श्वेता सविताला विचारते "काय हो ताई तुम्ही सासूबाईंना आई का बोलता? आपल्याकडे शक्यतो सासूबाईंना आत्या असेच बोलवलं जात".
अगं हो आपल्याकडे बरेचजण सासूबाईंना आत्या असेच बोलतात. पण मीच आई असे बोलते कारण माझी आई लहानपणीच मला सोडून गेली. मी लहानाची मोठी मामा- मामीच्या घरी झाली. त्यामुळे मी सासूबाईंमध्येच आई शोधू लागले.
श्वेता बोलते तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का सविताताई...
हा बोल ना...
आपली आई कशी असते तुम्हाला सांगू का?
अगं सांग ना....
आपली आई नेहमी असाच विचार करते की, " आपण जसे दिवस भोगले . तसे दिवस आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये". पण प्रत्येक सासू कसा विचार करते तुम्हाला माहित आहे का?
सविता बोलते कसा विचार करते....
आपण जसे दिवस भोगले तसे दिवस सुनेने भोगले तर काय तर काय झालं... प्रत्येक सासू असच बोलते की तुमच्यापेक्षा आमचा काळा हा खूप कठीण होता म्हणून..
"सविता बोलते, आपण सासुबाईंना आई बोललं तर त्या आपल्यावर आईप्रमाणेच माया प्रेम करतील. आत्या अशी हाक मारली तर सासू आणि सुनेमध्ये प्रेमाचे नाते राहणार नाही.
श्वेता मनातच विचार करते कितीही झालं तरी सासू ही आईची जागा घेऊ शकत नाही." खरंतर श्वेताला सासूबाईंना आई बोलायचं नसतं". आई इतकं प्रेम कोणतीही सासू आपल्या सुनेवर करू शकत नाही.
सविता बोलते पटकन काम करून घे..आज आपल्या नंदूबाई येणार आहेत. त्या यायच्या आधी स्वयंपाक झाला पाहिजे.
थोड्याच वेळात श्वेता आणि सविताची ननंद दिपाली घरी येते. हे बघून श्वेताच्या सासुबाई म्हणजेच पार्वती बाई बोलतात.... आज सर्व जेवण माझ्या लेकीच्या आवडीचं झालं पाहिजे. माझी लेक खूप दिवसांनी घरी आली आहे.
श्वेता आणि सविता दिपालीचा चांगला पाहुणचार करतात. अगदी पाण्याच्या ग्लासापासून ते चहाच्या कपापर्यंत सर्व काही हातामध्ये नेऊन दिल जात.
श्वेताला मात्र घरातली काम करून खूप थकवा आलेला असतो . पण सांगणार कोणाला ! "आई असती तर थोड्यावेळ आराम कर असं बोलली असती". पण शेवटी या सासूबाईचं , कितीही काम केलं तरी त्यांना कमीच वाटणार...
श्वेता थकून खोलीत झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई आवाज देतात. ये उठा 6:00 वाजले. रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे श्वेताला काही उठावेसे वाटत नव्हते. पण सासूबाईंनी आवाज दिल्यामुळे ती उठते. व कामाला लागते...
श्वेता आणि सविता सर्व नाष्ट्याची तयारी करून ठेवतात. दिपालीताई कुठे आहेत? नाश्ता तयार झाला आहे. त्यांना लवकर खाली नाश्त्यासाठी बोलवा....
त्यावेळी सासुबाई बोलतात एवढ्या दिवसांनी माझी मुलगी माहेरी आली आहे . ती तिला हवा तेवढा वेळ झोपू देत. उठल्यानंतर नाष्टा करेल . तोपर्यंत बाकीच्यांना द्या.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा