सासूची सून… की मुलाची बायको?
भाग ८ : नात्यांची पुनर्बांधणी
भाग ८ : नात्यांची पुनर्बांधणी
सकाळी घरात विचित्र शांतता होती.काल रात्री घडलेलं कुणाच्याच मनातून गेलेलं नव्हतं.सुलोचना देवासमोर बसली होती.डोळे मिटले होते… पण मन जागंच होतं.“मी कोणावर विश्वास ठेवतेय?”हा प्रश्न पहिल्यांदाच तिला अस्वस्थ करत होता.स्वयंपाकघरात भावना काम करत होती.नेहमीप्रमाणे शांत, नम्र…पण आज तिच्या हालचालींत आत्मसन्मान होता.अमोल हॉलमध्ये बसला होता.तो अचानक उठला… आणि थेट आईजवळ गेला.
“आई,”
तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, “मला आज काही स्पष्ट करायचं आहे.”
“आई,”
तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, “मला आज काही स्पष्ट करायचं आहे.”
सुलोचनानं त्याच्याकडे पाहिलं.
“भावना खोटं बोलत नाही,”
तो थेट म्हणाला. “ती नोकरीबाबत काहीही चुकीचं करत नाहीये.”
“भावना खोटं बोलत नाही,”
तो थेट म्हणाला. “ती नोकरीबाबत काहीही चुकीचं करत नाहीये.”
नंदा लगेच मध्येच बोलली. “दादा, तू तिच्या बाजूनेच बोलणार ना?”
अमोल वळून नंदाकडे पाहिला. “हो. कारण आजपर्यंत मी ऐकतच राहिलो… आणि त्यामुळे चुकीचं घडत गेलं.”
घरात एकदम तणाव पसरला.
घरात एकदम तणाव पसरला.
“काल जो फोन आला होता,”
अमोल पुढे म्हणाला, “तो मी तपासला.
तो कॉल तिच्या नंबर वरून नाहीच गेला होता.”
सुलोचना दचकली. “मग?”
अमोल पुढे म्हणाला, “तो मी तपासला.
तो कॉल तिच्या नंबर वरून नाहीच गेला होता.”
सुलोचना दचकली. “मग?”
"तो नवीन नंबर होता आणि तो नंदाच्या नावावर register होता" अमोल म्हटला
नंदाचा चेहरा पांढरा पडला. “हे… हे खोटं आहे!”
“नाही,”अमोल म्हणाला, “हे सत्य आहे.
आणि मला अजून बरंच कळायचं आहे.”
आणि मला अजून बरंच कळायचं आहे.”
सुलोचनानं पहिल्यांदाच नंदाकडे कठोर नजरेनं पाहिलं. “नंदा… का?”
नंदाचा आवाज बदलला. “कारण ही बाई घरात राहिली तर… माझं काहीच उरणार नाही.”
भावना थरथरली. तिला हे शब्द ऐकायची कल्पनाही नव्हती.
“मी माझ्या आईचं लक्ष गमावतेय,”नंदा रडत म्हणाली. “पूर्वी सगळं माझं होतं.”
सुलोचनाच्या डोळ्यांत पाणी आलं. “प्रेम वाटून देण्याचं असतं नंदा…हिस्से कापण्याचं नाही.”
अमोल भावनेकडे वळला. पहिल्यांदाच सगळ्यांसमोर म्हणाला, “भावना फक्त माझी बायको नाही… ती एक माणूस आहे. आणि तिचं स्वप्न मी मोडू देणार नाही.”
भावनेचे डोळे भरून आले. ती काही बोलू शकली नाही.
नंदा गप्प झाली....तिचा डाव उघड झाला होता.
सुलोचनानं हळूच भावनेचा हात धरला. तो स्पर्श लहान होता…
पण स्वीकाराचा होता. तिने भावनेची माफी मागितली
नंदा गप्प झाली....तिचा डाव उघड झाला होता.
सुलोचनानं हळूच भावनेचा हात धरला. तो स्पर्श लहान होता…
पण स्वीकाराचा होता. तिने भावनेची माफी मागितली
"मला माफ कर भावना"
"आई तुम्ही माफी मागू नका" भावना म्हणाली....
सुलोचना च्या माफी ने आणि अमोल च्या पुढाकाराने भावनाला खूप आधार मिळाला होता....
क्रमशः…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा