विषय :- कौटुंबिक कथा मालिका
फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
*********************************
आज प्राजक्ताच्या डोक्यात हाच विचार होता काय झालं असेल? मनातलं तिने प्रवीण जवळ बोलून देखील दाखवलं.
" मम्मा, अगं चल ना, मला खूप झोप आली... चल ना झोपू."
" हो बाळा चल ना. उशीर झाला आज.. सॉरी."
तो लगेच आईच्या कुशीत आला आणि काही वेळात झोपी गेला.
आज मात्र प्राजक्ताला झोप येत नव्हती.
" प्राजक्ता, अगं जास्त विचार नको करू.. उद्या जात आहेस ना भेटायला."
" हो... पण मन नाही लागत आहे "
" देवाचं नाव घे येईल बघ झोप."
कधी बशी प्राजक्ता झोपी गेली आणि सकाळ होताच ती घरचं सगळं आवरून ऑफिसला गेली.
तिथेही तीच मन लागेना, तसा तिला हाफ डे करायचा होता. तो संपल्यावर लगेच तीने ऑटो पकडुन अनुकडे धाव घेतली.
प्राजक्ता निघाली ते थेट अनुराधाच्या घरी. जातांना तिने प्रियंकाला फोन लावला आणि मध्येच कट केला. कारण तिच्याही घरी वातावरण फारसं चांगलं नव्हतं.
प्राजक्ता अनुराधाच्या घरी पोहचली. तिने दरवाजा वाजवला आणि काकूंनी लगेच दरवाजा उघडला.
" प्राजक्ता....बरं झालं बाई तू आलीस. तुला तर माहीत आहे अनुचा स्वभाव किती शांत आहे... तोच तिला भोवला गं"
आणि काकू दरवाजात रडायला लागल्या.
" काकू...काकू अजिबात रडू नका.अहो काय झालं काहीच कळत नाही आहे. तुम्ही शांत व्हा आधी आणि ती कुठे आहे ते सांगा?"
" ये बाळा घरात, ती बसली आहे बेडरूममध्ये."
प्राजक्ता घरात गेली आणि बेडरूमचा दरवाजा वाजवला. अनुने दरवाजा उघडला.दरवाजा उघड्या बरोबर ती प्राजक्ताच्या गळ्यात पडली आणि मोठ मोठ्याने रडायला लागली.प्राजक्ताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
" अनु शांत हो....अगं तू आधी काय झाले ते तर सांग?? आणि तुझ्या चेहऱ्यावर आणि अंगावर कसले वण आहेत?"
अनु शांत झाली ...आईने पाणी आणलं. अनुने दोन घोट पाणी पिलं. थोड़ा वेळ अगदी शांत राहिली आणि बोलायला सुरुवात केली.
" प्राजक्ता, अगं त्या लोकांनी मला घराबाहेर काढलं."
" काय! कशासाठी? काय झालं?"
" अगं तुला तर माहीत आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली पण अजूनही घरात पाळणा हलला नाही.मग मला तिथे ठेऊन काय करणार?"
" काय करणार म्हणजे अगं फक्त तीन वर्ष झाली."
" हो सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे वर्ष भरात पाळणा हलला पाहिजे.पण आमचं दोघांच चागलं बॉनडींग होत म्हणून तेवढे दोन वर्ष टिकले मी."
" मग आता काय झालं?"
" अगं दर महिन्याला दवाखाण्यात जायचो, पण काही नाही फक्त तपासण्या करायच्या आणि घरी यायचो. लग्नाच्या सहा महिन्या पासून हेच चालले होते.पण नाही राहत मला दिवस म्हणून सारखे टोमणे... सतत घाण बोलणे चालू असायचं सासूबाईंचं. मग मी एक दिवस म्हटले मला दुसऱ्या दवाखान्यात न्या. तेव्हा त्या म्हटल्या , दुसऱ्या दवाखान्यात जाऊन काय होणार आहे मुलं?...वांझोटी कुठली. मला वंशाचा दिवा हवा आहे मग तो तुझ्याकडुन नाही तर अजून दुसऱ्या कुणाकडून."
" मग तू काहीच नाही बोलली का आणि भाऊजी?"
" अगं ते नसतांना म्हातारीला जोर यायचं. त्यांच्यासमोर तर एकदम गाय. पण मी यावेळी त्यांना म्हटले दुसऱ्या दवाखान्यात जाऊ.कंटाळा आला होता मला दवाखाण्यात जाऊन जाऊन आता."
" मग गेलात का नाही दुसऱ्या दवाखान्यात?"
" अगं गेली ना..साधारण आठ दिवस आधी गेलो. दोघांची तपासणी केली तेव्हा कळलं माझ्यात दोष नाही, दोष त्यांच्यात आहे. हे ऐकून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली."
" मग तू सांगितलं का त्यांना?"
" प्राजक्ता अगं तुला तर माहीत आहे ही कशी आहे. स्वत:ला त्रास झाला तरीही सहन करेल पण एक शब्द बोलणार नाही काही."
" आई ,तू थांब गं...बोलले ना मी यावेळी.रात्री जेवणाला बसली तेव्हा परत सासूबाईंचं सुरू झाले. मला तर बाई या घरात राहावं वाटत नाही.घर कसं खायला उठत.मग मी ही बोलले यावर,
हो ना आई मलाही वाटतं, पण आता काय करणार ना? तुम्हाला आजी होण्याचं सुख हे नाही देऊ शकत."
हो ना आई मलाही वाटतं, पण आता काय करणार ना? तुम्हाला आजी होण्याचं सुख हे नाही देऊ शकत."
"एवढं बोलल्यावर सासू बाई भडकल्या आणि म्हणाल्या अगं लाज बीज आहे की नाही???? असं बोलतेस तुझ्या नवऱ्याला. तू काय थोबाड बघत बसला ? तुझ्या काय हातात बांगड्या भरल्या का? आणि हे ऐकल्यावर त्यांना खूप राग आला आणि त्यांनी मला मारलं."
" अगं पण एवढं ?"
" पहिल्या दिवशी त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी"
" काय?"
"हो....आणि जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा फक्त सांगितलं की मी त्यांच्याशी भांडले. मला फार राग आला या गोष्टीचा. मी उलटून बोलले...कुठे फेडणार हे पाप, सूनेशी असं वागता बरं झालं देवाने तुम्हाला मुलगी नाही दिली."
"हे बोलल्यावर दोघे माझ्या अंगावर धाऊन आले.पण मी यावेळी सरळ हाती फोन घेतला आणि तडक बोलले... खबरदार!! कधी माझ्या अंगाला हात लावाल तर सरळ पोलिसांना बोलवेल."
" यावर दोघांनी मला म्हटलं ..चल उचल बॅग आणि चालती हो घरातून."
"मग तू बॅग उचलली आणि निघून आलीस....बरोबर"
" हो दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. करू दे दुसरं लग्न त्याला, मला नाही फरक पडणार आता."
" नको विचार करू अनु एवढा... अगं ही वेळही निघून जाईल."
" प्राजक्ता, वेळ निघून जाईल,तनावरचे घाव पण भरतील पण तर मनावरचे घाव नाही ना.मी ठरवलं आता नाही जायचं परत तिकडे काहीही होऊ दे. माहेरी सपोर्ट नसला तरीही मी तिकडे जाणार नाही."
" बाळा असं कसं बोलतेस तू, अगं मी एकटी आहे म्हणून काय झालं? मी खंबीर आहे अजून, तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे."
अनुराधाने डोळे पुसले, आणि हलकीशी स्माईल दिली.
" आता बर वाटलं बघ मला, मन मोकळं झालं.तू जा गं घरी, मी त्रास दिला तुला."
" नाही गं....काही नाही ... तू आराम कर जास्त विचार नको करू.भेटू लवकर सगळ्यांना. चल निघू मी."
"हो चल बाय."
क्रमशः...
©®कल्पना सावळे
जिल्हा पुणे.
जिल्हा पुणे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा