अगं माझ्या बीपी च्या गोळ्या संपल्या आहेत. आज संध्याकाळी येताना घेऊन येशील का?
"अहो ,आई... आत्ताच गोळ्या आणलेल्याना ?
अगं त्या शुगरच्या होत्या . माझ्या बीपी च्या गोळ्या संपल्या आहेत . त्या घेऊन यायच्या आहेत...
हे ऐकल्यानंतर सुनितची बडबड सुरू होते .... सगळा पैसा औषधांवरच खर्च होतो. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल गुडघेदुखी, सगळा पैसा दवाखान्यावर खर्च होतो...इथे माझ्या मुलाची, शाळेची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत...
मंजुळा उतरत्या स्वरात बोलते अगं पण सकाळी मी तुला थालीपीठ, अळूवड्या, कोथिंबीर वडी, पुरणपोळी, गुलगुले हे सर्व काही बनवून विकण्यासाठी दिले होते, त्याचे पैसे आलेच असतील ना ! म्हणून मी तुला विचारलं माझ्या बीपीच्या गोळ्या आणल्यास का म्हणून?
सुनिता रागानेच बोलते... याचा अर्थ सर्व पदार्थ तुम्ही बनवता. मी तुम्हाला काहीच मदत करत नाही? सासुबाई तुम्ही बनवलेले पदार्थ मी रोज स्टेशनला विकण्यासाठी घेऊन जाते. म्हणून ते विकले जातात...
मंजुळा पुन्हा समजुतीच्या सुरात बोलते ...हो तुझं बरोबर आहे . मी बनवलेले पदार्थ तू स्टेशनला जाऊन विकते . त्याचे पैसे येतच असतील ना ? मग त्या पैशातून माझ्या बीपीच्या गोळ्या का आणल्या नाहीस.
त्यावर सुनिता चिडून बोलते.. म्हणजे आता तुम्ही मला पैशांचा हिशोब विचारणार आहात का ? तुम्हाला काय वाटलं पदार्थ विकून मिळालेले पैसे मी बाहेर उडवून येते का?
"मंजुळा; नाही मी असं कुठे म्हटलं!
सुनिता पुन्हा बोलायला लागते ..लग्न झाल्या पासून एक दिवस सुखाचा गेला नाही. रोज स्टेशनवर बसून सर्व पदार्थ विकायचे आणि घरी आली की तुमचं काही ना काही दुखणं असतंच . आलेला सगळा पैसा तुमच्या आजारपणावर खर्च करायचा.
सुनिता ची बडबड ऐकून मंजुळा पुन्हा घरातल्या कामाला जाते.
संध्याकाळी सुनिता चा नवरा घरी आल्यानंतर सुनिता नवऱ्याला विचारते काय हो आज किती पैसे मिळाले. त्यावर तो बोलतो आज मिळाले पाचशे सहाशे रुपये पण ते सर्व पैसे आईच्या आजारपणाच्या गोळ्या आणण्यातच खर्च झाले.
संध्याकाळी सुनिता चा नवरा घरी आल्यानंतर सुनिता नवऱ्याला विचारते काय हो आज किती पैसे मिळाले. त्यावर तो बोलतो आज मिळाले पाचशे सहाशे रुपये पण ते सर्व पैसे आईच्या आजारपणाच्या गोळ्या आणण्यातच खर्च झाले.
आई हे घे तू काल बोलली होतीस ना , की माझ्या गोळ्या संपल्या आहेत म्हणून! हे घे गोळ्या खा म्हणजे तुला त्रास होणार नाही.
सुनिता ची पुन्हा बडबड चालू होते. आज थोडे फार मिळालेले पैसे देखील या सासूबाईंसाठी खर्च होऊन गेले.असा त्यांच्या आजारपणावर सर्व पैसा खर्च होणार असेल तर मगं, आपल्या मुलाला शिकवायचं तरी कसं.
मंजुळालाही सुनिता चे बोलणे पडते. "मंजुळा विचार करते.माझा मुलगा शिकला नसल्यामुळे त्याचे हातावरचे पोट". रोज जिथे काम मिळेल तसा पैसा कमवायचा आणि मी घरी बनवलेल्या पदार्थांवरती थोडेफार पैसे मिळतात. त्यात मी सतत आजारी पडत असते. सगळाच पैसा माझ्या आजारपणावर खर्च झाला तर माझा नातू शकेल तरी कसा.....
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मंजुळा घर सोडून निघून जाते...सुनिता सासूबाईंना घरात शोधते पण त्या कुठेच दिसत नाही . सासुबाई सकाळी उठून कुठे निघून गेल्या असतील . आता सर्व पदार्थ कोण बनवणार ? आणि ते पदार्थ मी कधी विकायला घेऊन जाणार.
सुनिता कामाला लागते सर्व पदार्थ बनवते व विकायला घेऊन जाते . परंतु मंजुळाच्या हाताला जी चव होती ती चव काही सुनीताच्या हाताला नव्हती .
जो कोणी माणूस पदार्थ खाण्यासाठी यायचा तो बोलायचा... ताई आज जरा चवीत काहीतरी कमी आहे..
सुनिताने ओळखले रोज सासूबाई हे सर्व पदार्थ करायच्या. पण आता हे पदार्थ विकले गेले नाहीत तर , घर कसे चालेल!
घरी गेल्यानंतर पाहते तर घरी मंजुळा आलेली नसते. ती नवऱ्याला फोन करून सांगते की अजूनही सासूबाई घरी आल्या नाहीत . कुठे गेल्या असतील. म्हणून विशाल आणि सुनीता दोघेही त्यांना सर्वत्र शोधू लागतात. एका स्टेशनला तिच्या सासूबाई बसलेल्या असतात." सुनिता सासूबाईंचे पाय धरून त्यांची माफी मागते. सासुबाई माफ करा ! आतापर्यंत जे काही घरात पैसे आले ते फक्त तुमच्या हाताला चव होती म्हणूनच".
आता मला माफ करा आणि आपल्या घरी चला...
मंजुळा बोलते पण माझं आजारपण! उगीचच तुम्हाला माझ्या आजारपणाचा खर्च नको.
सुनिता बोलते सासुबाई मी तुमची मनापासून माफी मागते. खरं तर तुमच्या आजारपणाचा खर्च आम्ही नाही तर तुम्हीच करत होता . तुम्ही जे पदार्थ बनवत होता ते विकले जात होते आणि त्या पैशातूनच आम्ही तुम्हाला औषध घेऊन येत होतो. आता तुम्ही मला माफ करा व आपल्या घरी चला....
तुम्ही घरी आला तरच तुमच्या नातवाचे शिक्षण पूर्ण होईल...
मंजुळा ही विचार करते आपला मुलगा शिकला नाही पण आता माझा नातू तरी शिकलाच पाहिजे असा विचार करून ते सुनीता सोबत घरी जाते.
सुनिता देखील घरी गेल्यानंतर मंजुळाचे चांगली काळजी घेते . कालांतराने "मंजुळा भोजनालय " नावाचे भोजनालय सुनीता चालू करते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा