सरते वर्ष
सरत्या वर्षात बाबांनो
खूप काही पाहिलं
कोरोना नावाचं संकट
सारी पृथ्वी व्यापून राहिलं
ज्याच्या त्याच्या तोंडात
लॉक डाऊन अन् कोरोना
त्या टी व्ही वाल्यांनी पण दाखवला
अमेरिका,स्पेन अन् चायना
डॉक्टरांनी साऱ्या
दिवस - रात्र मेहेनत घेतली
पी पी ई नावाची किट
अंगाला बसवून घेतली
पूर्वी माणूस आला की
घरातल्यांना आनंद व्हायचा
आता आपला पोरगा सुधा
घराबाहेर राहायचा
टेस्ट,लॅब, पॉझिटिव्ह, निगेटिव्हनी
सारं जग व्यापून टाकलं
असलं कसलं पिल्लु हे
चीन्यांनी होत पोसलं
ऑफिस,शाळा, कारखाने
सारं काही बंद झालं
कधी नाही ते,
आमच्या लोकलचं पण गाडं थांबलं
आता या नव्या वर्षात
मनात एकच आशा आहे
कोरोना तर जाऊ देचं.....
पण,माणसाला जगण्याची नवी दिशा दे.......
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको होवू देवू
पृथ्वीवासी सारे गुण्या - गोविंदाने नांदू .
प्रीत
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा