Login

सातवी माळ: देवी कालरात्री

Devi Kalratri And Deepthi Jeevanji
सातवी माळ:देवी कालरात्री

“या देवी सर्वभुतेषु मा कालरात्री रुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”

आज शारदीय नवरात्रीची सातवी माळ आहे. आश्विन शुक्ल पक्षातल्या सप्तमीला दुर्गा देवीचे सातवे रुप असलेल्या देवी कालरात्रीला पुजले जाते.
कालरात्री देवी दुष्टांचा नाश, संकटांवर मात करणारी आदिशक्ति आहे. श्वासातचं अग्नीदेवतेचे स्थान असलेल्या ह्या देवीच्या एका हातात खड्ग, दुसर्या हातात लोखंडी शस्त्र विराजमान आहे. तिसरा हात अभयमुद्रेत तर चौथ्या हातात वरमुद्रा आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये कांस्यपदकाने जगज्जेती बनलेली धावपटू दीप्ति जीवनजी ही आजच्या काळातील देवी कालरात्रीचे प्रतिक मानले पाहिजे.

२०२४ च्या पॅरालिम्पिक्समध्ये अनेक खेळाडुंच्या संघर्ष कथा आपल्याला प्रेरणादायक ठरत आहेत. त्या कथासंग्रहात दीप्तिची कथा देखील स्फूर्तिदायक आहे.

सूर्यग्रहणादरम्यान झालेल्या जन्माचे निमित्तमात्र. दीप्तिचे बौद्धिक अपंगत्वाने (इंटेलेक्चुअल डिसएबिलिटी) संपूर्ण आयुष्य अंधारमय झाले. डोके, ओठ व नाक यांची रचना रेखीव नसल्याने इतर लोकांसाठी ती चेष्टेचा विषय झाली होती.

IMPOSSIBLE ला I M POSSIBLE मध्ये बदलायचं असेल तर देवी कालरात्रीसारखे श्वासात अग्निरूपी जिद्द, एका हातात मानसिकस्वास्थ्य बिघडविणारे या हिनवृत्तीच्या लोकांचा; मानसिक वधासाठी केलेले खड्ग. दुसर्या हातात येणार्या प्रत्येक संघर्षमयी अडथळ्यांचा कायापालट करणारे लोखंडी शस्त्र घ्यावेचं लागेल हे दीप्ति व तिच्या आईवडिलांना कळुन चुकले होते.

धावपट्टीच्या रणांगणावर या योध्द्या धावपटूने ही सर्व शस्त्रे धारण करून यशाकडे झेप घेतली व २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदकाने सर्वांचे डोळे आणि ऊर भरून आणले.

तर हया युवा धावपटूच्या आव्हानात्मक धावांना मिळो पूर्णविराम व यश, कीर्ती व प्रतिभावान धावांना मिळो गती ही देवी कालरात्रीच्या चरणी प्रार्थना.

“अपूर्णत्व असतं पूर्णत्वाची धावपट्टी
संघर्षातून समृद्धीकडे नेणारी फूटपट्टी.”

प्राजक्ता जोश सुपेकर
०९|१०|२०२४

0

🎭 Series Post

View all