सासूची सून… की मुलाची बायको?
भाग ५ : स्वतःसाठी उभं राहणं
भाग ५ : स्वतःसाठी उभं राहणं
दिवसभर भावनाला जरा बर वाटलं की सुलोचना थोडी का होईना पण तिच्याशी बोलली...पण तिला एकट हे घर खायला उठत होत...अमोल दिवसभर कामाला जायचा आणि सासू आणि ती एकटीच घरी असायचे आणि तिची नणंद नंदा ही कॉलेज ला जायची...
तिने आज अमोल ला जॉब बद्दल विचारायचं ठरवलं होत पण...तिला वाटले की आता सुलोचना बोलायला लागली आहे तर कशाला जॉब च नाव काढून घरात वातावरण खराब करायचं...
रात्री बराच वेळ उलटून गेला होता…भावना अजूनही जागीच होती.तिच्या शेजारी अमोल शांत झोपी गेला होता...डोळे मिटले तरी तिचं मन झोपायला तयार नव्हतं.
“मी इथे नक्की कोण आहे?”हा प्रश्न सतत तिच्या मनात घोळत होता.तिला लग्नाआधीची भावना आठवली जी नोकरी, आत्मविश्वास, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द.लग्न झाल्यावर सगळं थांबलं.
“आता घर सांभाळ,”
“सासूबाईंना सोबत हवी,”
“नंतर बघू नोकरीचं,”
हे सांगून तिनं स्वतःला मागे ठेवलं.पण आज…परिस्थिती वेगळी होती.सकाळी स्वयंपाकघरात काम करताना सुलोचना शांत होती.भावनेनं चहा दिला.दोघींमध्ये ragache शब्द नव्हते पण थोडा तणाव होता.तेवढ्यात अमोल तयार होऊन बाहेर आला.
तो क्षणभर थांबला.
“भावना…”.....

तिनं त्याच्याकडे पाहिलं.
“तू… पुन्हा नोकरी करायचा विचार केलायस का?”
तो प्रश्न अचानक होता.
भावनेला क्षणभर बोलता आलंच नाही.
“तू… पुन्हा नोकरी करायचा विचार केलायस का?”
तो प्रश्न अचानक होता.
भावनेला क्षणभर बोलता आलंच नाही.
“कारण…” तो थोडा अडखळला, “घरात सगळं मीच सांभाळतोय असं काही वाटायला नको…
आणि तुलाही… काहीतरी करायचं होतं ना?”
आणि तुलाही… काहीतरी करायचं होतं ना?”
भावनेच्या डोळ्यांत पाणी आलं.
हे शब्द ती ऐकायला फार दिवस वाट पाहत होती.
“हो,”
ती शांतपणे म्हणाली, “मला जायचं आहे नोकरीला.”
हे शब्द ती ऐकायला फार दिवस वाट पाहत होती.
“हो,”
ती शांतपणे म्हणाली, “मला जायचं आहे नोकरीला.”
स्वयंपाकघराच्या दारातून सुलोचना हे सगळं ऐकत होती.
तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला.
“ही नोकरीला गेली… तर घर?
माझं काय?”पण लगेच दुसरा विचार आला
“पण ही मुलगीही कुणाची तरी मुलगी आहे…
जिची या लग्नामुळे स्वप्नं थांबलीत.”
तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला.
“ही नोकरीला गेली… तर घर?
माझं काय?”पण लगेच दुसरा विचार आला
“पण ही मुलगीही कुणाची तरी मुलगी आहे…
जिची या लग्नामुळे स्वप्नं थांबलीत.”
दुपारी भावना जुन्या फाईल्स काढून बसली.रेझ्युमे अपडेट करताना हात थरथरत होता.भीती होती…पण त्याहून जास्त गरज होती ती म्हणजे स्वतःसाठी उभं राहण्याची.
सुलोचना दारात उभी राहिली.
“भावना…”
“भावना…”
ती वळली.
“नोकरी… दूर असेल का?”
“नोकरी… दूर असेल का?”
हा प्रश्न कठोर नव्हता.
तो काळजीचा होता.
“नाही आई,”
भावनेनं हळूच उत्तर दिलं, “घर सांभाळूनच करेन.”
तो काळजीचा होता.
“नाही आई,”
भावनेनं हळूच उत्तर दिलं, “घर सांभाळूनच करेन.”
आई हा शब्द ऐकून सुलोचना थोडी मनातून आनंदी झाली पण काही बोलली नाही....पण तिच्या चेहऱ्यावरचा कडकपणा आता थोडा सैल झाला होता....
सायंकाळी नंदा आली. “आई, हिला नोकरीला जायचंय म्हणे.
मग घरात लक्ष कोण देणार?”
मग घरात लक्ष कोण देणार?”
सुलोचना पहिल्यांदाच थोडी चिडली. “घर एकट्या माणसाचं नसतं नंदा…सगळ्यांनीच सांभाळायचं असतं.”
नंदा गप्प झाली.भावना दूर उभी होती.तिला विश्वास बसत नव्हता सुलोचनानं तिला थांबवलं नाही…कदाचित पूर्ण साथही दिली नाही,पण विरोधही केला नाही.त्या रात्री भावनेला पहिल्यांदाच शांत झोप लागली....कारण तिला कळलं होत की
मी फक्त कुणाची सून किंवा बायको नाही…
मी आधी एक माणूस आहे…
आणि आता, मी स्वतःसाठी उभी राहणार आहे.
मी आधी एक माणूस आहे…
आणि आता, मी स्वतःसाठी उभी राहणार आहे.
क्रमशः…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा