विषय - हक्क की कर्तव्य
सासुबाईंच्या राज्यात
भाग -२
नयन निकिताला असे उद्धटासारखं बोलताना आज प्रथमच पहात होता.
नयनही जाणून होता, आपल्याला जर मान हवा असेल तर आपण दुसऱ्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे.
तोही बघत होता आईला प्रत्येक वेळी मान हवा होता. प्रत्येक वेळी तिने सांगितलेलं सगळ्यांनी ऐकायला हवं होतं. पण तिच्या लेखी बाकीच्यांची त्यातून विशेषतः सुनेची म्हणजे निकिताची किंमत शून्य होती.
वास्तविक निकिता घरंदाज घराण्यातून आलेली. तेही कारण असेल कदाचित उलट उत्तर देण्याचा संस्कार तिच्या रक्तातच नव्हता.
तिच्या जागी जर दुसरी कोणी असती ना तर आज एकाचे दोन घर झालेले पाहायला मिळाले असते
ती नोकरीवर जाते तरी घरचं सगळं व्यवस्थित करून जाते तरी भारतीताईंचा तोंडाचा पट्टा काही बंद होत नाही.
नयन जर काही निकिता च्या बाजूने मध्ये बोलला तर मग महाभारत घडायचे घरात हे निकितालाही चांगल्या तऱ्हेने माहीत होतं.
म्हणून निकिता नयनला घरातलं काही सांगतच नव्हती आणि एखादवेळी नयनच्या समोर काही घडलंच तर नयन तिथून निघून जायचा कारण त्याला ऐकवल्या जात नव्हते आपल्या बायकोला बोललेले. पण तो आईला काहीही बोलू शकत नव्हता. त्याच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर होती.

त्यातून निशा आली की तर आईला आणखीनच चेव चढायचा. निशा साठी हे कर निशा साठी ते कर. निशाला हे दे निशाला ते दे .आणि निशाला मात्र त्या एकाही कामाला हात लावू देत नसत.
निशा ही नवीन पिढीच प्रतिनिधित्व करणारी असली तरी आईच्या सांगण्यानुसारच वागून वहिनीला गांजून घ्यायची.
त्यामुळे निकिताच्या मनात सासू आणि नणंदे विषयी अढी असणे साहजिकच होते.
त्यातून निशा ही नयन निकिताच्या संसारात मध्ये मध्ये करायची. नयनला आवडायचे नाही पण ती लगेच आईजवळ लावालावीचे धंदे करायची.
नयनला निकिताला घेऊन कुठे चार दिवस फिरायला जाण्याचीही उजागरी नव्हती.
पण निकिताने कधी तक्रार केली नाही. ती विचार करायची नवरा चांगला आहे ना बस. तो समजून घेतोय ना. उगाच त्यांच्या आणि आपल्या भांडणात त्याचं सँडविच व्हायला नको.
निशा इकडे तर मध्ये मध्ये करायचीच पण सासरी मात्र स्वतःच्या सासूला जवळही फिरकू द्यायची नाही. त्यांनाच हीचं ऐकावं लागायचं.
लहान जावेलाही ती बोटावर नाचवायची.
निकिताच्या बाबतीतही तिची तशीच वागणूक.
"गहू तशी रोटी आई तशी बेटी''
निकिताचे सासरे कंटाळून असे बोलायचे निशाला.
पण तिच्या वागणुकीत बदल व्हायचा नाही.
..........

पण निकिताचा आजचा अवतार पाहून ते आतल्या आता खूप खुष होते. कधीतरी हे घडणारच होते हे त्यांना माहीत होतं.शिशुपालाचे शंभर अपराध माफ, पायली भरली की हे होणारच.
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -३ मधे वाचा.
©®शरयू महाजन
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -३ मधे वाचा.
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा