Login

सासुबाईचे दागिने भाग 1

Dagine
सासूबाईंचे दागिने भाग 1

दोघी सुनांना बोलावून सासूबाईने कपातून बाहेर काढलेले दागिने हळूहळू त्यांच्या समोर ठेवले होते..

प्रीती प्रिया दोघींना आज अचानक का बोलावून घेतले आपल्याला सासूबाईने ह्याचे नवल वाटत होते.

दोघी दारात उभ्या होत्या ,दोघींना ही सासूबाई काय करतील हे जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली होती

त्या दोघी ही तृप्त आणि समाधानी घरातून आलेल्या मुली ,शिकलेल्या आणि मोठी नौकरी करणाऱ्या..

त्यांना दोघींचा ही पगार ही सहा अंकी,म्हणजे पैसे सोने दागिने त्यांना ह्याचे फार अप्रूप नव्हते..


दोघींचे ही राहणीमान साधेच होते.. म्हणजे एकदम छोटे मंगळसूत्र ,एक अंगठी..छोटे डायमंड चे कानातले..मंगळसूत्र म्हणजे दोन काळे मनी आणि बाकी पाच ग्राम सोने... नावाला एक छोटे कडे.. एक घड्याळ...आणि नेहमीच सुती ड्रेस ,सुती साडी..तर कधी ऑफिस वेअर...


अश्या स्वतःच्या कमाईवर जगणाऱ्या सुना होत्या की त्यांना कधी ही कसला मोह जडला नाही ,की कसला हव्यास..


दोघींच्या घराची परिस्थिती एकदम चांगली होती ,खात्या पित्या घरच्या होत्या ,दोघींचे वडील श्रीमंत..त्यात दोन्ही सुनेंच्या वडिलांनी आपल्या मुलींना स्वखुशीने अगदी सगळे सोन्याचे दागिने देऊन पाठवले होते...

त्यात सासरी जरा परिस्थिती बदलली होती ,मुले मोठ्या हुद्द्यावर होती..आईच्या वडिलांच्या कमाईची जी काही आवक होती त्याची त्यांना गरज नव्हती..वडील नसल्याने त्यांची पेन्शन होती ती आईसाठी पुरेशी होती..त्यात मग दोघींच्या नवऱ्याने घेतलेले काही..तर काही त्यांनी गुंतवणूक म्हणून करून ठेवलेले दागिने होते..


दोघी सुना संपूर्णपणे स्वतःच्या पायावर उभ्या होत्या , स्वतःच्या खर्चासाठी स्वतःवर निर्भर होत्या..उलट नवऱ्याला लागले तर त्या मदत करत होत्या.. त्यांच्या खर्चाचे हिशोब ही कधी नवऱ्याने मागितले नव्हते.. ना त्यांनी कधी नवऱ्याला खर्चायला पैसे मागितले होते..

असे असून ही घरात सासू बाईला दोघे जण खर्चायला पैसे देत..वडील होते तोपर्यंत दोघे जण त्यांना पैसे देत..सगळे सुखी कुटुंब होते.. जबाबदारी कसली होती ती फक्त आईला सांभाळायची..आईचा स्वभाव सांभाळायची..

घरातील सुना अप आपल्या वाट्याला येईल ते काम निमूटपणे करून बाजूला होत..तर एक जण सकाळी स्वयंपाक करून जात आणि दुसरी संध्याकाळी आल्यावर स्वयंपाकाची जबाबदारी घेत..

घराला घरपण होते..पण दोन वेग वेगळ्या घरातील शिकलेल्या मुली असल्या तरी शेवटी त्या सुना होत्या...जावा जावा होत्या.. एकीला सासू जीव लावत तर दुसरीला जीव लावतांना मागे पुढेत बघत..

"काय आहे पंकज मोठ्यावर तसा कमीच जीव असतो आईचा. " गोविंद हसत म्हणत

"नाही रे दादा तुला गोड गैरसमज होतंय ,आई सर्वांना सारखा जीव लावते..बघ बघ तुला आधी जगात आणले हा त्याचा पुरावा आहे.." पंकज हसत म्हणत

दोघा भावांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम, दादा म्हंटल्याशिवाय काही निर्णय घ्यायचे नाहीत..आणि पंकजला सोडून कोणता ही व्यवहार करायचा नाही...असे गोविंदचे म्हणणे


दोघी सुना त्यांच्या नवऱ्यांच्या लाडक्या बायका ,त्यांना कधी ही त्रास होईल असे वागत नसल्यामुळे आणि पैसे ही बाब त्यांच्या नात्यात दुय्यम असल्यामुळे तो वादाचा मुद्दाच नव्हता येत..

पण सगळेच सुख सुख नसते ,कुठेतरी कोणी तरी उणे असतेच घरात..ते उणे कोण होते.. पाहू