Login

सासू आई होईल का... (भाग १)

सासू आई होईल का?
अनोळखी नंबर वरून फोन येतो...

विशाखा पोळ्या लाटता लाटताच फोन  बघते...
अनोळखी नंबर बघून ती फोन उचलत नाही...

विशाखाच्या सासूबाई बाजूलाच भाजीची तयारी करत असतात . त्या तिला बोलतात अगं विशाखा त्याच नंबर वरून तुला पुन्हा फोन येत आहे , बघ तरी कोणाचा फोन आहे.

" विशाखा फोन उचलते... आणि स्पीकरवर टाकते पोळ्या करत करतच ती फोनवर बोलत असते".

हॅलो कोण?

'हॅलो,.... विशू ओळखलस का?

कोण?.... विशाखा विचार करत बोलतेsss

'ओळखलं नाहीस  मला' ? अगं मी वनू बोलते ...वनिता.

वनिता तू ! एवढ्या  वर्षांनी फोनवर वनिताचा आवाज ऐकून विशाखा ला खूप आनंद होतो ...माझा नंबर तुला मिळाला तरी कुठे?

अगं तुझा नंबर आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून शोधत आहोत. तुझ्या मावस बहिणीकडून तुझा नंबर घेतला.

कशी आहेस तू? वनिता...

'मी बरी आहे ,‌ तू कशी आहेस'?

मी पण अगदी मजेत लग्न होऊन एवढी वर्ष झाली, आपण दोघी कधी एकमेकींसोबत  बोललोच नाही?

हो ना... माझा तर  सगळा दिवस घरातली काम करण्यातच जातो . तरी सासूबाई मला सर्व कामांमध्ये मदत करतात... विशाखा बोलते.

दोघींचे बोलणे सासूबाई  भाजी फोडणीला घालत असताना ऐकतात.

बरं तू फोन कशासाठी केला होता. विशाखा विचारते.

'अगं, आपल्या कॉलेजच्या ग्रुप मधील सगळ्याजणी दोन दिवस लोणावळ्याला फिरायला जाणार आहेत . तेव्हा तू देखील आमच्या सोबत यावं अशी आमची इच्छा आहे.

मी आणि दोन दिवस फिरायला ! 'नाही गं '...नाही जमणार! मुलांच्या शाळा यांचं ऑफिस आणि आईंवर घराची जबाबदारी सोडून  फिरायला जाणं म्हणजे शक्यच नाही...

'अगं ... दोन दिवसांचा प्रश्न आहे'.

बरं..... मी घरातल्यांना विचारून तुला नंतर फोन करून सांगते..

अगं आपण सगळ्याजणी ट्रीपला जाताना नेमून दिलेला ड्रेस कोडच घालायचा आहे...

म्हणजे मला समजलं नाही.... विशाखा बोलते?

म्हणजे... हे बघ....लोणावळ्यात एकविरेला जाताना आपण सगळ्याजणींनी साड्या नेसायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी लोणावळ्यातील विविध पॉईंट बघायला जाताना सगळ्याजणी जीन्स व टी-शर्ट घालणार आहेत. "संध्याकाळी मस्त पार्टी ऑर्गनाईज केली आहे,  त्यावेळी सर्वांनी वन पीस घालायचे आहेत"...त्यानंतर आपण लगेचच रिटर्न येणार आहोत. वनिता ट्रीपचा प्लॅन तिला सविस्तर समजावून सांगते...

त्यावर विशाखा बोलते....एकतर मी ट्रीपला येईल की नाही मला माहिती नाही. आणि ट्रीपला आली तरी वन पीस आणि जीन्स घालणं मला शक्य नाही. मी साडी आणि ड्रेस घालू शकते.

'अगं, पण वीशू .... तू लग्नाआधी जीन्स घालायची ना ? मग आता काय हरकत आहे..

"लग्न आधीची गोष्ट वेगळी होती . आता माझं लग्न झाल आहे. लग्न झाल्यापासून दहा ते पंधरा वर्षात मी ड्रेस आणि साडी शिवाय दुसरे काही घातले नाही".

"अगं तुला  सासरी थोडीच घालायचा आहे....आपण इकडे फिरायला येणार इथे घालायचा आहे . आणि  लोणावळ्यात ओळखीची एकही व्यक्ती तुला तिथे भेटणार नाही... मग वन पीस आणि जीन्स घालायला हरकत काय आहे....

"हो चालेल....' मी घरातल्यांना विचारून तुला उद्या सकाळी फोन करून सांगते'.

वन पीस आणि जीन्स टी-शर्ट घालण्यासाठी सासूबाई परवानगी देतील का?


0

🎭 Series Post

View all