Login

नवरा कि सासूचं बाळ - भाग -1

Sasu
नवरा कि सासूचं बाळं - भाग -1


(सत्य कथा)

सारिका मला तुझं खूप कौतुक वाटतं बघ, मला जे आठ वर्षात जमलं नाही ते तू आज
करून दाखवलंस, तूझ्या ह्या घरात येण्याने
मला जाऊबाईपेक्षा हक्काची मनमोकळं करायला एक मैत्रीण मिळाली आज,
मी आठ वर्ष कुढतच काढली अगं. आसावरी तिच्या जाऊबाईला बोलतं होती...

सारिका - शितोळे कुटूंबातील छोटी सुन
आसावरी - मोठी सून

आसावरी सांगू लागली - माझे वडील अतिशय कडक, त्यांनी एके दिवशी मला येऊन सांगितले
तुझं माझ्या मित्राच्या मुलाबरोबर लग्न ठरवलं आहे, त्याचा स्वतःचा बिजनेस आहे, फॅनचे पार्टस
बनवण्याची एक कंपनी आहे त्याची, दोनशे वर्कर्स आहेत. त्यांना मुलगी चांगली शिकलेली हवी आहे,
मी लग्न ठरवून आलो आहे, उदया संध्याकाळी मुलाकडचे आपल्या घरी येणार आहेत.


मी मनातून खूप चिडले होते, अरे डायरेक्ट लग्न ठरवून आले म्हणजे काय, एकदा मला
मुलगा कसा दिसतो, तुला आवडला कां, हे तरी विचारायचे होते, मी मनात असून पण
बाबांसमोर बंडखोरी करू शकले नाही, बाबा मात्र खूप खुश होते..

दुस्र्या दिवशी शितोळे कुटूंबातील लोक मला बघायला आले, त्यांना मी आवडले होते,
तुझा दीर - आलोकही मला आवडला, आपल्या सासूबाई खूप प्रश्न विचारत होत्या,
त्यांचे अतिप्रश्न विचारणे मला आवडतं नव्हतं,
पण मी काहीच नं बोलता शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली.

होणारा नवरा - आई तुला मुलगी आवडली नां, असं सासूबाईनां विचारू लागला,
त्या हो म्हणाल्या.

लग्न ठरलं. आई - बाबा खुश झाले,
आम्ही तिघी बहिणीचं होतो, मी घरातली थोरली मुलगी होते.
घरातलं माझं पहिलंच लग्न होतं, त्यामुळे सगळेच खुश होते.

ठरल्याप्रमाणे लग्न झाले, आलोक आईच्या शब्दाच्या बाहेर जातं नव्हता.
लग्नाची पूजा झाली, हळद उतरणी झाली.

तिसऱ्या दिवशी मी पंजाबी ड्रेस घालून सकाळी लवकरच बेडरूम बाहेर आले,
सासूबाईनीं माझ्या दंडाला पकडलं, आणि ओरडून बोलल्या- ये मुलीं,
तुला काही रीतं- भात आहे कि नाही, तिसऱ्या दिवशी ड्रेस घातलास,
साडी निसावी लागेल इथे तुला, हे तुझं माहेर नाही..


त्यांच वागणं बघून मला खूप वाईट वाटलं, माझ्या डोळ्यांतं पाणी आलं.
मी बरं बोलून तशीच रूममध्ये जाऊन आलोकला बोलले,
आई मला नीट सांगू शकत होत्या,
पण अशा दंडाला पकडुन ओरडून कां बोलल्या मला..


आलोक म्हणाले - अगं ऐक आईचं. काय होतंय साडी निसलीस तर..
इथे आईचे नियम चालतात...

मी आलोकचं उत्तर ऐकून खूप चिडले होते पण एका शब्दानेही बोलले नाही.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- सासूच्या ह्या स्वभावामुळे
आसावरीला अजून काय काय सोसावं लागतं ते....)
0

🎭 Series Post

View all