विषय -पडक्या घराचे रहस्य 
सासुबाईंचा फोटो 
भाग-२
"अमिता किती सुंदर आहेत ग तुझी ही स्वयंपाक घरातली तांब्या पितळेची भांडी."
"अगं मनाली,वडिलोपार्जित धरोहर आहे ती. माझ्या सासूबाई काय त्यांच्या सासूबाईंनी घेतलेली असतील. आतापर्यंत सासुबाईंनी जपली आता मी जपतेय."

"हो ना आता परत त्याच जुन्या भांड्यांचा ट्रेंड आलाय. पण घासायला खूप जड जातात बाई" मनाली मनातलं बोलून गेली.
"मनाली पण मनापासून केलं ना की काही जड जात नाही. 
आता हेच बघ ना आमच्या अंगणात दर्शनी दरवाज्याच्या डाव्या हाताला मोठे पिंपळाचे झाड होते. पण घर रिनोवेशन करायला ज्या इंजिनीयरला बोलावले तो म्हणाला," या झाडाची मुळे खोलवर जातात त्यामुळे घराच्या भिंतींना तडा जातात .म्हणून ह्या अशा तडा गेल्यात. तुम्ही हे झाड काढून टाका."
खूप जीव दुखला ग. माझाच इतका दुखला तर आई-बाबांना काय वाटले असेल?
त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी
स्वकष्टार्जीत कमाईतून मोठ्या कष्टाने ही वास्तू उभी केली. वास्तु म्हणजे नुसत्या दगडा मातीच्या भिंती नसतात ग तर त्यामागे त्यांच्या भावनाही दडलेल्या होत्या.
 पण त्यांनी या दोनशे वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाला धक्काही लागू न देता ही वास्तू उभी केली. आता तोच धराशायी होताना पाहतांना त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील?
ते काही बोलले नाहीत दोघेही पण त्यांचं मन मी जाणते. बाबा तर सतत गॅलरीत जाऊन उभे राहतात. त्या नसलेल्या झाडाकडे बघतात.

मनाली अगं परवाच मी त्यांचा दोघांचा संवाद ऐकला. सासुबाई बाबांना म्हणत होत्या,
"काय बघताय एवढ्या विमनस्कपणे. रोज दाणा पाणी ठेवायचे गॅलरीत चिऊ काऊ साठी.पण झाड गेलं आणि चिमणी पाखरंही गेलीत.
अहो, दूरदेशी गेलीत हो चिमणी पाखरं घरातली अन् झाडावरची देखील. आपण फक्त वाट बघायची आता."
मनाली अगं माझच हृदय गलबलून आलं. नातवावर त्यांचे विशेष प्रेम सतत दोघेजण खेळत राहायची त्याच्यासोबत. त्याचेही जेवण त्यांच्यासोबतच. झोपताना त्यांचे पाय चेपून द्यायचा .आता तोही गेला परदेशात शिकायला. त्यामुळे त्यांना जास्तच एकटे पण जाणवते.

आपण किती बोलणार ना?हे ऑफिसला निघून जातात सकाळीच ते रात्रीच येतात. मी कामात गुंतलेली असते. तरी अधून मधून बोलतच राहते त्यांच्यासोबत. त्यांची ही तक्रार नसते कधी. तू म्हटले ना तुझ्या सासू बाबत अगदी तसेच विचार आहेत हो त्यांचे. 
मलाच भाबडीला वाटते ते भिंतीवरचे फोटो काढून टाकले तर त्यांचं मन दुखावेल.असू देत ना भिंतीवर काय फरक पडतो.
मी मुद्दामहून इंटेरियर डेकोरेटरला बोलावले नाही कारण आज जे तू म्हणालीस तेच तोही म्हणाला असता. कारण घराचे रिनोवेशन करायचे म्हणून इंजिनिअर आणला तर त्याने झाड तोडायला लावले हा आला तर हा फोटो काढायला लावेल म्हणूनच मी जसं आहे तसं राहू दिलं.

मनाली, एवढा मोठा जुना वृक्ष तोडण्याचं पाप हातून घडलं म्हणून मी फार दुःखी आहे हो. थोडे पापप्रक्षालन म्हणून दहा ठिकाणी पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण करून आले. दोन-चार दिवसांनी जाऊन त्याला पाणी घालते.पण त्याची भरपाई थोडीच होणार ?
मन उदास आहे गं.
आता माझी ही अवस्था तर ज्यांनी त्याला जीवापाड जपलं त्याच्या सावलीत ज्यांचं आयुष्य गेलं त्यांना काय वाटत असेल?
आणि अगं तो पलीकडे वटवृक्ष दिसतोय ना आणि त्याच्याखाली ते जुनं बांधकाम असलेलं छोटेसे घर ती आमची जुनी हवेली. म्हणजे हवेली खूप मोठी होती.शिकस्त झाली म्हणून पाडली.पण आठवण म्हणून त्यातला अगदी कोपऱ्यातला छोटासा भाग ठेवला दुरुस्ती करून.
तो माझ्या सासऱ्यांनी जपून ठेवला.बायजाबाई अन् विठूकाका राहतात तिथे. ती ,तिची सासू, तिच्या सासूची सासू असेच पिढी जात आमच्या घरी कामाला.आणि तो वटवृक्षही अडीचशे वर्ष जुना बरं का.
खूप आठवणी जुळल्या आहेत ग या लोकांच्या या झाडांशी, वास्तुशी.
सासुबाईंनी सांगितलं होतं एकदा त्या वास्तूचं रहस्य.
क्रमशः
पुढील भागात भाग -३मधे
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा