सासूची सून… की मुलाची बायको?
भाग १० : नात्यांचा पूर्ण स्वीकार
अंतिम भाग
भाग १० : नात्यांचा पूर्ण स्वीकार
अंतिम भाग
भावनाला नोकरी मिळाल्याचा फोन आल्यापासून घरात एक वेगळीच शांत आनंदाची हवा होती.अमोल खूश होता…भावना समाधानात होती…पण सुलोचनाच्या मनात मात्र अजून एक गोष्ट खुपत होती....ही मुलगी आजही एकटीच आहे…माझ्या मुलासाठी घर सोडलं…आणि तिचं घर तुटून पडलं…
दुपारी सुलोचना बराच वेळ एकटी बसून राहिली...तिच्या हातात भावनेचं लग्नातला फोटो होता...त्यात ना तिचे आई वडील होते ना सुलोचना...तिच्या डोळ्यासमोर भावनेच्या आई-वडिलांचा चेहरा दिसला....क्षणभर ती थांबली…आणि मग ठामपणे फोन उचलला आणि भावनाच्या फोन मधून आईचा नंबर घेतला...
आणि कॉल केला....
आणि कॉल केला....
फोन वाजत राहिला…
मग उचलला गेला.
“हॅलो?”
मग उचलला गेला.
“हॅलो?”
सुलोचनाचा आवाज थोडा थरथरला. “मी… सुलोचना बोलतेय.”
पलीकडे क्षणभर शांतता.
पलीकडे क्षणभर शांतता.
“मला माहितीये… तुम्ही दुखावलेत,”
सुलोचना पुढे म्हणाली, “पण एक आई म्हणून मी तुमच्याशी बोलतेय. तुमची मुलगी चुकीची नाही.”
सुलोचना पुढे म्हणाली, “पण एक आई म्हणून मी तुमच्याशी बोलतेय. तुमची मुलगी चुकीची नाही.”
भावना दुसऱ्या खोलीत होती.
तिला काहीच माहीत नव्हतं.
“तिनं प्रेम केलं…आणि त्याची किंमत तिनं खूप दिलीय,”
तिला काहीच माहीत नव्हतं.
“तिनं प्रेम केलं…आणि त्याची किंमत तिनं खूप दिलीय,”
सुलोचनाचा आवाज भरून आला. “आता तिला तिचं माहेरही नाकारायचं का?”फोनपलीकडून हुंदका ऐकू आला.
“ती आमची मुलगीच आहे…”भावनेच्या आईनं हळूच म्हटलं.
त्या शब्दांनी सुलोचनाचं मन हलकं झालं. “उद्या घरी या… मुलगी म्हणून.”सायंकाळी सुलोचना भावनेजवळ आली.
“भावना…”
“हो आई?”
“हो आई?”
“उद्या तुझी आई-बाबा येणार आहेत.”
भावना जागेवरच शांत झाली “काय…? खरंच?”
भावना जागेवरच शांत झाली “काय…? खरंच?”
“हो,”
सुलोचना शांतपणे म्हणाली, “मी त्यांना बोलावलं. कारण कोणतीही मुलगी माहेराशिवाय पूर्ण नसते.”
सुलोचना शांतपणे म्हणाली, “मी त्यांना बोलावलं. कारण कोणतीही मुलगी माहेराशिवाय पूर्ण नसते.”
भावनेच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती काही बोलू शकली नाही. फक्त सुलोचनाच्या हातात डोकं टेकवलं...दुसऱ्या दिवशी भावनेचं माहेर आलं. घरात तणाव होता…पण सुलोचना पुढे गेली.
“माझ्याकडून चूक झाली,”
ती ठामपणे म्हणाली, “पण आता ही माझी मुलगी आहे. तुमचीही.”
“माझ्याकडून चूक झाली,”
ती ठामपणे म्हणाली, “पण आता ही माझी मुलगी आहे. तुमचीही.”
भावनेची आई भावनेला घट्ट मिठी मारून रडली. “माफ कर बाळा…”
नंदा दूर उभी होती. आज तिला पहिल्यांदाच कळलं की नाती तोडण्यात ताकद नसते… ती जोडण्यात असते.अमोल सगळं पाहत होता.. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञता होती.आणि भावनेच्या मनात एकच विचार होता की आज मला सासरही मिळालं… आणि माहेरही परत मिळालं.
घर आज वेगळंच वाटत होतं.हसण्याचा आवाज, बोलण्याचा गोंगाट…आणि तरीही एक शांत समाधान.भावनेचे आई–वडील अजूनही घरातच होते.सुलोचना त्यांच्या शेजारी बसली होती.
“तुमची मुलगी खूप मजबूत आहे,”
सुलोचनानं शांतपणे म्हटलं. “पण मजबुतीचा अर्थ एकटेपणा नसतो.”
सुलोचनानं शांतपणे म्हटलं. “पण मजबुतीचा अर्थ एकटेपणा नसतो.”
भावनेची आई डोळे पुसत म्हणाली, “आम्ही रागात तिचं दुःख पाहिलंच नाही.”
भावना स्वयंपाकघरातून हे सगळं ऐकत होती.तिच्या डोळ्यांत पाणी आलं…पण आज ते वेदनेचं नव्हतं....
सुलोचना पुढे म्हणाली, “आजपर्यंत मी तिला सून म्हणून पाहिलं… पण आतामी तिला माझी मुलगी मानते.”
तो क्षण भावनेसाठी आयुष्यभराचा होता....अमोल हळूच तिच्या जवळ आला. “आता तू कधीच एकटी पडणार नाहीस.”
नंदा पुढे आली. “मीही शिकतेय… नाती जपायला.”
सायंकाळी भावनेच्या हातात पहिल्या पगाराचं पाकीट होतं. तिनं ते सुलोचनाच्या हातात ठेवलं.
“आई…”
“आई…”
सुलोचना हसली. “हे तुझ्या स्वप्नांचं फळ आहे. घराचं नाही.”
भावना डोळे मिटून म्हणाली “आज मला कळलं… माझं आयुष्य लग्नानं सुरू झालं नाही आणि कुणाच्या भूमिकेत अडकून संपणारही नाही.”
भावना डोळे मिटून म्हणाली “आज मला कळलं… माझं आयुष्य लग्नानं सुरू झालं नाही आणि कुणाच्या भूमिकेत अडकून संपणारही नाही.”
ती सासूची सून होती…
मुलाची बायको होती…
पण आता त्यासोबतच
ती स्वतःच्या आयुष्याची मालकीण होती.
मुलाची बायको होती…
पण आता त्यासोबतच
ती स्वतःच्या आयुष्याची मालकीण होती.
समाप्त.....
कथा आवडल्याच नक्की लाईक करा आणि फॉलो करा..म्हणजे मला आणखी कथा लिहायचा जोश येईल
तुमचीच स्नेहा
तुमचीच स्नेहा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा