जलद कथा लेखन स्पर्धा माहे ऑगस्ट 2025 
विषय - पडक्या घराचे रहस्य
विषय - पडक्या घराचे रहस्य
सासूबाईंचा फोटो 
भाग -१
भाग -१
"हे काय ग अमिता सगळ्या भिंतीवर नुसते पुर्वजांचे फोटोच फोटो. अगं कोणत्या काळात वावरतेस? छान वॉलपेपर, वॉल हैंगिंग, कॅनव्हास पेंटिंग लावून सजवायचं ना गं घर."
अमिताची आर्किटेक्चर मैत्रीण मनाली घरात प्रवेश करत हसत हसत तिला म्हणाली.

"अगं मनाली, हे माझे आजे सासू-सासरे हे माझे मोठे सासू-सासरे हे माझे सासू-सासरे हे माझे लहान..."
"हो ग सगळं मान्य आहे मला. पण हे असे फोटो दिवाणखान्यात दर्शनी भागात... शोभत नाहीत गं. तुला आठवणीतच ठेवायचे तर अल्बम मध्ये ठेव ना. आता तर तू चांगले दहा लाख रुपये लावून घर रिनोव्हेट केले अगदी बंगलाच दिसतोय बघ.

 आणि एवढ्या सुंदर घरात प्रवेश करताच समोर काय दिसतेय तर हे फोटो?बघ बाई तूच." मनाली जरा ठसक्यातच म्हणाली. अमिताची काहीच प्रतिक्रिया नाही हे पाहून तिच पुढे बोलू लागली,
"मला नाही जमत बाई असा फालतूचा शो करायला. अगं तू एवढी विज्ञानाची पदवीधर. घाबरतेस की काय ते फोटो काढून टाकायला? भीती वाटते का तुला आपण ते फोटो काढून टाकले तर त्यांची भूत आपल्या मानगुटीवर येऊन बसतील म्हणून?
अखरपक आला की पानं टाकायची मृत झालेल्या सासु सासऱ्यांच्या नावाने. भले जिवंतपणी जेवले की उपाशी आहेत ते विचारलेही नसेल आणि बघितलेही नसेल. तसेच झाले हे.
मनात भीती पान नाही टाकले तर त्यांची भूतं आपल्या मानगुटीवर बसतील.
मी तर कधीच टाकत नाही बाई पानंबिनं.हं, घरातल्या लोकांसाठी बनवते खिरी आणि भजे पुरी सगळं काही.
माझ्या सासूबाई तर आता मागच्या वर्षी गेल्यात.पण जिवंतपणी मी खूप सेवा केली त्यांची. अगदी उभ्या उभ्या गेल्यात गं. हार्ट अटॅकचे निमित्त होऊन. त्यांचा मुलगा तर नव्हताच घरी. माझ्याच मांडीवर जीव गेला. त्यांनी पण खूप जिव्हाळा दिला मला पण म्हणून काही मी असे फोटोबिटो नाही टांगले बाई घरात.
हं, पण त्यांचा फोटो माझ्या मनाच्या खुंटीला मात्र सदैव टांगलेला आहे,त्यांच्या प्रेमळ आठवणींच्या रूपात."

मनालीला किती बोलू आणि किती सांगू असे झाले होते.
"अमिता पण तुला सांगते खूप नवमतवादी होत्या त्या. मला त्या नेहमी म्हणायच्या,
"अगं मनाली ,
'अगं आई' आणि 'अहो आई '
यात अंतर आहेच गं. ते मिटवण्याचा प्रयत्न मी करणार पण नाही. आई ही आईच असते. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अगं जिथे सावत्र आई घेऊ शकत नाही, तिथे सासू काय घेणार ना ?

पण इतरांना वाटते तसे खूप अंतर नसते हो. डोळे आणि तोंड यात जेवढे अंतर असते ना तेवढेच.
जे डोळ्यांनी पाहिलं तेच स्वीकारलं तर सासू सुनेचं नातं खूप गोड होतं बरं. मग ही जोडी घराचा स्वर्ग बनवून टाकते. नाहीतर तेच अंतर कान आणि तोंड एवढं वाढलं तर इतरांचं ऐकून बोल लावले की त्याच नात्यात मीठ कालवलं जातं आणि ती जोडी एका बदनाम नात्यात परिवर्तित होते.

मनाली ,अगं मी आई नाही होऊ शकले तरी एक चांगली सासू होऊ शकते ना ग ? पण त्यासाठी तुलाही चांगली सून व्हावे लागेल बरं."
तुला सांगते अमिता खरेच, शेवटपर्यंत आम्ही दोघींनी ते नातं तसंच जपलं. आजही त्यांची उणीव जाणवते. 
"मनाली, अगं किती बोललीस. तू आली मी तुला पाणी द्यायचे पण विसरले.थांब..."म्हणत
अमिता मनाली साठी पाणी आणण्यासाठी वळली तर मनाली तिच्या मागून स्वयंपाक घरात आली.
पाणी पिता पिता ती हातातल्या तांब्याच्या ग्लास कडे बघत म्हणाली,"ओहो, काय सुंदर गं ! कोणत्या दुकानातून घेतलेस ग?"

"अगं मी नाही घेतले विकत सासूबाईंच्याच  हातचे आहेत ते."
मनाली बोलत होती तेव्हा अमिताचे सासू-सासरे दिवाणखान्यातच बसलेले होते. ते सगळं ऐकतच होते अमिताला वाटले ते मनालीच्या फटकळ बोलण्याने दुखावले तर नसतील? 
क्रमशः
बाकी पुढील भागात. भाग -२मधे
©®शरयू महाजन
क्रमशः
बाकी पुढील भागात. भाग -२मधे
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा