नाईलाजाने का होईना पण आता संयु प्रवीण ची बायको झाली.
संयुला काहीच अंदाज नव्हता की आता तिच्या पुढे नियतीने काय वाढून ठेवले आहे. घरात तर नवीन सुनेचा छान लाड चालू होता,पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस...
संयुच्या मोबाईल ची रिंग वाजते. कावेरी म्हणजेच संयुच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो.
कावेरी- संयु, congratulation!!
संयु- "अगं congrats काय करतीस तुला माहीत आहे ना हे लग्न म्हणजे फक्त compramise आहे माझ्यासाठी...आम्ही दोघांनी तर एकमेकांना लग्नातच बघितलं पहिल्यांदा, मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही."
कावेरी- "पण संयु आता तुझ्या स्वप्नांचं काय? तू एकदा प्रविणला सांगून तर बघ काय होतंय ते!
प्लीज तुझ्या स्वप्नासाठी स्वतःला एक संधी देऊन तर बघ!"
तेवढ्यात दुर्गाबाई संयुच्या रूममध्ये येतात. संयु फोन कट करते...
दुर्गाबाई- "सुनबाई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, हे बघ आता तू आमच्या घराण्याची सून झालीस! त्यात तू घरातली थोरली सून!
तुझ्यावर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या टाकून मला आता मोकळं व्हायचं आहे!
संयु- पण माई....!
संयुच्या बोलणे मधेच थांबवत
माई- "माझं बोलणं संपलं नाही अजून! आणि मी बोलत असताना मधेच बोललेलं मला चालणार नाही!"
माझ्या मुलाच्या लग्नाची मी खूप स्वप्ने बघितली होती आणि त्यानी आतापर्यंत आमच्या सगळ्यांच खूप केलं आता मला त्याचा सुखाचा संसार बघायचा आहे!
माझं लेकरू लई साधं आहे ग! त्याच्या सुखाची सगळी जबाबदारी आता तुझी आहे, त्याला काय हवं नको ते आता तुलाच बघायचं आहे!
आतापर्यंत त्यानं घरातल्या कुणालाच काही कमी पडू दिले नाही तो तुला ही काही कमी पडू देणार नाही एवढा तो नक्कीच खंबीर आहे!"
" आणि हो अजून एक महत्वाच, आपल्या घरच्या काही रीतिरिवाज आहेत त्या पण तू शिकून घे!
तुमच्या संसाराच्या वेलीवर लवकरचं एखाद फुल उमलू दे!"
एवढं बोलून माई तिला घराण्याच्या सोन्याच्या बांगड्या हातात घालतात आणि बोलतात," या आपल्या घराण्याच्या सोन्याच्या बांगड्या ज्या माझ्या सासूला त्यांच्या सासूने आणि मला माझ्या सासूने दिल्या, त्या आता मी तुला देते,... हा वारसा असाच पुढे चालू राहिला पाहिजे!
एवढं बोलून माई तिथून जातात...
संयु हातातल्या बांगड्याकडे बघत राहते. विचार करते, मी काय स्वप्न बघितली होती आणि आज पुस्तकांच्या जागी माझ्या हातात बांगड्या आहेत! कशी करू मी माझी स्वप्न पूर्ण?
माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे कसे समजावू मी माईंना?त्या ऐकतील का? की प्रवीण ला सांगू?
आशा असंख्य प्रश्नांनी संयुच्या मनात काहूर माजवले होते...
तितक्यात तिला आठवत की किचनमध्ये दूध तापायला ठेवलंय, ती तशीच किचनमधे जाते...
प्रगती आणि माधुरी म्हणजे विकास ची बायको चहा पीत असतात.
माधुरी- "या जाऊबाई चहा घ्या!"
प्रगती- " वहिनी कोणत्या देवाला नवस केला होता ग तू, की एवडा चांगला नवरा भेटला तुला!"
संयुला काही कळलंच नाही.
प्रगती- "अगं वहिनी तू नक्कीच काहीतरी पुण्य करत असणार तेव्हाच तर तुला माझ्या दादासारखा एवढा भारी नवरा भेटलाय!
माधुरीला खूप राग येतो प्रगतीचा...
माधुरी-" तुझ्या विकास दादा बद्दल नाही ग कधी असं बोलली आतापर्यंत!"
असं बोलून ती तिथून निघून जाते.
प्रगती- "जाऊ दे ग वहिनी तिला, ती अशीच आहे!
संयु- "प्रगती, तुझं कॉलेज कसं चाललंय?"
प्रगती- "अग वहिनी बघ ना या करोना मुळे कॉलेज कधी चालू होणार माहीत नाही! आता ऑनलाईन क्लास चालू झालेत आणि माझ्याकडे लॅपटॉप नाही आणि मोबाईल पण नाही!
माई तर काय मला पैसे देणार नाहीत! आता काय करावं तेच कळत नाही मला!
तेवढ्यात दुर्गाबाई तिथे येतात.
दुर्गाबाई- "कशाला पैस लागतात गं तुला? तिकडं शेतात तुझा भाऊ राबराब राबतोय अन तुम्ही उडवा पैसं!
पैसा काय झाडाला लागतोय का की तोडून आणलं आणि दिला तुला! एक पैसा बी मिळणार नाही तुला!"
प्रगती- "अग माई, कॉलेज बंद आहे. आता मोबाईल वर अभ्यास शिकवतात"
माई- ये... काय बोलली ग, मोबाइल वर ? खुळी समजती का ग मला? म्हणे मोबाइल वर शिकवतात अभ्यास!
संयु- माई ,अहो खरं बोलती ती! मोबाईल वर शिकवतात आता!"
माई- "तुला काय ग कळतंय अभ्यासातल? चार बुकं नाही शिकली तर मला अक्कल शिकवायला लागली व्हय तू!
आमच्या काळात सासु पुढं हू का चू करायची हिम्मत नव्हती होत कुणाची, पण ह्या आजकालच्या पोरी....."
प्रगती- "माई, मला नकोय ग पैसे,पण वहिनीला नको काही बोलू!"
दुर्गाबाई तिथून रागातच निघून जातात....
संयु-"प्रगती, तू काळजी नकोस करू, हा घे माझा मोबाईल! हा वापर तू!"
प्रगती- "हो वहिनी, पण फक्त क्लासच्या वेळातच घेईन मी!"
संयु- "ठीक आहे!
संयुला आता खात्री पटली की या घरातल्या मुलीला शिकताना एवढ्या अडचणी येतात, माझं स्वप्न तर दूरच राहील!
माईना सांगून काही होणार नाही, आता माझ्या कडे शेवटचा पर्याय उरलाय फक्त.... प्रवीण
माधुरी- "विकास, मला माहेरी जायचय! सहा महिने होत आलेत हे लॉक डाऊन पडलंय मला कुठंच जाता नाही आलं!
विकास-"माई नाही जाऊ देणार इतक्यात! घरात आताच कुठं लग्न झालाय, एवढी कामं पडली आहेत आणि तुला काय सुचतयां माहेरी जायचं!
माधुरी-"मला काय माहीत नाही,मला जायचय म्हणजे जायचय! आणि माईंनी बघा जाउ बाईला घराण्याच्या सोन्याच्या बांगड्या दिल्यात अन मला काय....!"
विकास- "अग वहिनीचा मान थोरला आहे, अन त्या बांगड्या म्हणजे मानच नाही तर एक जबाबदारी पण आहे!"
माधुरी- "पण मग मला दुसरं काही तरी द्यायचं होत ना! नाही ते काय मला माहित नाही माझी एवढी तरी इच्छा पूर्ण करा तुम्ही!"
थांबा मीच काहीतरी शक्कल लढवते."
माधुरी माईंकडे जाते.
माधुरी-"माई माझ्या पप्पांना बर वाटत नाही, मी भेटायला जाऊ का?"
माई- "थांब मी फोन लावून विचारते, तुझ्या बा ला काय होतंय ते!"
माई फोन करतात..
आता मात्र माधुरीला चांगलाच घाम फुटला करण ती माईंना खोटं बोलली होती.
फोनवर
माई- "काय हो भाऊ कशी आहे तब्येत आता?"
माधुरीचे पप्पा- "मला काय नाय व्हत! अगदी ठणठणीत हाय की मी!"
माई- " मग ठीक हाय, एक काम करा तुमच्या लेकीला इथं करमेना झालयं तिला घ्यायला लगोलग या!
आणि फोन ठेवते. माधुरीकडे डोळे वटारून बघते.
माधुरी माईचे पाय धरते.
माधुरी- "माई मला माफ करा,मला नाही जायचं माहेरी! मी आता कधीच नाव पण नाही काढणार माहेरचं!"
घरात मोठमोठ्याने हा राडा ऐकून सगळे जमा होतात, माधुरी खोटं बोलल्यामुळे माई खूप चिडल्या होत्या. माधुरीने अजून माईचे पाय सोडले नव्हते, संयुला खूप वाईट वाटत होते, अन एकीकडे भीती पण वाटत होती, कारण माईंना खोटं बोललेलं अजिबात आवडत नव्हतं...
तेवढ्यात प्रवीण शेतातून घरी येतो.तो खूप थकलेला असतो, तो स्वतःच किचनमध्ये जाऊन पाणी पितो. माई ते बघतात.
माई- "सुनबाई, तुला काय इथं नुसती शोभेची बाहुली म्हणून नाही आणली!"
जा.. स्वयंपाकाची तयारी कर!
बघू तुझ्या आईने तुला काय काय शिकवलंय!"
संयुला खूप वाईट वाटते, तिला तर स्वयंपाकातले काहीच येत नसत, ती रुम मध्ये जाते..
रात्रीचे 8 वाजले. आज नव्या सूनबाईन काय स्वयंपाक केला असेल म्हणून सगळेच excited होते.
माई- " सुनबाई, आज मिळेल का जेवायला? की सकाळी नाश्त्यालाच येऊ आम्ही?"
संयुने सगळं स्वयंपाक केला असतो. पुरी , वाटाणा-बटाटा भाजी, जिरा राईस, डाळ फ्राय आणि स्वीट मध्ये शिरा!
जेवण तर भारी दिसत आहे पण चवीला....?
सगळं स्वयंपाक छान झाला असतो.
सगळे संयुच खूप कौतुक करतात, जेवणाचा मनसोक्त आनंद घेतात.
माई पण खूप खुश होतात. संयु पण खूप सुखावते..
पण असं कस झालं? जादूच झाली म्हणायची की! संयु तर किचनची पायरी पण चढली नव्हती! मग कसं काय जमला तिला स्वयंपाक?
पाहूया पुढच्या भागात....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा