सासूची सून… की मुलाची बायको?
भाग ४ : दुखावलेली आई
भाग ४ : दुखावलेली आई
सततचे विचार आणि घरच्या वातावरणामुळे भावना त्रासून गेली होती...गेल्या काही दिवसात फक्त आणि फक्त ती दुखावली गेली होती...तिच्या डोक्यात सारखे विचार यायचे ki
मी इथे राहू शकणार का?रात्रभर झोप येऊनही ती झोप नव्हती.
डोळे मिटले तरी मन जागंच होतं.सकाळ झाली.
मी इथे राहू शकणार का?रात्रभर झोप येऊनही ती झोप नव्हती.
डोळे मिटले तरी मन जागंच होतं.सकाळ झाली.
भावना नेहमीप्रमाणे उठली,पण आज तिच्या हालचाली मंद होत्या.स्वयंपाकघरात जाण्याआधी ती क्षणभर थांबली.हॉलमध्ये सुलोचना देवासमोर बसली होती.हात जोडलेले, डोळ्यांत अश्रू.
“देवा…
माझ्या मुलाला सुखी ठेव,”
माझ्या मुलाला सुखी ठेव,”
तिचा आवाज भरून आला.
“चुकलो असेल तर मलाच शिक्षा दे…
पण त्याच्या आयुष्यात दुरावा नको.”
“चुकलो असेल तर मलाच शिक्षा दे…
पण त्याच्या आयुष्यात दुरावा नको.”
हे शब्द भावनाच्या कानावर पडले.ती दारातच थांबली.
त्या क्षणी तिला कळलं की ही स्त्री रागावलेली नाही…ती दुखावलेली आहे.सुलोचना उठली.तिची नजर भावनेवर गेली.
क्षणभर दोघी एकमेकींकडे पाहत राहिल्या.
त्या क्षणी तिला कळलं की ही स्त्री रागावलेली नाही…ती दुखावलेली आहे.सुलोचना उठली.तिची नजर भावनेवर गेली.
क्षणभर दोघी एकमेकींकडे पाहत राहिल्या.
“झोप झाली का?”
सुलोचनानं हळूच विचारलं.
सुलोचनानं हळूच विचारलं.
हा प्रश्न साधा होता…
पण भावनेसाठी मोठा.
पण भावनेसाठी मोठा.
“नाही… थोडीच,”
भावना नम्रपणे म्हणाली.
भावना नम्रपणे म्हणाली.
सुलोचनानं काही न बोलता गॅस कडे पाहिलं.
“चहा ठेवशील का?”
“चहा ठेवशील का?”
भावनेच्या डोळ्यांत पाणी तरळलं.तिनं मान हलवली.
चहा तयार झाला.सुलोचना कप हातात घेऊन बसली.
चहा तयार झाला.सुलोचना कप हातात घेऊन बसली.
“तू…
काही खाल्लंस का काल?”
ती थोडी अडखळत म्हणाली.
काही खाल्लंस का काल?”
ती थोडी अडखळत म्हणाली.
भावना गप्प राहिली.
“राग मनात ठेवल्यानं पोट भरत नाही,”
सुलोचना पुटपुटली.
सुलोचना पुटपुटली.
तो पुढाकार छोटा होता…पण प्रामाणिक.तेवढ्यात नंदा आली.
“आई, उशीर होतोय,”
तिनं वातावरण तोडण्याचा प्रयत्न केला.
तिनं वातावरण तोडण्याचा प्रयत्न केला.
सुलोचना लगेच कठोर झाली नाही.पण ती काही बोललीही नाही.दुपारी सुलोचना एकटीच खोलीत बसली होती.हातात अमोलचा जुना फोटो.मी त्याला जन्म दिला…आज त्याचं सुख माझ्यामुळे धोक्यात येतंय का?तेवढ्यात भावना चहा घेऊन आत आली.
“ठेव इथे,”
सुलोचनानं सांगितलं.
सुलोचनानं सांगितलं.
थोडा थांबून ती म्हणाली,
“माझं दुखणं तुझ्यावर राग म्हणून निघतंय…
हे मला कळतंय.”
“माझं दुखणं तुझ्यावर राग म्हणून निघतंय…
हे मला कळतंय.”
भावनेचं काळीज दडपलं गेलं.
“पण वेळ दे,”
सुलोचनाचा आवाज थरथरला.
“हा धक्का पचवायला.”
“पण वेळ दे,”
सुलोचनाचा आवाज थरथरला.
“हा धक्का पचवायला.”
भावनेनं डोळे मिटले.
“मी वाट पाहीन, आई.”
“मी वाट पाहीन, आई.”
तो शब्द ऐकून सुलोचनानं मान खाली घातली.रात्री अमोल घरी आला.भावना शांत होती…आणि सुलोचना विचारात.नंदा मात्र हे सगळं पाहत होती.तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली.आई बदलतेय…हे योग्य नाही.त्या रात्री सुलोचनानं पहिल्यांदाच मनात कबूल केलं की ही मुलगी चुकीची नाही…चूक फक्त पद्धतीची होती.
भावनांच्या मैत्रिणीचा कॉल आला आणि दोघी बोलत होत्या त्यात तिला मैत्रीण म्हटली की तू परत कामाला ये तुझं मन रमेल ...भावनाने आता विचार केला की रात्री अमोल आला की मी कामाबद्दल त्याला विचारेल....
क्रमशः
