सासू सून नातं...भाग 1
सासू आणि सून एक वेगळंच नातं.
"सासू-सून" हे नातं कोडया सारखच असत.
"सासू- सून" हे नातं असत बाकी मज्जेशीर.
आपले पूर्वज सांगून गेलेत कि सासू-सून ह्या आई-मुली सारख्या असतात.
प्रत्येक घरात सासू आणि सूनेच वेगळच रूप पहायला मिळत आणि त्यांच्या तितक्याच तऱ्हासुद्धा.
काही घरांत सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरांत सासू गरीब गाय आणि सून चंडीकेच दुसर रूप असते.
काही घरांत याच्या उलट चित्र असत,सासू कजाग आणि सून मवाळ असते आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका.
आता यात गंमत अशी कि या सासू - सुनांच्या भांडणात नवऱ्यांच बिचाऱ्यांच भरीत होत. ते पिसवले जातात.
हिची बाजू घेऊ? कि तिची?
नवऱ्याने हौशीने बायकोला साडी आणली तर आईचा (म्हणजेच सासूचा) टोमणा ठरलेला असतो.
"आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला वगैरे. सासुचं हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवऱ्याच्या कानात कुजबुजते.
"जरा काही हौशीने आणलं तर तुमच्या आईला पाहवत नाही."
तसच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा बऱ्याच सासवांना वाटत कि मुलाने बाहेर जाताना एकदापण आपल्याला नाही विचारल.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा