साथ भाग-10(अंतिम)

And last radha and rohan stay together

साथ

भाग 10

    राधाची आई लगेच येते. पिहू ला बर आहे बघून त्यांना ही हायस वाटत. सगळेच पिहुची काळजी घेतात.सगळं आवरून झाल की दुपारी राधा ची आई आणि विक्रांतची आई बोलत बसतात. बोलता बोलता विक्रांतच्या आई रोहन विषयी सांगतात. त्याने किती मदत केली. इतर वेळेस ही तो पिहुशी किती छान वागतो. "राधाच्या आई, खरंच रोहन खूप चांगला आहे , आपल्या मुली आनंदात राहतील त्याच्याकडे. तुम्ही रोहनच्या आईशी एकदा बोलता का?" इतक्यात बेल वाजते, विक्रांतची आई दार उघडते तर समोर रोहन ची आई असते. 
    " रोहन म्हणत होता , आता नको जाऊस, पण मलाच राहवत नव्हत हो म्हणून आले". 
    " आहो त्यात काय, पिहू तुमची पण नात च आहे की. " आत घेत विक्रांतच्या आई त्यांना म्हणाल्या, "पिहू आणि राधा झोपल्यात आत्ता, या आपण या खोलीत बसूया".

     तिन्ही आया बोलत बसतात. पिहू बद्दल , राधा बद्दल....त्यांना वाटणारी काळजी ,प्रेम... बोलता बोलता रोहन ची आई त्यांना म्हणते ,मला राधाला सून म्हणून हवी आहे. पण राधाशी या विषयावर बोलणं तस अवघड आहे. तिला न दुखावता आपल्याला तीच मन वळवायला हवं. रोहन ला राधा आवडते, आणि आम्हा सगळ्यांना पण....आणि आपण सगळे एकाच गावात राहतो त्यामुळे राधा पिहू दोघीही कायम तुमच्या हाकेच्या अंतरावरच असतील.राधाची आई आणि विक्रांतच्या आई दोघीना पण खूप समाधान वाटत, आपल्या राधाच्या सुखी आणि आनंदी भविष्याचा चित्र त्यांच्या नजरे समोर उभं राहत.
     पिहू आणि राधा ला भेटून रोहन च्या आई निघून जातात.
     मध्ये थोडे दिवस जातात, रोहन ही राधाला फोन केला तरी फक्त पिहू विषयी बोलतो. राधाला जाणवत असत की रोहन दुखवलाय.

  " आई, मला आज रात्रीच्या विमानाने  अमेरिकेला जावं लागणार आहे 15 दिवसासाठी. " रोहन 

"   रोहन, अरे अचानक काय?" मोठी आई

"अगं आई महत्वाचं काम आहे. म्हणून , बर ऐक ना माझी सामानाची तयारी करून ठेव, मी पटकन पिहू आणि राधाला भेटून येतो.त्याआधी  फ्रेश होऊन येतो तोपर्यंत प्लीज मला कॉफी दे ना."रोहन

" रोहन , अरे राधा नाहीये, ती गावाला गेलीये मामा कडे तिच्या. 2- 3 दिवस साठी, मी फोन केला होता तिला पण तिने उचलला नाही , मग विक्रांतच्या आईने सांगितलं.जाऊदे रे तिला ही चेंज हवाच होता. बर तू तयारी कर तुझी रात्रीच निघावं लागेल ना तुला." मोठी आई खोटंच बोलते.

   अचानक कशी गेली असेल राधा विचार करतच त्याचा ऑफिस चा फोन येतो आणि रोहन बिझी होतो. 

   रोहनची आई खोलीत जाऊन विक्रांतच्या आई ला फोन करतात आणि सगळा प्लॅन समजावून सांगतात.

     "राधा, मला आज तुझा फोन देशील का ग?" रात्री ना आज माझ्या मैत्रिणीचा विडिओ कौल करणार आहोत, चालेल ना तुला , तुझा नंबर दिलाय मी." विक्रांतची आई राधाला विचारते. " हो आई काहीच हरकत नाही, तुमच्याकडेच राहुद्या मी सकाळी घेईन. " म्हणून राधा झोपायला जाते.

     कॅब मध्ये बसल्या बसल्या , रोहन राधाला बरेचदा फोन करतो पण राधचा फोन स्विच ऑफ लागतो. शेवटी राधाला विमानात बसण्यापूर्वी एक मेसेज करतो. 

   सकाळी राधाच्या फोन वर रोहन चा मेसेज विक्रांत च्या आई डिलीट करतात, " सॉरी राधा, हे चूक आहे तुला आलेला मेसेज मी असा डिलीट करतीये, पण हे तुला आणि रोहन ला एकत्र आणण्यासाठीच."

  2- 3 दिवस रोहन चा एकही मेसेज नाही फोन ही लागत नाहीये त्याचा, शेवटी राधा मोठ्या आईला फोन करते तेव्हा तिला समजत की रोहन अमेरिकेला गेलाय....माहीत नाही कधी येईल.

   राधा ला खूप वाइट वाटतं, खूप चुकीचे वागलो आपण रोहन शी, म्हणून तो असा न सांगता गेला .पिहू आणि राधा ला रोजच रोहन ची आठवण येत होती.छोटे छोटे प्रसंग, रोहन पिहू आणि राधानी एकत्र घालवलेले क्षण आठवत होतें. राधा रोहन ला मिस करत होती.

   एक दिवस संध्याकाळी राधा खोली आवरताना , पिहू अचानक म्हणते, " मम्मा, रोहन अंकल बाबा होणारे का माझा?"

  पिहू च्या या अचानक प्रश्नाने राधा बावरते, " हे तुला कोणी सांगीतल पिहू?"

   " अगं मम्मा काय झाल, म्हणजे मी चोरून ऐकलं नाही, आणि तू म्हणतेस तस मोठ्यांच फोनवरच पण ऐकलं नाही, त्याच काय झालं, मी दुपारी झोपले होते ना , तेव्हा मम्माआजी चा(राधाची आई) फोन आला होता.. आई आजी तिच्याशी बोलत होती, तिला माहीत नव्हत माझी झोप झालीये, ती म्हणत होती पिहू ला चालेल का नाही माहीत नाही रोहन बाबा म्हणून, म्हणून मी तुला विचारलं."

   " बर नंतर बोलू आपण, जा तू आता खाली खेळायला." पिहुच्या प्रश्नाला टाळत राधा म्हणाली.

   " मम्मा ऐक ना, मला चालेल रोहन बाबा, मला तो खूप आवडतो, बाबा सारखाच तो माझी काळजी घेतो. आपण तिघे एकत्र किती मज्जा येईल ना. "पिहू बाहेर पळते,

  तेवढ्यात बेल वाजते, पिहू दार उघड ग, पिहू ची आजी बाहेर येत म्हणते. 

   " मम्मा, रोहन बाबा आलाय " दार उघडत पिहू म्हणते. आणि रोहन ला कडकडून मिठी मारते. " कुठे गेला होतास तू, किती दिवस ते पण. मी खुप मिस केल तुला."

   " सॉरी पिहू, परत असा नाही करणार, तुझ्यासाठी मी खुप चॉकलेट खेळणी आणली आहेत."रोहन

   " मला नको काहीच, एक प्रॉमिस करशील, बाबा सारख तू आम्हाला सोडून कधी जाऊ नको." पिहू

   रोहन पिहू ला उचलून घेतो" प्रॉमिस, कधी कधी जाणार नाही "

  राधा , आणि  विक्रांतचे आई बाबा त्यांच्या कडे बघत राहतात.

पिहू ची आजी म्हणते," चला पिहू सगळे खाली वाट पाहतायत खेळायला . " पटकन पिहू उडी मारते आणि आजी आजोबांबरोबर खाली खेळायला जाते.

    "काय ग, पिहू काय म्हणत होती रोहन बाबा अस?" मिश्किल पणे रोहन राधाला म्हणतो.

राधा लाजेने मान खाली घालते , "काही नाही"रोहन मी पाणी आणते हा म्हणून आत जायला निघते , रोहन तिचा हाथ धरतो. "रोहन सोड ना हात" म्हणून राधा हात सोडवायचा प्रयत्न करते. 


"पिहू मला बाबा म्हणाली यातच मला सगळं सुख मिळालं, राधा , मी हा हात सोडण्यासाठी नाही तर कायम तुझी "साथ "देण्यासाठी धरला आहे."रोहन आणि राधा मिठीत विसावतात.


समाप्त


©️®️ - सौ गौरी विवेक जोशी

  
    

🎭 Series Post

View all