकोसं होत असे. तीला कसतरीचं होत असे. योगेश च्या ह्या सर्व सवयी त्याने जाणूनबुजून सारिका पासून लपवून ठेवल्या होत्या, हे सर्व सारिका ला -  लग्नानंतर कळले. योगेश ने सारिका ला चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे हे बघूनच तिच्याशी लग्न केले होते. 

         सारिका ला आपण ह्याच्याशी लग्न करून मोठी चुक केली हे आठ चं दिवसात समजून आले, पण आता पर्याय नव्हता. त्यामुळे ती आई - बाबांना हे काहीच फोन वर सांगू शकत नव्हती. योगेश लग्नानंतर पंधरा चं दिवसांनी दारू पिऊन घरी आला, सारिका ने विचारलं तर तो बोलला अग ऑफिस मध्ये जरा पार्टी होती म्हणून  पियालो, सारिका बोलली अरे पण कमी पियायचीस ना, तर तो सॉरी बोलून झोपायला पण गेला, सारिका त्याची बराच वेळ वाट बघत  आहे, जेवायची थांबली आहे हे त्याच्या ध्यानी मनी पण नव्हते.

        सारिका  च्या लग्नाला तीन महिने होत आलेले असतात आणि एक दिवस तिचा दोन नंबर चा भाऊ तीला फोन करून सांगतो कि तिचा शेवटचा भाऊ वारला. सारिका ला आधीच तो मतिमंद असल्यामुळे त्याच्याबद्दल आस्था कमी होती, सारिका ने हा मी येते बोलून फोन ठेवला, सारिका ऑफिस मधून कॉल करून योगेश ला कळवते, योगेश बोलतो तू जा मला ऑफिस मध्ये खूप कामं आहे. सारिका एकटीच जायला निघते.

        सारिका दोन तासात माहेरी पोचते, थोडया वेळाने प्रेत नेलं जातं, आणि प्रेत गेल्यावर अर्ध्या तासात चं सारिका लगेचच आई ला बोलते मी निघते,  बाबा बोलतात अग सारिका सगळं व्यवस्थित आहे ना तू खूप बारीक झाली आहेस, तर सारिका हो बाबा सगळं ठीक  आहे असं बोलते. आई बोलते अग थांब थोडावेळ  - तर सारिका नको नंतर येईन कधीतरी बोलून निघते पटकन, सारिका ला भीती वाटत असते, कि पाहुणे विचारतील कि नवरा काय करतो, कुठे राहता सध्या हे  प्रश्न कोणतरी विचारणार म्हणून सारिका निघते.

       सारिका योगेश च्या व्यस्नांना कंटाळलेली असते, तीला तो गुटखा, सिगारेट, ह्याचा घरात असलेला वास सहन चं होत नसे, तीला त्यामुळे जेवण पण जातं नसे. तिची तबेत दिवसेंदिवस खालावत चालली होती. योगेश ला त्याचं काहीच वाटत नसतं, तो जास्त घरी पैसे पण देत नसे. त्याला माहित होत सारिका ला पगार चांगला आहे, ती घरात लागणार सामान आणेल हे त्याने जणू गृहीतच धरलं होत.

      हळू हळू ह्या सर्व गोष्टींमुळे सारिका आणि योगेश ची भांडण होऊ लागली, सारिका ची चिडचिड होऊ लागली. आणि मग भांडण होता होता योगेश नशेत तिच्यावर कधीतरी हात उचलू लागला. मग रोज चं दोन चार दिवसांनी त्या दोघांची भांडण होऊ लागली.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत, सारिका - योगेश च्या संसाराचे पुढे काय होते. )

0

🎭 Series Post

View all