साथ भाग 2

Story of radha and her childhood friendship

"साथ"
भाग 2

 राधाचा फोनची रिंग वाजत होती, राधाच्या सासूबाईंनी फोन उचलला ...
 हॅलो राधा स्वाती बोलतिये....कधी येतेस ... 
 आग स्वाती मी राधाची सासू, राधा अंघोळीला गेलीये... स्वाती तू भेटलीस तेव्हा पासून राधा जरा खुश आहे, नाहीतर विक्रम गेल्यापासून खूप एकटी पडलीये ग ती. आमचं काय ग मुलगा गेल्याच दुःख सावरत जगू पण राधाच्या आयुष्य आहे पिहू पण लहान आहे ग.. तू तिची खूप जवळची मैत्रीण म्हणून सांगते , समजावं ग तिला दुसर लग्न कर म्हणून.....आता ती आमची सून उरली नाही तर मुलगी झालीये.. स्वाती करशील ना ग एवढं काम?

   काकू नक्की बोलेन मी राधाशी, खरच तुम्ही तिचा आई प्रमाणे विचार करताय खूप बर वाटलं मला . नकळत दोघींच्या डोळ्यातून पाणी वहायला लागलं.

    राधा ....स्वातीचा फोन आहे ग....
    हां आई आले हा....स्वाती बोल ग....राधा स्वातीशी बोलत होती. 
    "राधा ऐक हा....ब्रेकफास्ट ला च ये ...मग दिवसभर खूप गप्पा मारू... लवकर निघ ....पिहू ला पण कधी बघतिये अस झालाय मला" स्वाती म्हणाली
    "हो ग हो लवकर येते"...फोन कट करत राधा सासू बाईना म्हणाली आई उद्या स्वाती कडे जाणार आहे दिवसभर, खूप आग्रह केलाय तिने. जाऊ ना .
    नक्की जा, तुला पण चेंज. मैत्रिणी मिळून मज्जा करा.. 
    काय पिहू ताई उद्या जाणार मावशीला भेटायला? आजोबांनी विचारताच पिहू चे प्रश्न चालू झाले आहे आजी आजोबा उत्तर देण्यात मग्न झाले.

  सकाळी 10 वाजता राधा पोचली स्वातीच्या घरापाशी. 

  " हॅलो स्वाती मी आलीये सोसायटी मध्ये .. गेट जवळ आहे., "

आई आलेच ग म्हणत स्वाती नि धूम ठोकली ...अगदी लहान मुलीसारखी पळत गेली....राधाला मिठी मारली , पिहुला उचलून घेतलं आणि खप मुके घेतले.

  आजच भेटलेल्या मावशी चे असे लाड कारण पाहून पिहू पण गंगारली.????????

   चल आत जाऊया.

 मोठी आई, आई अक्षय, नेहा सगळे बघा कोण आलाय ते... स्वाती जोरात ओरडली. तसे सगळे हातातली काम टाकून पटापट बाहेर आले.

    राधाला ला बघून सगळ्यांना इतका आनंद झाला... सगळ्यांनी अगदी फेर च धरला तिच्या भोवती....किती बोलू आणि कोणा कोणाशी बोलू अस झाल तिला... सगळ्यांच्या प्रेमात नाहून निघाली ती. मोठी आई , स्वतीची आई, बाबा सगळ्यांच्या पाय पडली.  सगळे गप्पा मारत बसले. नेहा स्वातीची चुलत बहीण पिहू ला घेऊन गेली...  चल पिहू तुला चोकॉलेट देते, चॉकोलेट च नाव काढताच पिहू ची स्वारी खुश. 

    किती गोंधळ चाललाय, कोण आलाय एवढं म्हणत रोहन त्याच्या खोलीतून बाहेर आला.... राधाला पाहुन त्याला क्षणात आनंद , राग सगळ्या भावनांचा पूर च आला जणू... पटकन खाली जावं म्हणून निघाला , तेवढ्यात पिहू आली आणि राधाला बिलगली,   " आई नेहा मावशी नि बघ कित्ती चॉकोलेट दिलेत मला" .... मज्जा ,????????

  पिहुला पाहून रोहन तसाच मागे वळाला, खोलीत गेला. काय अधिकारां नि व्यक्त करू राधाकडे माझ्या भावना. ती खूप पुढे गेली आयुष्यात आणि मी मात्र तिथे च अडकून राहिलो अव्यक्य भावनांमध्ये. पुस्तकात लपवून ठेवलेल्या राधाच्या फ़ोटो कडे बघत  भूतकाळात हरवून गेला.

क्रमशः

भाग 1 लिंक

https://www.facebook.com/581606972323826/posts/896335087517678/


   
©️®️ सौ गौरी जोशी

🎭 Series Post

View all