सासू सून आणि लेक
ती फोटो काढतांना नवऱ्याच्या अगदी जवळच बसली होती ,त्याच्या हातात तिचा हात अगदी घट्ट पकडलेला होता..त्याने तिच्या डोळ्यात पहायचे होते..आणि तिने ही असे फोटोग्राफर सांगत आणि तसे ते करत होते..
इकडे मुलगी असे छान छान फोटो काढत आहे हे पाहून आईला खूप आंनद होत होता ,जणू लक्ष्मी नारायणाचा जोडा हो..राम सीता..तिची बोटे मोडून नजर काढत होत्या, सगळ्यांना बोलावून दाखवत होत्या..तोच मुलगी खाली उतरल्यावर आई म्हणाली ,अजून थोडे फोटो काढायचे होते ग..अजून जरा जवळ खेटून बसायचे होते..हेच दिवस असतात नवरा बायकोचे..कसे प्रेम टिकते अशाने
तोच दोघांचे फोटो काढल्यावर सून आणि मुलगा ह्यांना ही बोलून घेतले..आणि अश्याच पोज द्यायला सांगितल्या..सासूबाई तिथेच होत्या...पण आता सासूबाईची भूमिका इथे मात्र बदलली होती..ती सगळ्यांना बोलावून सांगत होती..सून बघा कशी निर्लज्जपणे फोटो काढण्यासाठी जवळ बसली आहे नवऱ्याच्या, आणि त्यात राग भरत तिच्या नावाने बोटे ही मोडली..आणि ती खाली उतरल्यावर सासूबाई जवळ जाऊन म्हणाल्या...इतक्या जवळ खेटून बसायची काहीच गरज नव्हती..आपण सून आहोत ह्या घरची जरा मर्यादा पाळायला शिका ,चार लोक बघतात आणि नावे ठेतात..अश्याने काही प्रेम दिसत नाही..
मुलगी हे सगळे बघून टाळ्या वाजवत खाली आली ,आणि आईला म्हणाली...थोडे तरी भान ठेव आई, मला जे करायला सांगतेस तेच वहिनीने केले तर मोठं मोठ्याने जगाला ओरडून सांगतेस..ती कशी मर्यादा सोडून वागत आहे हे तूच जगाला सांगत आहेस...नाहीतर जगाला कोण काय करते ह्याचे काही एक पडलेले नसते...आपण त्यांना बोलावून घेतो आणि आपल्या फाटक्यात पाया घालून मोठे करायला सांगतो...काल माझ्या सासूबाईने एक खंत बोलून दाखवली माझ्या नवऱ्याकडे ह्या आमच्या नात्याबद्दल...त्या म्हणाल्या रवी मुलगी तर चांगली आहे ,शिक्षित आहे...पण मला तिच्या आईचा स्वभाव खूप कुचका आणि संकुचित वाटला..म्हणजे घरच्या सुनेला एक वागणूक आणि घरच्या मुलीला एक वागणूक हे मला नाही पटलेले... पण तेव्हा मी माझ्या सासूबाई ला चुकीचे ठरवले...तुझी पडकी बाजू घेऊन...पण आज तूच मला त्यांच्या समोर चुकीचे ठरवले आहेस..वहिनीला नको ते बोलून..
एकीकडे सून मर्यादा सोडते म्हणायचे आणि एकीकडे मुलीला मर्यादा सोडून वागायला प्रोत्साहित करायचे हे कसे पटते...कमाल मानसिकता असते...तरी कमी होत आहे ही मानसिकता ह्यात थोडा तरी सहभाग नवीन पिढीचा आहे..
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा