"खूप चांगली आहे हो तुमची सून. नोकरी करून घरही छान पद्धतीने सांभाळते." बाजूच्या निर्मला मावशी मेघाच्या सासूबाईंना म्हणजेच शांताला म्हणाल्या.
किचनमध्ये काम करत असणारी मेघा आता सासूची काय प्रतिक्रिया आहे ह्याकडे लक्ष देऊन ऐकू लागली.
किचनमध्ये काम करत असणारी मेघा आता सासूची काय प्रतिक्रिया आहे ह्याकडे लक्ष देऊन ऐकू लागली.
"निर्मला ताई, काय इतकं कौतुक करता. जगावेगळे काही करत नाही. मी केलं की माझ्या सासुचं. संसार सांभाळला आणि असंही आता काय सगळी कामं मशीनवर होतात. कपडे धुवायला मशीन, वाटण वाटायला मिक्सर. आजकालच्या मुलींना आपल्या इतकी कामं आहेत का? आपण शेतातली कामं केली आहे. मी तर झाडलोट करून सकाळी नदीवर कपडे धुवायला जायचे. ह्यांना काय घरातच काय ती कामं करायची असतात. ऑफिसमध्ये देखील मस्त बसतात, आपण राबलो तसं आताच्या पोरींना होणार आहे का?" शांता
हे ऐकून मेघाला खूपच वाईट वाटलं.
मेघा आणि अमोलच्या लग्नाला दोन वर्षे झाले होते. दोघांचा प्रेम विवाह होता. आधी दोघांच्या लग्नाला विरोध होता, नंतर दोघांच्याही घरच्यांनी लग्नाला संमती दिली.
मेघा आणि अमोल दोघेही एकमेकांना खूप जीव लावायचे.
अमोलच्या घरी आई शांता, लहान भाऊ महेश असं कुटुंब होतं. वडील देवाघरी जाऊन पाच वर्षे झाले होते. घरची जबाबदारी तेव्हापासून अमोलने घेतली होती.
अमोलच्या घरी आई शांता, लहान भाऊ महेश असं कुटुंब होतं. वडील देवाघरी जाऊन पाच वर्षे झाले होते. घरची जबाबदारी तेव्हापासून अमोलने घेतली होती.
मेघाला कल्पना होती की, तिचा स्वीकार करायला थोडा वेळ जाणारच आहे. ती ऑफिसला देखील जायची आणि घरची कामं देखील तीच करायची. घरातील कामाला बाई लावायची नाही हे शांताने आधीच सांगितले होते, मेघाच सर्व करायची; पण शांताला असं वाटायचं की, इतकं काही काम नाही. मेहनतीची कामं तर तिने केली होती. मेघाला फक्त थोडीफार कामं असतात.
सकाळी शांता जे बोलली होती त्याने ती दुखावली होती.
असं तर तिच्या कामात शांता नेहमीच कमी काढत असे. आमच्याइथे असं चालत नाही हे वाक्य तर ठरलेलं असायचं.
मेघा समजून गेली होती काहीही केलं तरी शांता तिला समजून घेणार नाही. तिला गृहीत धरलं जात होतं. अमोल तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तिला शांताचं बोलणं पटलं नाही, तरी ती तिला उलटून बोलत नव्हती. तिला बोलायला जड जायचे, म्हणून की काय शांता जे ही मनाला येईल ते बोलून मोकळी व्हायची.
आज ना उद्या परिस्थिती बदलेल हा विचार करणं तिने सोडून दिलं होतं. अमोलचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे तिला माहीत होतं. ती दिवसभर कामात मन रमवायची. कधी कधी असं टोचून बोललेलं तिच्या मनाला लागायचे. आजही तसंच झालं.
ती रात्री अमोलसोबत जास्त बोलली नाही.
"शोना, काय झालं आज शांत शांत?" अमोल तिला मिठीत घेत म्हणाला.
"काही नाही अमोल, बस जरा दमले आहे. ऑफिसमध्ये जास्त काम होतं." ती दुसरीकडे बघत म्हणाली.
अमोलला माहीत होतं ती खोटं बोलतेय, कारण जेव्हा पण ती खोटं बोलायची तेव्हा ती नजरेला नजर अजिबात द्यायची नाही.
"हे मेघा, खोटं बोलतेय ना? तुझ्या अमोलशी. मला नाही सांगणार?"
"झोपू का मी? आज फार दमलेय." तिने विषय बदलला.
"जोपर्यंत सांगणार नाही, तोपर्यंत मी तुला झोपू देणार नाही. सांग बरं." तो ऐकणार नाही हे ती समजून गेली.
"अमोल, आपण कितीही चांगलं वागलं, कितीही केलं तरी कमीच पडतो ना? आपली किंमत शून्यच राहते का?"
"तुला आई काही बोलली का?" अमोल तिची हनुवटी अलगद हातात धरत म्हणाला.
तिचे डोळे काठोकाठ भरले.
"नक्कीच आई काहीतरी बोलली."
"डायरेक्ट मला नाही बोलल्या; पण..." तिने अलगद डोळ्यातील अश्रू टिपले.
"पण काय ?"
"त्या म्हणत होत्या आजकालच्या मुलींना काय कामं असतात. घरात प्रत्येक कामाला मशीन आहे. खरंतर तो टोमणा मलाच होता."
"मी आईशी बोलतो."
"नको, काही बोलू नको. त्या माझ्यावर रागावतील. खरंच नको काही बोलू. आधीच म्हणतात, लग्न झालं की मुलं बदलतात,त्यात जर तू त्यांच्याशी काही बोलला की, त्या तुलाही बोलायला मागे पुढे पाहणार नाही. असू दे माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अंतर नको."
"मेघा, मी आईशी शांतपणे बोलतो." अमोल.
"प्लिज नको, तू कितीही शांतपणे बोलला तरी त्या भडकतील."
"माझं ना आता डोकं चालत नाही. काय करू?"
"काही करू नको. फक्त माझ्यावर असंच प्रेम करत रहा." ती त्याच्या कपाळावर किस घेत म्हणाली.
"मेघा, हे असं वागते ना म्हणून मी तुझ्या प्रेमात नव्याने पडतो."
त्याने तिला घट्ट मिठी मारली.
ती खूप दमली होती, त्याला घट्ट बिलगून ती झोपी गेली.
ती खूप दमली होती, त्याला घट्ट बिलगून ती झोपी गेली.
अमोल मात्र तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता.
'मेघा, कशी आहेस गं तू? तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर म्हणाली असती आईशी बोल; पण तू मात्र आई आणि माझ्यात वाद नको म्हणून मलाच शांत करतेय.' त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं.'
तिची अवस्था त्याला चांगलीच कळत होती.
आईला काही बोलायला गेलं की, ती देखील रडारड करणार ह्याची त्यालाही कल्पना होतीच.
आईला काही बोलायला गेलं की, ती देखील रडारड करणार ह्याची त्यालाही कल्पना होतीच.
दुसऱ्या दिवशी तो ऑफीसमधून घरी आला.
शांताचा चेहरा उतरला होता.
शांताचा चेहरा उतरला होता.
काहीतरी नक्कीच बिनसलं होतं.
काय झालं होतं?
पाहू पुढच्या भागात.
पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
अष्टपैलू कथा लेखन स्पर्धा २०२५
(कौटूंबिक कथा)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा