साथ भाग-7

Story of radha and rohan

   "साथ"
   
भाग 7

   दारावरची बेल वाजते, राधा दार उघडते तर समोर रोहन. अरे तू कसा काय? दार उघडत राधा म्हणते. रोहन आत येत बॅग राधाच्या हातात देत म्हणतो आईने पाठवलंय खाऊ पिहुसाठी.
   रोहन चा आवाज ऐकून पिहू पळत बाहेर येते आणि रोहन ला मिठी मारते. 
   "रोहन अंकल,चल मी तुला माझी नवीन बाहुली दाखवते 'म्हणून त्याला घेऊन जायला लागते.
  "अगं पिहू, नको त्याला त्रास देऊ, आणि रोहन बस मी तुझ्यासाठी कॉफी करते." अस म्हणून राधा स्वैपाककघरात जाते

   एका कोपऱ्यात पिहुचा छोटा संसार मांडलेला, भातुकली, सगळ्या बाहुल्या .हाताला धरून पिहु रोहन ला बसवते. 
   " ही बघ माझी पिंकी बाहुली"म्हणून बाहुलीला त्याच्या हातात देते. तू त्रास नको देऊ बरका पिंकी मी तुमच्या दोघांसाठी खाऊ आणते. छोट्या छोट्या डिश मध्ये खोटाखोटा खाऊ आणते. रोहन ही तिच्या खेळातल्या घरात रमून जातो. तिने दिलेला खाऊ तारीफ करत करत खातो. पोह्यातली मिरची खाल्ली म्हणून खोट खोटं पाणी पितो...पिहुचे आजी आजोबा त्यांचा हा खेळ लांबुन बघतात विक्रांतच्या आठवणीने डोळे पाणावतात.

    "रोहन अंकल, उद्या आपण बागेत जाऊया? उद्या संडे आहे ना मला सुट्टी. तू मी मम्मा ?"
    "हो जाऊया की, नक्की" रोहन
    "पिहू उगीच त्रास देऊ नको, मी घेऊन जाईन तुला, रोहन तू नको तिच्याकडे लक्ष देऊ. तुला काम असेल ना. मी जाईन अरे"राधा
    "अजिबात नाही आमचं ठरलंय ,हो की नाही पिहू  आम्ही जाणार आहोत, तुला यायचय का ते सांग आमच्याबरोबर?"रोहन

 पिहू खुश होते , रोहन आणि पिहू मस्ती करण्यात गुंग होतात. राधा आणि विक्रांत चे आई बाबा त्यांना बघत राहतात.

    ठरल्याप्रमाणे रोहन दुसरया दिवशी राधाकडे येतो. पिहू च्या मागे राधा येते. साधीच पण किती छान दिसत होती राधा. चेहर्यावरच्या आनंदात कायम एक दुःखाची छटा त्याला जाणवायची. पिहू च्या हाक मारण्याने रोहनची तंद्री भंगते. 

   "आई येतो आम्ही जाऊन" म्हणत तिघेही बाहेर पडतात.
   

    बागेत पिहुशी खेळताना रोहन अगदी पिहू एवढा होऊन जातो.खुप खेळून दोघेही दमतात. चला आता मस्त आइसिक्रीम खाऊया. रोहन तिघांसाठी आईसक्रीम आणतो, आणि एक बाहुली पण..अरे रोहन एवढं कशासाठी , पिहू कडे खुप आहेत बाहुल्या. 
 असुदे ग. म्हणत पिहुच्या हातात बाहुली देतो.पिहू आज खुप खूप आनंदी असते.राधाच्या घरापाशी दोघींना सोडतो, पिहू ला आजी आजोबा दिसताच सगळी मज्जा सांगायला ती त्यांच्याकडे धावते. "बाय रोहन अंकल....फ्लॅइंग किस करत पिहू पळते".

     "थँक्स रोहन, तू आज आमच्या साठी इतका वेळ दिलास. पण पिहू लहान आहे, तू तुझी काम सोडून नको येवूस, तिला सवय लागेल आणि त्यामुळे तुझं काम अडायला नको. मी manage करते, शेवटी पिहू माझी जबाबदारी आहे. माझ्या जबाबदारीच ओझं मला इतरांवर नाही लादायच. पुढच्या वेळेस मी काहीतरी कारण सांगेन तिला. "थँक्स अंगेंन...म्हणत राधा निघून जाते.       
     
   रोहन विचार करत गाडी चालवतो, "राधा कस सांगू मी तुला, तुमच्या दोघीच्या आनंदातच माझं सुख आहे,मला ही खूप आवडत तुमच्या दोघीसोबत वेळ घालवायला. मी कस पटवून देऊ तुला माझं तुमच्या दोघीबद्दलच प्रेम.पिहू तुझी एकटीचीच नाही तर माझी पण जबाबदारी आहे.आणि मी ती आनंदाने स्वीकारायला तयार आहे." रोहन घरी पोचतो.

    रात्री राधाच्या कुशीत शिरलेली पिहू राधाला म्हणते" मम्मा बाबा असताना पण आपण अशीच मज्जा करायचो ना , मला आज बाबा ची खुप आठवण आली. तो पण असाच मला बाहुली घेऊन द्यायचा तू नको म्हणत असताना पण." हो म्हणत हळू हळू राधा पिहुला थोपटते. परत राधाच मन विक्रांतच्या आठवणीत जात.


   क्रमशः

- ©️®️ सौ गौरी विवेक जोशी

🎭 Series Post

View all