देवाच्या कृपेनें सारिका चांगली नोकरीला असते तिला पगार पण चांगला असतो, त्यामुळे सारिका तिच्या सासरच्यांवर अवलंबून नसते, ती तिच्या पगारातून मुलाचा, तिचा आणि योगेश चा खर्च करत असे.
योगेश व्हिल चेअर वर असे, घरी प्रत्येक जण आपापल्या कामात असे त्यामुळे तो घरी बोर होत असे, सारिका सुट्टी च्या दिवशी त्याला व्हिल चेअर वरून जवळ च्या पार्क मधून फिरवून आणतं असे. तो सारिका ला सारखा बोलत असे मी तुझ्यावर ओझं बनून राहिलोय ना आता, सारिका त्याला समजावत असे कि अरे असे काही नाही आहे. मी प्रेमाने करतेय तुझं सगळं.
सारिका चा मुलगा श्रेयस हळू हळू मोठा होत असतो. श्रेयस पहिलीला असतो, सगळं नीट चाललेलं असत, कालांतराने सारिका च्या छोट्या दीराचं लग्न ठरत. सारिका पण सासू ला लग्नाच्या तयारीला नोकरी सांभाळून जमेल तशी मदत करते.
लग्न होत, नवीन सून घरी येते. सारिका चार दिवसांची सुट्टी संपवून पुन्हा ऑफिस ला जायला लागते. सारिका ची नवीन जाऊ बाई गृहिणी च असते. त्यामुळे सासू तीला सारिका चा मुलगा शाळेतून आला कि त्याला जेवायला वाढ़, किंवा योगेश ला जेवण नेवून दे, अशी छोटी मोठी कामं सांगत असे. तीला ते आवडत नसे.
ती कुरकुरत असे, तीच म्हणणं असे ही सारिका ऑफिस ला जाणार बिनधास्त आणि हिच्या ह्या दोन माणसाचं मी दिवसभर करत राहायचं. सारिका च्या एक दोनदा ते कानावर पडलं होत, पण सारिका म्हणतं असे, योगेश हा असा तो कसा स्वतः च मॅनेज करणार, असा विचार करून सारिका काहीच बोलत नसे.
पण एकदा रात्री सारिका चा मुलगा तीला बोलला कि मम्मी - काकीं....पप्पा आणि मला हिडीस पिडीस करते, हाक मारली तर आमच्याकडे लक्ष देत नाही, मला तर सारखी दिवसभर ओरडत असते. तेव्हा - सारिका त्याला बोलते तू झोप आता मी आजीशी बोलते सकाळी,........सकाळी सारिका सासू ला सांगते कि आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सासू बोलते अग पण घरी कोण करणार सर्व, योगेश हा असा, सारिका बोलते मी एक बाई ठेवेन कामाला, आणि सारिका दोन चं दिवसात एक रेंट वर रूम बघून तेथे शिफ्ट होते, सारिका मनातल्या मनात बोलत असते, देवा दुसऱ्यांदा भाड्याने रूम घेण्याची वेळ आणली आहेस माझ्यावर, सारिका ला खूप वाटत असे कि स्वतः चं हक्काचं घर असावं म्हणजे अकरा महिन्यांची अग्रीमेंट संपल्यावर कोणीच रूम बदला असं बोलणार नाही.
श्रेयस - स्कूल बस ने शाळेत जातं असे, योगेश घरीच असे त्यामुळे सारिका ला - श्रेयस ची तशी काळजी नह्वती. कामवाली बाई येऊन दुपारी जेवण करून योगेश ला वाढून जातं असत.
सारिका आता जरा निवांत होती. तिच्या नोकरीत ही तीला प्रमोशन मिळत, पगार ही चांगला वाढतो. योगेश सारिका ला बोलतो अग मी घरी राहून राहून कंटाळतो गं रोज तू तूझ्या ओळखीत कोणाला तरी सांगून बघ ना कामाबद्दल...मला घरी राहून काही कामं करण्यासारखे असेल तर बघ जरा. सारिका बोलते हो बरं बघते.
सारिका च्या एका मैत्रिणी च्या ओळखीने ती डेटा एन्ट्री च - घरातून कॉम्पुटर वरच कामं योगेश ला बघून देते, घरातून योगेश कामं करू लागतो त्याला खूप आनंद होतो. पैसे अगदि कमी मिळत असतात पण योगेश खुश असतो हे बघून सारिका ला बरं वाटत.
योगेश आणि सारिका चा संसार चांगला चाललेला असतो, सारिका चा मुलगा - श्रेयस ही अभ्यासात हुशार असतो अशीच मध्ये पंधरा वर्ष निघून जातात, सारिका च्या भावाचं ही मध्यंतरी लग्न होत. सारिका ला स्वतः च घर घ्यावं असं खूप वाटत असत, ती योगेश ला बोलते मी ऑफिस मध्ये लोन साठी अर्ज टाकते, बघू काय होतय ते, देवाच्या कृपेनें तीच लोन पास होत आणि फायनली लग्नानंतर सतरा वर्षांनी सारिका स्वतः च घर घेते.
योगेश नवीन घराच्या वास्तुशांती च्या दिवशी अक्षरशः रडून सारिका ला बोलतो मी दुःख च दिल तुला आयुष्यात पण तू, तरी ही मला सांभाळून स्वतः च्या हिमतीवर घर पण घेतलेस.
सारिका ही रडते आणि बोलते कदाचित देवाला हेच मान्य असेल. पण आता सगळं ठीक होणार आहे बघ, आपला श्रेयस मोठा झाला कि मी आराम करणार आहे तुला पण कुठे कुठे फिरायला नेणार आहे, योगेश बोलतो मी अपंग झाल्यामुळे तुला कुठे नेऊ शकलो नाही तुझी हौस मौज करू शकलो नाही, सॉरी सारिका.
सारिका बोलते अरे योगेश मी खुश चं आहे माझा संसार खडतर असावा असंच देवाच्या मनात होत. चल आता झाले ते झाले. हस बघू, श्रेयस, सारिका, योगेश हसून खेळून राहतात.
कालांतराने श्रेयस डेंटिस्ट होतो, त्याचं क्लिनिक काढतो. सर्व व्यवस्थित होत.
( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )
( राहणार - देवरुख - रत्नागिरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा