विषय -पडक्या घराचे रहस्य 
सासुबाईंचा फोटो 
भाग-३अंतिम
भाग-३अंतिम
 त्या जुन्या झाडासारखेच आहेत ग हे आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक न मागता सावली देतात आपल्याला. जपायला हवं त्यांना. मला तर राहून राहून वाटतं झाड तर पटकन क्षणार्धात कापून टाकले. उभे करायला किती वर्ष लागतील?
बोलत बोलत दोघीही दिवाणखान्यात आल्या. मनाली अमिताच्या सासू-सासर्यांजवळ येऊन बसली.
"कसे आहात?"मनाली विचारत होती.
अमिताच्या सासुबाई म्हणाल्या," ये बैस. तू कशी आहेस?"
"मी मजेत आहे काकू . आपणा उभयतांचे स्वास्थ्य कसे आहे?"
अमिताचे सासरे म्हणाले,
"मन:स्वास्थ्य ढवळले की तनस्वास्थ्यावर असर पडतोच बेटा.

तू आत्ता अमिताला म्हणत होतीस ना की," हे फोटो दर्शनी भागात चांगले दिसत नाहीत ."
मी पण तेच म्हणणार होतो अमिताला पण तू काढून टाकायचा सल्ला दिलास पण मी तिला ते तिथून काढून आत एका खोलीत लावायला सांगणार होतो.
पूर्वजांनी जे काही महत्त् कार्य करून ठेवले ते आठवणीत राहावे त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून ते जपायचे.
बेटा ही वास्तू , या वास्तूत राहणारे पूर्वज आणि ही मोठी मोठी वृक्ष यामध्ये खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. म्हणून आम्ही जतन केलं आणि अमिताही करतेय.
मनाली कान टवकारून बसली. तिलाही ऐकायचे होते या पडक्या हवेलीचे रहस्य.
"काका सांगा ना काय रहस्य दडलंय या हवेलीत?
अमिताच्या सासर्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला. त्यांनी अमितालाही जवळ बोलावले आणि ते सांगू लागले,

"खूप मोठं  रहस्य दडलय गं या हवेलीत. अडीचशे तिनशे वर्षांचा इतिहास आहे त्यामागे. 
'दादोजींची हवेली ' म्हणून ती पंचक्रोशीत प्रसिद्ध."

"हा ,अजूनही पत्ता तोच सांगावा लागतो ना."मनाली
"हो. पत्ता तोच राहिला ग पण इतिहास मात्र विसरलेत लोक. लोक कशाला, घरातलेही विसरलेत तिचं महत्त्व. त्यासाठी कुणावर रुसवा नाही. काळाचा महिमा. आपोआपच हळूहळू काल परत्वे परिवर्तन घडत गेले आणि त्याचे महत्त्व हळूहळू कमी कमी होत गेले.
तीनशे वर्षांपूर्वीचा तो काळ.खूप सुबत्ता होती. महाजन कुळातला एक कर्तबगार पुरुष दादोजी. त्याच्या कर्तृत्वाची पावती म्हणून त्याच्याकडे वतनदारी चालत आली. आणि त्यानेही इमानेइतबारे ती सांभाळत आपल्या गावाचा विकास केला. प्रत्येकाच्या हाताला काम अन् पोटाला अन्न. पंचक्रोशीत कोणी भुका राहायला नको. सढळ हाताने मदत. औषधोपचारासाठी पैसे, मुला मुलींच्या लग्नासाठी पैसे अशी मदत तर ते करतच होते .पण त्यांची दूरदृष्टी, गावाच्या विकासासाठी त्यांनी गावात दवाखाना आणला. मंदिरं बांधलीत.
त्याच काळात हवेलीचे निर्माण झाले.इथूनच दानधर्म तर चालायचाच.न्यायदानाचेही कार्य चालायचे.कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलीत.

 त्यांनी गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तसेच गावात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोळ्याचाही मोठा सण, उत्सव सुरू केला. स्त्रियांसाठी संक्रांतीचे सामूहिक हळदी कुंकू  सुरू केले.
यामागे उद्देश एकच गावात एकोपा निर्माण व्हावा. हवेलीतच असलेल्या मोठ्या वटवृक्षाचे पूजन करायला वटपौर्णिमेला स्त्रियांची रीघ लागायची.
पोळ्याच्या दिवशी कृषी मित्र बैलांना कलाबतुचं जरी काम असलेल्या मखमली झुली ,चांदीचे बाशिंग कपाळावर चंद्रकोरी घालून बैल सजवले जायचे. हवेलीतल्या सुवासिनी नटून सजून मराठमोळा शृंगार करून बैलांची पूजा करायच्या आणि बैल हवेलीच्या समोरच्या मोठ्या ऐसपैस आवारात यायचे. मोठा कार्यक्रम व्हायचा.
अशा रीतीने हवेलीच्या साक्षीने समाजात एकोपा स्थापन करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जात होते. मदतीची याचना करायला आलेला कोणीही याचक खाली हात कधी जात नव्हता.त्याची झोळी भरुन ्च जायची.आणि त्याचाच परिणाम हवेलीचे वैभव वाढतच गेलं.

अशा विशाल हृदयी दातृत्वाची ही हवेली साक्ष होती.
नंतरच्या पिढ्यांनी ही ते वैभव तो रिवाज जपला. पण पुढे पुढे काळ बदलत गेला माणसंही तेवढी प्रामाणिक राहिली नाहीत.आणि हवेलीलाही उतरती कळा लागत गेली.
समोर तो जो वटवृक्ष दिसतोय त्याचे पान तोडता येत नाही ते जर तोडले तर ज्यांनी तोडले त्याला उलट्या आणि संडास चा त्रास सुरू होतो.
या हवेलीतील जी विहीर आहे त्यातील पाण्याने त्वचेचे रोग दूर होतात. म्हणून तो वटवृक्ष ती विहीर आणि त्याच्या बाजूचा हवेलीचा भाग मी राखून ठेवला. त्याची दुरुस्ती करून तो वापरात ठेवला. पण बाकीची हवेली शिकस्त झाल्यामुळे तिच्या जागी ही वास्तू उभी केली तरी आजही वटसावित्री पौर्णिमा ,गणेशोत्सव, पोळा, संक्रांत आदि उत्सव या ठिकाणी घेतले जातात. काळानुरू फक्त स्वरूप बदलले.
ही वास्तू दहा वर्ष आधीच उभी झाली असती पण माझ्या आई-वडिलांनी त्यावेळी हा बदल करायला मान्यता दिली नाही. शेवटी ते राहून गेले . ते दोघे गेल्यानंतर मी ही वास्तू उभी केली.
आता बदल करायचे तर आम्ही मात्र कुठलाच विरोध दर्शवला नाही.
आवारातील मोठा पिंपळ वृक्ष धराशाही केल्या गेला त्याचे दुःख मात्र कुठेतरी मनाला बोचत राहते.
तसेच या फोटोचे. ते काढून टाकण्यापेक्षा दुसऱ्या खोलीत लावावे जेणेकरून आठवणी जपल्या जातील आणि हवेली चे महत्व नेहमी दृष्टी समोर राहील.
आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे स्मरण होत राहील.

'जुने जाऊ द्या मरणालगुनी
जाळून किंवा पुरून टाका'
जाळून किंवा पुरून टाका'
असे म्हणून आपला इतिहास पुरून टाकू नका. त्याला नवीन स्वरूपात समोर आणता आले तर बघा. हीच अपेक्षा आहे.
समाप्त
©®शरयू महाजन
समाप्त
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा