प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: सर्वोत्तम नाही, पण उत्तम ! भाग-१
सकाळी तिची गडबड सुरू होती.
"मला ना हे असे नको, असे हवे आहे." त्याची मुलगी श्रीजा म्हणाली.
"म्हणूनच मी म्हणत होते ना की, मी तुझी व्यवस्थित वेणी घालून देते." श्रीजाची आजी म्हणाली.
" अगं, पण तू डब्बा बनवत आहेस ना आणि बाबांनी मागच्या वेळेस मस्त दोन वेण्या घातल्या होत्या." ती सांगत होती
" हे बघ, व्हिडिओ कॉल आला आहे, पटकन आईशी बोल." श्रीकांत म्हणजेच श्रीजाचे बाबा तिला म्हणाले.
"काय मग आज स्पोर्ट्स डे आहे ना ? झाली का सर्व तयारी ? " समोर व्हिडिओ कॉल चालू होता तेव्हा श्रीजाच्या आईने विचारले.
" हो, झाले तर आहे; पण हे बघ ना बाबांनी माझी वेणी कशी घातली आहे!" तोंड वाकड करत ती बाबांची तक्रार करत होती.
" बाळा, चांगली वेणी घातली आहे ना, तसं पण आता तू खेळत असताना त्याकडे एवढे कोणी लक्ष देणार नाही." ती आपल्या मुलीला समजावत सांगत होती.
श्रीजा आपल्या बाबांसोबत शाळेमध्ये गेली होती. स्पोर्ट्सडे असल्यामुळे एका तरी पालकाला सोबत घेऊन यायचं, असा नियम शाळेने घातलेला होता.
आज आपण हरणार असाच विचार श्रीजा करत होती, कारण तिने कधीच तिच्या बाबांना कोणताही खेळ खेळताना बघितले नव्हते, परंतु यावर्षी मात्र तिची आईसोबत नसल्यामुळे त्यांना यावे लागले होते.
"बाबा, मी नाव मागे घेऊ का? कारण तुम्हाला काही येत असेल असे मला वाटत नाही." सात वर्षाची श्रीजा म्हणत होती.
"आपण प्रयत्न तर करू. नाहीच काही झाले तर ठीक आहे, पुन्हा तूच बोलशील की मी काहीच केले नाही." श्रीकांत तिला समजून सांगत होता.
" पण आपण जर हरलो तर सगळे मला हसतील ना ?" तिने दुसरा प्रश्न विचारला.
" हसणारे हसू दे त्यांना. त्यांचे दात दिसतात, पण आपण एक प्रयत्न तर करूया." तो म्हणाला.
एकूण पाच खेळ मुलांसोबत खेळले जाणार होते. त्यातल्या पहिल्या दोन खेळांमध्ये श्रीकांतला ते न समजल्यामुळे दोघेजण हरले होते.
" बघा बाबा, मी म्हंटले होते ना तुम्हाला की, तुम्ही नका खेळू म्हणून. बघा सगळे माझे फ्रेंड्स मला हसत आहेत." ती हसणाऱ्या तिच्या फ्रेंड्सकडे बघून म्हणाली.
खरंच आपल्याला काही जमत नाही का, असेच श्रीकांतला आता वाटायला लागले होते.
त्यांनी विचारल्यावर आता आधीच नाव दिल्यामुळे ते नाव मागे घेता येणार नाही, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले होते.
पुढचा खेळ हा दोघांचे पाय बांधून पळायचं होतं त्याच्यामध्ये श्रीकांतने श्रीजाला व्यवस्थित पकडले होते आणि सुरुवातीला हळूहळू जाणारे दोघेजण त्यात शेवटी, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस त्यांना मिळाले होते.
त्यामुळे श्रीकांतला सुद्धा आता आत्मविश्वास येत होता की, चला एक तरी आपण बक्षीस जिंकलो. त्यानंतर दुसरा खेळ हा खांद्यावर आपल्या मुलांना घेऊन पळण्याचा होता. काही पालक तर मध्येच पडले होते, परंतु या खेळामध्ये श्रीकांत आणि श्रीजाने पहिला क्रमांक पटकावला होता.
श्रीजाला तर खूपच आनंद झालेला होता, ती त्या मैदानामध्येच आनंदाने उड्या मारत होती.
"बाबा, आता शेवटचा खेळ आहे आणि आपण त्याच्यामध्ये जिंकायचे." ती म्हणत होती.
"हो बेटा, आपण नक्की जिंकण्याचा प्रयत्न करायचा." तो तिच्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाला.
शेवटच्या खेळामध्ये काही गोष्टी दिलेल्या होत्या आणि त्या कमी वेळामध्ये पटकन व्यवस्थित नीट क्रमाने लावून कमी वेळामध्ये पूर्ण करून शिक्षकांकडे द्यायच्या होत्या.
अटीतटीचा सामना शेवटी चालू होता आणि त्यामध्ये श्रीजाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता. पहिला क्रमांक आपल्यालाच मिळणार असा विचार केलेले ते, दुसऱ्या क्रमांक प्राप्त झालेला पाहून श्रीजा मात्र थोडीशी हिरमुसली होती.
तिने नाखुशीने त्याचे बक्षीस घेतले होते.
आपल्या मुलीचा चेहरा पडलेला पाहून श्रीकांतलाही वाईट वाटले, आता काय करावे हे त्याला समजत नव्हते.
मुलांमध्ये खेळाडू वृत्ती असावी, परंतु हार नि जीत या दोन्हीची सवयही असावी; असाच विचार करणारा श्रीकांत आता श्रीजाला कसे समजावे याचाच विचार करत होता.
तेवढ्यात त्याच्या मोबाईल वाजला.
क्रमशः
काय करेल श्रीकांत?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा