Login

सासूची सून... की मुलाची बायको ? भाग 7

Story Of Bhavna
सासूची सून… की मुलाची बायको?
भाग ७ : उलगडनारे सत्ये

सायंकाळी जे घडलं त्यावरून भावना दुखी झाली होती..एवढ सगळ करूनही मी चुकीचीच आहे का...आणि अमोल तेव्हा काहीच बोलला नाही..मग मी इथे कुणासाठी आली आहे...
तेवढ्यात अमोल रूम मध्ये येतो आणि भावना ला जवळ घेतो आणि म्हणतो,

" भावना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे...तू काही चुकीच केलं नसणार पण ही गोष्ट मी डायरेक्ट बोलली नाही कारण आईला वाटणार की मी तुझ्याकडून डायरेक्ट भाग घेऊन नंदा किंवा आईला दोष देत आहे"

"पण अमोल"!!! भावना बोलतच होती...तेवढ्यात अमोल ने तिच्या ओठावर बोट ठेवले...

"मी आहे तुझ्यासोबत.....काही दिवस थांब मी सगळ ठीक करतो" i promise

दोघेही झोपी गेले...सकाळी सगळे काम उरकून भावना तिच्या अभ्यासाला लागली की मुलाखतीला प्रॉब्लेम नको व्हायला...तेवढ्यात सुलोचना हॉल मधून म्हणाली...." मी मंदिरात जाऊन येत आहे"

भावनाने हो म्हटले....
मंदिरातून आल्यावर सुलोचना काही वेळ बाहेर बसली...नंदा सुद्धा कॉलेज मधून आली...त्यानंतर दोघी आतमध्ये आल्या...
अचानक सुलोचना थांबली. “भावना… आज सकाळी तू कुठे बाहेर गेली होतीस?”मी मंदिरात गेले तेव्हा....

भावना गोंधळली. “बाहेर? नाही आई… मी घरीच होते.”

“नंदा म्हणाली…
तू कुणाशी तरी भेटायला बाहेर गेलीस म्हणे.”

भावनेच्या अंगावर काटा आला. “आई, मी खोटं बोलत नाही… मी कुठेच गेले नव्हते.”मी घरीच होते माझ्या रूम मध्ये...

सुलोचना काही बोलली नाही.पण तिच्या चेहऱ्यावर पुन्हा शंका उमटली....बहुतेक ही शंकेची पाल नंदानेच तिच्या डोक्यात टाकली असावी....

इकडे नंदा मनातल्या मनात वेगळीच खुश होत होती ...जसे की तिने काहीतरी कांड केलं आहे...

रात्री अमोल घरी आला. नेहमीपेक्षा जास्त गंभीर.
“भावना,”
तो थेट म्हणाला, “आज ऑफिसमध्ये फोन आला होता…”

भावनेचं हृदय जोरात धडधडलं. “कसला फोन?”
“तुझ्या नावाने माझ्या कंपनीत inquiry गेलीय म्हणे…back office साठी....पण त्यात घरचा पत्ता, वैवाहिक स्थिती चुकीची दिली होती.”

भावना हादरली. “मी असं काही केलं नाही!”

तेवढ्यात नंदा मध्येच बोलली. “अरे दादा, तिला आठवत नसेल…घाईघाईत चूक झाली असेल.”

भावनेचा आवाज थरथरला पण तिला आठवले...सकाळी मी मागे कपडे धुवायला गेली तेव्हा नंदा ताई तुम्हीच रुम मध्ये होत्या ना???

घरात एकदम शांतता पसरली.
सुलोचनानं पहिल्यांदाच कडक आवाजात विचारलं. “नंदा… हे खरं आहे का?”

नंदा थोडी घाबरली, पण लगेच सावरली. “आई, मी फक्त मदत केली होती…त्यात पत्ता तिच्या माहेरचा टाकला एवढच
पण हिच्या करिअरमुळे घरात तणाव वाढतोय हे खरं ना?”

अमोलचा चेहरा उतरला. “मदत आणि हस्तक्षेप यात फरक असतो नंदा.”
नंदाच्या डोळ्यांत क्षणभर राग चमकला. पण ती गप्प झाली.
त्या रात्री भावना झोपू शकली नाही.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all