सारिका ला माहेरी जाऊन आता एक महिना होत आलेला असतो, सारिका आई ला बोलते मी जाते आता घरी, आई बोलत असते अग थांब अजून, पण सारिका बोलते नको योगेश पण एकटाच असतो, त्याचे जेवणाचे हाल होतायत, आई बोलते बरं बाई जा तू पण योगेश ला इकडेच बोलावं तुम्हाला दोघांना न्ह्यायला, तो तुझं लग्न झाल्यापासून आपल्याकडे जेवायला सुद्धा आलेला नाही आहे अजून, त्याला दुपारी बोलावं आणि जेवून तुम्ही दोघं आरामात संध्याकाळी बाबू ला घेऊन जा.
सारिका ला पण ही संकल्पना पटते, ती योगेश ला फोन करून सांगते येत्या रविवारी आम्हाला न्यायला ये, योगेश हो चालेल बोलतो. योगेश सकाळी दहा च्या सुमारास अंधोळ वैगरे आटपून सारिका च्या माहेरी जायला निघतो. सारिका ला कॉल करून कळवतो मी निघालोय असं. ती पण बोलते गाडी हळू चालव, घाई करू नकोसं, आरामात ये असं.
बारा वाजले तरी योगेश पोचत नाही, म्हणून सारिका योगेश ला फोन लावते तर फोन कोण उचलत नसतं, सारिका सतत कॉल करून आता काळजीत पडते, घरी सगळेच बोलतात अग येईल तो गाडीवर आहे म्हणून कॉल उचलत नसेल, पण सारिका ला भीती वाटू लागते. सारिका रडायला लागते.
असं करता करता दोन वाजत येतात तेव्हा मात्र सगळेच काळजीत पडतात, आणि थोडायचं वेळात योगेश च्या मोबाईल वरून एका माणसाचा कॉल येतो, सारिका चं उचलते, तो माणूस विचारतो, हा फोन आहे ते तुमचे कोण, तर सारिका बोलते मिस्टर, तो व्यक्ती सांगतो, ह्यांचा अपघात झाला आहे, खूप लागले आहे मी ह्यांना हॉस्पिटल ला नेतो, तो पर्यंत तुम्ही पण हॉस्पिटल ला या.
सारिका जोरजोरात रडायला लागते, सर्वांना सांगते काय झालंय ते, सगळेच पटकन हॉस्पिटल ला जायला निघतात. हॉस्पिटल ला पोचल्यावर, सारिका रडतच योगेशजवळ जाते, त्याची कंडिशन क्रिटिकल असते, सारिका डॉक्टरांना बोलते डॉक्टर प्लीज तुमचे सगळे प्रयत्न करा, पण ह्याला वाचवा, डॉक्टर बोलतात हो आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत.
सारिका सारखा देवाचा धावा करत असते. सगळेच काळजीत असतात, डॉक्टर खूप वेळाने बाहेर येऊन बोलतात ते वाचलेत पण त्यांचा कमरेखालचा भाग निकामी झाला आहे. सारिका बेशुद्ध पडते हे ऐकून, सगळे रडू लागतात. योगेश चा भाऊ आई - वडिल पण आलेले असतात.
हॉस्पिटल ला पंधरा दिवस ठेवून योगेश ला घरी सोडण्यात येत, घरचे बोलतात सारिका तू आता कसं मॅनेज करणार आहेस हे सगळं एकतर बाळ पण खूप लहान आहे, योगेश ची आई बोलते तुम्ही आता आमच्याबरोबर आमच्याकडे चला, तुला एकटीला हे सगळं कसं काय जमणार.
सारिका च्या माहेर चे पण बोलतात कि हो सारिका तू आता सासरी चं जा, तिथे भाड्याच्या खोलीत आता नको राहूस, सासरी गेलीस तर तुला सोबत पण होईल. बाबू पण लहान आहे, योगेश पण आता चालू शकत नाही. त्यामुळे सासू - सासरे, दीर ह्यांची तुला मदत होईल.
सारिका - योगेश ला विचारते, योगेश पण चालेल बोलतो, आणि सारिका सासरी जाते, सारिका तीन महिन्यानी कामावर जायला लागते, बाळ आता तिच्या सासू बरोबर राहात असे. योगेश ला चालता येत नसल्याने त्याचं सगळं चं करावं लागत असे, पण सारिका कंटाळा न करता सर्व करत असे.
योगेश ची आई पण मनातल्या मनात बोलते ही मुलगी एवढं सर्व होऊन पण खचली नाही, सर्व हिमतीने करते आहे, नोकरी पण करते आहे, बाळ रात्री रडलं तर त्याच्यासाठी जागी पण राहते आहे. सकाळी योगेश च पण आवरून जाते आहे. योगेश च्या घरचे पण सारिका बरोबर आता चांगले मिळून मिसळून राहू लागतात.
पण योगेश ला ती त्याचं सगळं करते हे बघून आपण तीला दिलेला त्रास आठवत असे, त्याला खूप वाईट वाटत असे, तो सारिका ला म्हणतं पण असे.... कि माझ्यामुळे ही तुझ्यावर काय वेळ आली आहे. पण सारिका त्याला कदाचित हेच आपल्या नशिबात असेल असं बोलून विषय सोडून देत असे.
सारिका मनातल्या मनात बोलत असे कि माझ्या मतिमंद भावाला कायम च दुय्यम लेखलं, त्याच्या बद्दल भाऊ म्हणून मला कधीच आस्था वाटली नाही म्हणून देवाने माझ्या नवऱ्याला कायमच अपंग करून मला ही शिक्षा दिली आहे...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सारिका पुढचं जीवन कसं व्यतीत करते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा