विषय :- कौटुंबिक कथा मालिका
फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
*******************************
मावशीच्या डोळयात पाणी आलं. त्यांनी पदराला डोळे पुसले आणि म्हणाल्या,
" तिला सांगू नका पोरींनो पण खरं सांगायचं झालं तर आम्ही दोघी पण खूप खचलो गं. तिला फक्त वर्षाचं बाळ आहे... अनय, माझा मुलगा युद्धात मारल्या गेला.
पण पोरीनं डोळ्यात एक अश्रूचा थेंब सुद्धा आणला नाही कारण मला वाईट वाटायला नको आणि मला सुद्धा मन भरून रडता आलं नाही कारण तिला वाईट नको वाटायला. पण आता अश्रु नाही आवरता आले. तिला नाही आवडत मी रडलेल."
पण पोरीनं डोळ्यात एक अश्रूचा थेंब सुद्धा आणला नाही कारण मला वाईट वाटायला नको आणि मला सुद्धा मन भरून रडता आलं नाही कारण तिला वाईट नको वाटायला. पण आता अश्रु नाही आवरता आले. तिला नाही आवडत मी रडलेल."
" मावशी तुम्ही खरच खूप हिंमतीच्या आहात."
" थांबा मी पाणी आणते."
मावशीने पाणी आणलं, त्यांना दिलं तेवढयात दारावरची बेल वाजली. मावशी धावतच गेल्या आणि दरवाजा उघडला तर सौदामिनी होती. ती घरात आली.
"अरे वा!! कधी आलात?"
" हे काय थोडा वेळ झाला, मावशींनी पाणी दिलं."
" सौदामिनी तू हातपाय धुऊन घे ...विनू उठेल एवढ्यात मग तुला काही बोलू देणार नाही, तू गप्पा मारून घे."
सौदामिनी गेली फ्रेश होऊन आली.
" अगं काय घेणार ???सांगा पटकन बनवून आणते."
" अगं आपण बोलायला भेटलो आधी गप्पा मारू आणि सौदामिनी... अगं आम्ही तुला एवढं परक झालो का? की तू सगळं लपवलं आमच्यापासून."
" नाही गं...बोलले असते ..मन मोकळं केलं असतं तर अश्रू आवरता आले नसते आणि आई म्हणजे सासूबाई हार्टच्या पेशंट आहेत. त्यांना जपण माझं कर्तव्य आहे, घरी असलं ना की अजिबात आम्ही दोघी तो विषय नाही काढत."
तेवढ्यात सासूबाईंनी मस्त गरमागरम भजी आणली.
" मावशी...अहो, तुम्ही कशाला त्रास घेतला!!!"
" अगं त्रास कसला!...बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरी कुणी आलं. खूप बर वाटलं ग, तुम्ही निवांत गप्पा मारा मी आहे विनू जवळ."
" सौदामिनी.. अगं तू किती नशीबवान आहेस .कधी कधी तर वाटत मावशी तुझी सासू आहे की आई?"
" अगं देवांनी मला आई नाही दिली पण सासूच्या रुपात आईची माया द्यायला विसरला नाही. त्यांनी खूप केलं गं माझ्यासाठी आणि माझ्या लेकरासाठी. तुला सांगू का मुलाची आठवण आली की,जातात फोटो जवळ आणि रडतात अगं. मला माहीत नाही होऊ म्हणून रात्री अश्रू लपवून झोपतात .पण मला कळत ना एका आईच्या पोटचा गोळा गेला की किती त्रास होतो. अगं आमच्यात आधी एवढं नव्हत पटत मात्र जेव्हा हे गेले तेव्हा पासून आमच्या नात्याची विन एवढी घट्ट झाली ना की आम्ही मायलेकी झालो. मी घरी यायचा आधी सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवतात, मी कितीही रागावलं तरी ऐकत नाही. का तर तुला मुलासोबत वेळ मिळायला पाहिजे. म्हणून घरी आलं की जेवायचं आणि त्याच्यासोबत वेळ घावायचा. अगं खरचं नशिबाने नवरा घेतला हिरावून पण आईच्या मायेचा पदर नेहमीसाठी डोक्यावर ठेवला."
तेवढ्यात प्रियंकाचा फोन वाजला, तिच्या सासूबाईंचा फोन होता त्यांनी तिला घरी बोलावलं.
" बरं तुम्ही मारा गप्पा... मी निघते आता रविवारी माझ्या घरी या!!"
"थांब प्रियंका ...मी पण निघते गं...बराचं उशीर झालाय आणि हो सौदामिनी येतांना पिल्याला पण आण."
" नाही गं.. आईंना नाही करमत त्याच्याशिवाय."
"ओके... चल बाय आम्ही निघतो.चला मावशी भेटू नंतर."
"बाळांनो सांभाळून जा."
"हो मावशी...चल बाय सौदामिनी."
दोघी निघाल्या आणि घरी पोहचल्या. संध्याकाळ झाली होती. प्राजक्ताने घरी गेल्या बरोबर घर आवरलं, स्वयंपाक केला मुलाला खाऊ घातलं तोपर्यंत तिचा नवरा ऑफिस मधून घरी आला. फ्रेश झाला आता रात्रीचे साधारण नऊ वाजले होते.
प्राजक्ताने जेवण गरम केलं. सासूबाई आणि तिचा नवरा प्रवीण जेवायला बसले आणि मुलगा टिव्ही बघत बसला.
अर्ध जेवण होत नाही तोच प्राजक्ताचा फोन वाजला.
"ऐ बाळा, बघ ना रे कुणाचा फोन आहे?"
" मम्मा, अगं अनुराधा मावशीचा आहे."
" आण बरं पटकन, एवढ्या उशिरा फोन केला,काही तरी अडचण आली असेल हिला."
" अगं जेवताना फोन घेऊ नये. एवढं साधं कळत नाही तुला."
प्राजक्ताने सासूबाईकडे जरा रागात बघितलं आणि फोन उचलला.
" हॅलो...बोल अनु...एवढ्या रात्री काय अडचण आली?"
अनु फोनवर रडायला लागली.
" अनु अगं काय झालं, बोल ना...बोलल्याशिवाय का कळेल?"
" मी फोनवर नाही सांगत.अगं मला राहवलं नाही म्हणून मी फोन केला,जरा उशीर झाला सॉरी गं."
" अगं उशीर झाला हे महत्वाचं नाही आहे, तू आधी सांग काय झालं."
" तू उद्या येते का मला भेटायला?"
" कधी येऊ सांग?"
" उद्या...कधी पण ये आणि हो कुणाला अजून काही सांगू नको. उगाच सगळ्यांना टेन्शन, तू घेत नाही टेन्शन म्हणून मी तुला सांगितलं."
" अगं हो बाई माहीत आहे मला. पण तू इथे आलीस का?"
" हो....उद्या सकाळी ये भेटायला."
" हे बघ आज माझी सुटी होती, उद्या मिळाली तर ठीक नाहीत तर हाफ डे करून येते."
" हो... चल बाय."
" बाय....आणि अजिबात घाबरायचं नाही आम्ही आहोत सोबतीला."
इकडे सासूबाई...
"काय झालं तिला भरल्या घरात रडायला???किती मस्त नवरा आहे, सासूबाई आहेत."
" आई हे काय बोलता तुम्ही??आपल्याला अजून काही माहीत नाही, काय झालं ,कुणाचा दोष आहे,कुणाची चूक आहे हे आपण ठरवू शकतो का?"
" अगं घरात भांडण झालं असेल, दोष हा सूनांचा असतो. ह्या सूना कानामागुन येतात आणि तिखट होतात.थोड काही बोललं की नवऱ्याला सांग नाहीतर कधी माहेरी सांग.आई मुलाचे नाते सुद्धा तोडून टाकतात."
"आई विषय कुठे नेत आहात तुम्ही."
आता दोघींचं नक्कीच भांडण सुरू होणार त्याआधीच प्रवीण बोलला,
"प्राजक्ता, अगं जेवण करून घे गार होईल."
प्राजक्तांने जेवण केलं आणि सगळं आवरायला घेतलं.
क्रमशः....
©®कल्पना सावळे.
जिल्हा पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा