Login

सासूबाई सिया ची

Family relationships is very delicate relation which handle it carefully...

सासूबाई सिया ची

सिया चे नुकतेच लग्न झाले होते,अन् नवीन नवरी घरातील कामाला लागली होती,घरातील सर्व कामे सिया मन लाऊन करत होती...अगदी सासूबाई ,सासरे,आणि अर्थातच पतीचे सर्व कामे ती आनंदाने पार पाडत होती,खर तर सिया ला कामाची अजिबात सवय नव्हती पण तिच्या आईने आधीच तिला शिकवण दिली होती की मुलगी ही माहेरी कशीही राहली तरी चालेल पण सासरी मात्र तीली सर्व च करावे लागते...

आईची शिकवण तिने मनात कायम ठेवून ती जमेल तितकं चांगल्या पद्धतीने सर्वच करीत असे,सिया ही केवळ गृहिणी नसून ती नोकरी करणारी होती,म्हणजेच तिला सरकारी नोकरी होती,,,लग्ना साठी तिने महिना भर सुट्टी घेतली होती,परंतु आता मात्र तिचा सुट्टीचा कालावधी संपला होता आणि तिला आता जॉब वर जायला लागायचं,त्यामुळे सर्व लगबगीने ती आवराआवर करायची जेणेकरून तिला उशीर होऊ नये...

सिया ची सासू जुन्या विचाराची होती त्यामुळे सिया  च्या नोकरीवर तिचा विरोध होता,पण सिया नोकरी ला धरून होती,काही झाले तरी नोकरी सोडायची नाही असे सिया चे ठाम मत होते,कारण नोकरी तिला लग्ना अगोदर लागली होती...आणि ती नोकरी लागायला तिच्या आई वडिलांनी तसेच तिने स्वतः खूप कष्ट घेतले होते,त्यामुळे तिला नोकरी सोडायची नव्हती...

सकाळी ऑफिस ला जातांना हातात जमेल तितकं कामे करत ती निघायची,पण तिची सासू नेहमी घण घण करायची की ती पूर्ण काम करत नाही मग मलाच करावे लागते,सुने चे काम मलाच करावे लागते अशी सारखी कुरकुर ती सिया च्या पती जवळ करत होती,सिया  वर्किंग वूमन असल्यामुळे टिपिकल गृहिणी सारखे कामे तिला आता जमत नव्हते,,

पण ही गोष्ट घरात कोणीच समजून घेण्याच्या मार्गावर नव्हते,अगदी सिया चा पती सुध्दा,,जमेल तितके दुर्लक्ष करत ती स्वतः चा संसार सुखाचा ठेवण्याचा प्रयत्न करत होती,...लग्न होऊन एक महिना ओलांडला अन् सासूबाई  ची वेगळीच कुणकुण चालू झाली होती,म्हणजेच त्या सुनेला सारख्या पागरविष्यी विचारणा करीत होत्या,

सिया ला मात्र खूप विचित्र वाटत होते,तिला वाटायचे की आजपर्यंत आईने कधी पगार विचारला नाही आणि सासूबाई फक्त पागरच विचारतात,,सियाच्या सासूला सिया चा सर्व पगार हातात पाहिजे होता,...पण सिया चा सासू ला हातात पगार द्यायला विरोध होता,

आणि एक दिवस सिया ने सासू ला म्हटले की या पगारावर तुमचा काहीच अधिकार नाही,त्यावेळी सासूला खूप राग आला व म्हणाली की पूर्ण पगार माझ्या हातात देशील तर च या घरात रहा नाहीतर निघून जा,...आणि हे ऐकल्यावर सिया खरोखर घर सोडून माहेरी गेली,तिला वाटले तिचा पती येईल पण कोणीच तिला न्यायला आले नाही,,

सिया चा पती फक्त आईचे च एकत होता,त्याला बायको ची कदर नव्हती,...तर असा पती काय कामाचा जो समजून घेऊ शकत नाही,व अशी माय च काय कामाची जी मुलाचा संसार तोडायला मागे पुढे पाहत नाही .....आणि म्हणूनच सिया ने निर्णय घेतला पतीला कायमचे सोडायचे,,

काही दिवसात सिया ने पतीकडून घटस्फोट घेतला व आज तिला जसे जीवन जगावेसे वाटते तसेच ती जगत होती,...सोडली तिने तमा तिच्या चांगल्या स्वभावाची,,...आणि मोडक्या संसाराची......


Ashwini Galwe Pund