"हे बघा ताई..मी काही तोरा गाजवत नाही आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाही. जे खर होत ते बोलले मी आणि मला खोटं बोलायला आवडत नाही."श्वेता तिची बाजू मांडत बोलली.
"हो का? काय गो बाय..म्हणे खोटं बोलायला आवडत नाही..बघताय ना ओ मधुरा वन्स! हिला खोटं नाही आवडत म्हणे.." खुळचटपणाने हसून मानेतली वेणी पाठीकडे भिरकावत मैथिली बोलली.
"हम्म...आधी खोटं बोलून.. आमच्या विशालची सिंपती मिळवून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलस..मग त्याची मैत्रीण म्हणून या घरात आलीस.. ते काही खोटं नव्हत? म्हणे खोटं नाही आवडत." मधुरा अरेरावी करत बोलत होती.
"हे बघा..प्रेमाच्या जाळ्यात ओढायला तुमचा भाऊ काही सोन्याच्या मासा नाही आणि दुसरी गोष्ट कुणीच आपल खर नात घेऊन आधी फॅमिली समोर जात नाही. विशालने जे सांगितल होत मी तेच केलं होत. राहिला प्रश्न आईंच्या निर्णयाचा तर तो त्यांनी स्वतःहून घेतलाय आणि तो त्यांनी का घेतला हे स्वतःला विचारा. माझ्यावर पुन्हा कसलेही दोषारोप करण्याआधी आपण काय केलंय आणि काय करतोय याचा जरा विचार केलात ना तर जास्त बर होईल." श्वेता चिडून आतमध्ये निघून गेली.
"वहिनी.. पाहिलंस ना ग कशी बोलून गेली?" पाठमोऱ्या जाणाऱ्या श्वेता कडे बघत मधुरा बोलली.
"हो..पाहिलं सुद्धा..आणि ऐकलं सुद्धा. वन्स..मला वाटते सासूबाईंनी श्वेताला इस्टेटीचे कागदपत्र दिले असावेत. मागच्यावेळी जेंव्हा मी त्यांच्यासाठी काढा घेऊन जात होते तेंव्हा दोघीजणी कुठल्याशा कागदपत्रांबद्दल बोलत होत्या. मी गेले तश्या दोघीही गप्प झाल्या. तुम्हाला काही कल्पना आहे का ओ?" मैथिली आढावा घेत विचारलं.
"वहिनी..या घरची सून तू आहेस. चोवीस तास घरात तू असतेस मग मला कस माहीत असेल हे सगळ?" मधुरा चिडतच बोलली.
"तस नाही ओ वन्स..जाऊदे सोडा तो विषय..तुम्ही फक्त एक काम करा.. आईंकडून काही समजतय का ते बघा, म्हणजे बोलता बोलता विषय काढा." मैथिली कुठलासा विचार करत बोलली.
*****************
*****************
"ए थांबवा रे. काय..कुठून आलात? काय आहे ट्रक मधे.." हवालदाराने विचारलं
"साहेब..नवीन घराच्या शिफ्टींगच सामान आहे." भैरव बोलला.
"चल चल..खोलून दाखव लवकर.."हवालदार ट्रक वर काठीने मारत बोलला.
"ओ साहेब..खरच सामान आहे." भैरव खाली उतरत बोलला.
"अरे मग मी कुठे म्हणलो तू खोटं बोलतोय! मला खोलून दाखव बाबा..आमचं काम आम्हाला करू दे. चल खोल लवकर." हवालदार
भैरवने खाडखुड करत लॉक खोलला तसा ट्रक चा दरवाजा धाडकन खाली पडला. ट्रकच्या कोपऱ्यावर पाय ठेऊन दुसरी तंगडी वर टाकत हवालदार आत चढला.. सामानावर काठी आपटून काही गैर नाही ना ते तपासत होता. तेवढ्यात पुन्हा काही पडल्याचा आवाज आला. काठी ठोकली म्हणून सामान पडल वाटते? जरा नीट बांधून ठेवा रे..अस बोलत हवालदाराने खाली उडी टाकली आणि काढा रे गाडी बोलत पुढे गेला. भैरव जागीच उभ राहून आवाजाच्या दिशेने बघत होता.
भैरवने खाडखुड करत लॉक खोलला तसा ट्रक चा दरवाजा धाडकन खाली पडला. ट्रकच्या कोपऱ्यावर पाय ठेऊन दुसरी तंगडी वर टाकत हवालदार आत चढला.. सामानावर काठी आपटून काही गैर नाही ना ते तपासत होता. तेवढ्यात पुन्हा काही पडल्याचा आवाज आला. काठी ठोकली म्हणून सामान पडल वाटते? जरा नीट बांधून ठेवा रे..अस बोलत हवालदाराने खाली उडी टाकली आणि काढा रे गाडी बोलत पुढे गेला. भैरव जागीच उभ राहून आवाजाच्या दिशेने बघत होता.
"ए बाबा..गाडीत जे आहे ना ते योग्य जागी..सुरक्षित पोचवा..त्याचेच पैसे मोजता ना तुम्ही? जा..निघा लवकर.. सहाच्या आधी पोचायचं आहे ना?" हवालदार भैरव कडे कटाक्ष टाकत बोलला.
"हो.. हो साहेब निघतो लगेच." भैरव हात जोडत बोलला आणि लगेच ट्रक मधे चढला. ए परश्या...चल निघ लवकर..
चेहेऱ्यावर आलेला घाम टिपत भैरव बोलला. परश्याने ट्रक पळवायची सुरवात केली.
चेहेऱ्यावर आलेला घाम टिपत भैरव बोलला. परश्याने ट्रक पळवायची सुरवात केली.
"काय रे भैरव.. एवढा दांडगा आणि राकट मर्द तू..असा काय घाबरलायस?" परश्या
"आर..तो साहेब बोलला..आतमधे जे आहे.. ते योग्य जागी सुरक्षित पोचवा. निघा लवकर..सहाच्या आधी पोचा अस बोलला. च्यायला त्याला माहीत असेल काय? " भैरव सांगत होता.
"काय रे..फसणार नाय ना आपण.. आतापर्यंत जेवढ्या मॅटर मधे अडकलो त्या प्रत्येक मॅटर मधून समोरच्या पार्टीने पैसा देऊन बाहेर काढली आहे आपल्याला..यात अडकलो तर निघू ना बाहेर. मला तर आधीपासूनच थोडा डाऊट होता."परश्या पण टेन्शन मधे येऊन ट्रक पळवत होता.
(काय असेल कागदपत्रांमध्ये? हवालदार सहज बोलला असेल की त्याला ट्रक मधे काय आहे हे आधीपासुनच माहीत असेल? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
क्रमशः
@श्रावणी लोखंडे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा