साथ ही तुझी जशी उन्हात चांदवा भाग एक
लघुकथा
विशेष टिप
आपल्या देशाच्या एका पूर्वोत्तर राज्यात दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला तेंव्हा एका विशिष्ट समुदायातील महिलांवर हिंसाचार झाला त्यानंतर ही कथा लिहिण्यात आलेली आहे . पण तरी ह्या घटनेतील सर्व प्रसंग व्यक्ती जागा ही काल्पनिक आहेत. कथा केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी लिहीली आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा यात हेतू नाही. वाचकांनी याची नोंद घ्यावी.
विंडो सिटची मजा घेत रश्मी पुस्तक वाचलं बसली होती... उद्यापासून मोतीपूरच्या एका दवाखान्यात ती नर्स म्हणून रुजू होणार होती. गेल्या दशकापासून तिची ताई तिथेच राहत होती.... नोकरीच्या निमित्ताने ताईजवळ राहता येईल आणि वेगळ्या प्रांतात जीवन जगण्याचा अनुभवही मिळेल......
किती वाजले हे बघण्यासाठी तिने मोबाईल ओपन केला... आणि तिच्या कॉलेज मैत्रिणींच्या ग्रुप वर अंगावर शहारे आणणारा विडिओ तिच्या नजरेसमोर पडला...
अजूनपर्यंत दोन समाजातील तेढ चालू असल्याने मोतीपूर धगधगत आहे हे तिला ठाऊक होते पण.. आज तिथल्या प्रांतात महिलांचा अपमान करणारा तो विडिओ पाहून तिचा मोतीपूरला जाण्याचा विचार किती चुकीचा आहे हे तिला पटले....
तिच्या मैत्रीणीनी अनेकदा समजावूनही तिने हा निर्णय घेतला होता कारण तिची ताई ज्या भागात राहत होते तिथं अजूनही शांततापूर्वक वातावरण होते. आणि अचानक तिला आता असुरक्षित वाटू लागले....
तिने ट्रेनमध्ये आजूबाजूला नजर फिरविली... सगळीकडे मोतीपूरनिवासिच दिसत होते आणि त्यातही भीतीदायक असे होते की तिने जेंव्हा पूर्ण बोगी मध्ये फिरून पाहिले तर तिच्या व्यतिरिक्त फक्त चारच स्त्रिया होत्या. आणि त्या पण वयस्कर.... ती घाबरली... या सर्वांनी आपल्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला तर?.... लेडीज कम्पार्टमेन्टमध्ये सीट न मिळाल्यामुळे तिने जनरल बोगीत रिझर्वेशन केले होते..... ती परत सीटवर येऊन बसली... तिच्या समोरच एक तिच्याच वयाचा तिथल्या प्रांतातला युवक बसला होता...... तो मोबाईलवर काही बघण्यात busy होता. मधून मधून हसतही होता..
"हा तो विडिओ पाहून हसत नसेल ना?..... शी... How disgusting...किती नालायक माणूस आहे हा.." त्याच्याकडे पाहत ती म्हणाली... तसे त्याने तिच्याकडे पाहिले.
"ओ मॅडम... काय बोलताय?... मी काय केलय तुमचे?" डोळ्यावर येणारे सिल्की केस मान उडवत बाजूला करत तो म्हणाला.
'आयला... हा चक्क मराठी बोलतो...'
"त त त..... तुम्ही काय बघताय मग मोबाईल मध्ये... शी... लाज वाटत नाही असे videos बघायला..."
तो गोंधळला... नंतर ती मोबाइलवरून बोलत आहे हे समजल्यावर त्याने मोबाईल स्क्रीन तिच्याकडे दाखविली... तो मिस्टर बिन बघत होता...
त्याच्यावर उगीच बिनबुडाचे आरोप केले म्हणून तिला लाज वाटली.... आणि काहीशी चाचरत ती म्हणाली,
" ससॉरी... मला वाटले..."
"राहू दे तुम्हाला काय वाटले ते मला अजिबात ऐकायचे नाही." तो चिडूनच म्हणाला.
ती परत आपल्या जागेवर बसली... पुस्तकं वाचण्यात तिचे मन लागत नव्हते.....तिने परत चोरून त्याच्याकडे पाहिले.... तसा मवाली नाही वाटत... साधाच वाटत आहे...दिसायला पण बराच आहे.
काही वेळाने ट्रेन अचानक थांबली कुठचेतरी अनोळखी स्टेशन होते ते.. ट्रेनच्या ट्रॅकवर दगड टाकून ट्रेन अडविण्यात आली होती. आणि खूप मोठा जमाव तिथे निदर्शने करत होता.. आता मात्र ती घाबरली.... तो युवक आणि बोगितले इतर जण दरवाजाजवळ वाकून बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले......
तो युवक घाईघाईने आत आला आणि तिथल्या स्त्रियांशी बोलला आणि त्यांच्याकडून दोन बांगड्या आणि टिकलीचे पाकीट मागून घेतले. आणि
तो तिच्याजवळ आला.
तो युवक घाईघाईने आत आला आणि तिथल्या स्त्रियांशी बोलला आणि त्यांच्याकडून दोन बांगड्या आणि टिकलीचे पाकीट मागून घेतले. आणि
तो तिच्याजवळ आला.
"शुक शुक...."
ती खिडकीबाहेर बघत बाहेर काय चाले आहे त्याचा अंदाज घेत होती त्याने बोलावल्यावर घाबरून तिने मागे वळून बघितले ...
त्याने तिच्यासमोर बांगड्या धरल्या...
"या घाल...."
"मी का घालू?"
मी तुझ्या सेफ्टीसाठी सांगतोय... त्या बांगड्या घाल आणि ही टिकली पण लाव... थोडावेळ माझी बायको बनायचंय तुला..."
"ए.... मला वाटलेच होते.... तुझी नियत चांगली नाही ते... तुला काय वाटते... मला जबरदस्ती इथून घेऊन जाणार आहेस...."
"ओ मॅडम.... मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही.... तुला कल्पना आहे का इथे काय चाललंय ते... ट्रेन जबरदस्तीने थांबवलेय दंगलखोरांनी....... तू आमच्यासर्वांपेक्षा सर्वात वेगळी दिसत आहेस... कोणीही तुझा गैरफायदा घेऊ शकते इथे... पोलीसही हस्तक्षेप करत नाहीत त्यात.... ही काय मुंबई नाही.... बाकी तुझी मर्जी.... इथून बाहेर पडेपर्यंत हे घाल.... मग एकदा या जमावापासून बाहेर पडल्यावर तुला कुठे जायचंय तिथे जा.." इतके बोलून तो ट्रेनच्या विंडोजवळ आला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला....
रश्मीने खिडकीतून वाकून पाहिले.... जमाव हिंस्त्र झाला होता... तिने त्याने दिलेल्या बांगड्या पटकन हातात घातल्या आणि कपाळाला टिकली लावली... जोडीला स्टोल डोक्यावरून ओढून घेतला.....
तो खिडकीबाहेर पाहत होता.... काहीसा बैचेन वाटत होता. त्याने खिशातून फोन काढला... तर बॅटरी डेड झाली होती.
तो खिडकीबाहेर पाहत होता.... काहीसा बैचेन वाटत होता. त्याने खिशातून फोन काढला... तर बॅटरी डेड झाली होती.
"शुक शुक.... आता ठीक आहे?"
त्याने आपले सामान जवळ करता करता तिला ओझरते पाहिले.. तो नजर बाजूला नेणार इतक्यात त्याची नजर तिच्यावरच स्थिरावली... तिची निमगोरी कांती कपाळाला टिकली लावून स्टोल ओढून एकदम लोभस दिसत होती... त्याने भावनांवर नियंत्रण ठेऊन आपली नजर परत वळविली आणि तो म्हणाला,
"ठीक आहे... आता तुझे सामान घे आणि माझ्या बरोबर चल."
ट्रेनमधली लोक घाईघाईत उतरून तिथून निघून जाऊ लागली... ती पण त्याच्या पाठोपाठ स्वतःची बॅग खांद्याला लावून चालू लागली. स्टेशनच्या गेटजवळ जाताच पाच सहा दंगलखोरांनी त्यांना थांबवले,
"##### ##### ### ###" त्यातील एकाने विचारले... त्यांची भाषा तिच्या समजण्याच्या पलीकडे होती.
"#### #### ##### wife." तो जे बोलला त्यापैकी तिला फक्त एवढेच समजले....
घोळक्यातील एकजण तिच्या काहीसा जवळ जाऊ बघत होता तसे ट्रेनमध्ये भेटलेल्या "शुकशुक' ने तिला स्वतःच्या मागे घेतले... आणि तिच्यापुढे तो ढाल बनून उभा राहिला.
भीतीने तिने त्याचे मनगट गच्च पकडले व ती त्याच्या किंचित जवळ सरकली..
भीतीने तिने त्याचे मनगट गच्च पकडले व ती त्याच्या किंचित जवळ सरकली..
त्या लोकांची खात्री झाल्यावर ते पुढे निघून गेले
आणि तो पुढे चालू लागला... तशी ती त्याला खेटून त्याचे मनगट पकडत त्याच्या बरोबर चालू लागली...
त्याने तिरक्या नजरेने त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या तिला पाहिले.
आणि तो पुढे चालू लागला... तशी ती त्याला खेटून त्याचे मनगट पकडत त्याच्या बरोबर चालू लागली...
त्याने तिरक्या नजरेने त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या तिला पाहिले.
"आता तू मोकळी चालू शकतेस... ते गेले... "
तिने तरीही त्याचे मनगट सोडले नाही.. ती घाबरली होती... तिने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे मनगट धरून चालण्याची विनंती केली...
"Please".
क्रमशः
या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग लगेचच post करीत आहे. कथा कशी वाटली ते वाचून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा