Login

सासूची सून....की मुलाची बायको ?

हि कथा आहे एका प्रेमळ मुलीची जी सासरी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते...
सासूची सून… की मुलाची बायको?
भाग १ : न स्वीकारलेलं नातं

प्रत्येक मुलीला वाटत असतं की तीच लग्न स्वप्नासारखं व्हाव...खुशीने,आनंदाने आणि लग्नानंतरच आयुष्य खूप सुंदर जावं... भावनाने सुद्धा तेच स्वप्न रंगवलं होतं....पण....

तो उंबरठा भावनासाठी नवीन नव्हता…पण आज तो उंबरठा ओलांडताना तिचे पाय थरथरत होते.हे लग्न कुणाच्या संमतीने झालेलं नव्हतं.ना सुलोचनाच्या,ना घरच्यांच्या.अमोल तिच्या शेजारी उभा होता.डोळ्यांत ठामपणा, पण मनात अस्वस्थता.

“चल… आत जाऊ,”
तो हळूच म्हणाला.

दार उघडताच सुलोचना समोर उभी होती.डोळे लाल, चेहरा कठोर.
“कशासाठी आलात?”
तिचा आवाज थंड होता… पण दुखऱ्या जखमेवरचा

अमोल पुढे सरसावला.
“आई… आम्ही लग्न केलं आहे.”
त्या शब्दांनी घरात शांतता पसरली. अमोल आणि भावना दोघेही कॉलेज मित्र होते ...तिच्या घरी अमोल ने लग्नासाठी शब्द टाकला होता पण त्यांना ते मान्य नव्हते आणि ते भावना साठी मुले बघायला लागले होते त्यामुळे अमोल ने हा निर्णय घेतला होता ....पण तो एका ठिकाणी चुकला तो म्हणजे त्याने स्वतःच्या घरी काहीच सांगितले नव्हते...त्यामुळे हे सगळ विचित्र वातावरण तयार झालं होत ...

क्षणभर सगळं थांबलं.
सुलोचनाने भावनेकडे पाहिलं.ती नजर रागाची नव्हती…ती होती दुखाची.
“माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेलंस…”
ती थरथरत्या आवाजात म्हणाली.

भावनेनं मान खाली घातली.
डोळ्यांत पाणी होतं, पण ओठांवर शब्द नव्हते.तेवढ्यात नणंद पुढे आली.
“आई, हिच्यामुळेच सगळं झालंय.
आधी पळवून नेलं, आता घरात हक्क सांगायला आली!”... अशाच असतात या मुली आधी मैत्रीण बनून मुलाच घर दार बघायचं आणि मग त्याला फसवून लग्न करायचं... हेच संस्कार असतात मुलींना...


“नाही…”भावनेच्या तोंडातून नकळत शब्द निघाला.
“मी कुणाला पळवलं नाही…”
पण तिचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही.

सुलोचनाने ठामपणे सांगितलं,
“ही माझ्या घरात सून म्हणून आली असली,
तरी माझ्या मनात तिला जागा मिळायला वेळ लागेल.”

त्या वाक्याने भावनाचं काळीज चिरलं.
रात्री भावना खोलीत एकटी बसली होती.घरात ती असली…
पण घर तिचं नव्हतं.मी त्याचा प्रेमासाठी आले…पण इथे मला गुन्हेगारासारखं पाहिलं जातंय…या आधी मी मैत्रीण म्हणून या घरात आली तेव्हा सगळे माझ्याशी खूप छान वागत होते आणि आता हे असे.... ती खूप दुःखी झाली

दुसऱ्या खोलीत सुलोचना जागीच होती.डोळ्यांत अश्रू होते.
मुलगा माझा आहे…पण त्याने माझा विश्वास का मोडला?
आणि नणंद…ती मनातच ठरवत होती कीही मुलगी या घरात टिकणार नाही आणि मी टिकू पण देणार नाही...


नातं तयार झालं होतं…पण स्वीकाराशिवाय.आणि इथूनच सुरू झाली...ती म्हणजे एका सुनेची खरी परीक्षा.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all