साथ भाग -4

Story of radha and rohan

साथ
भाग 4

   डोकं बधिर झालं रोहन च , सुन्न मनाने तो खोलीत आला. का राधाच्या वाट्याला हे सगळं आलाय? बिचारी राधा...मी किती वाईट वागलो तिच्याशी. किती त्रासातून जातीय ती आणि मी असा वागलो तिच्याशी. शी मला माझा राग येतोय.... टेबल वर डोकं ठेवून रोहन बसलेला तेवढ्यात नेहा येते खोलीत. दादा मोठ्या आईनी खाली बोलावलंय तुला आता, म्हणाली खूप झालं काम .

   रोहन खाली येतो , मुलांचा गोंधळ मोठाच्या गप्पा हसणं राधा सगळ्यांच्यात मिसळून गेली होती. दोघांची नजरानजर होते, रोहन कानाला हाथ लावून हळूच राधाला सॉरी म्हणतो ती नजरेनेच इट्स ओके म्हणते . आणि रोहन त्यांच्यात सामील होतो.


   गप्पा हसणं यांचा बहर आला होता, एकमेकांना चिडवत जुन्या आठवणी, लहानपणीची भांडण सगळं सगळं आठवून सगळे आनंदाचा मोहत्सव साजरा करत होते आणि राधा नकळत आपलं दुःख काही काळासाठी विसरली होती. रोहन चा राग ही कुठल्या कुठे पळाला होता ,रागाची जागा आता काळजी ने घेतली होती.


   रात्री जेवण करून सगळे निवांत गप्पा मारून आपापल्या खोलीत गेले, मुलं नेहा मावशी जवळ झोपली . स्वाती ला आता निवांत पणे राधा शी बोलता येणार होत.आणि राधाला पण.


  " राधा काय करायचं ठरवलं आहेस तू?" स्वाती

स्वाती खर सांगू मी अजून सावरलीच नाहीये ग, विक्रांत ला जाऊन 1 वर्ष झालं पण मला खर च वाटत नाहीये? सगळे मागे लागलेत दुसऱ्या लग्नाचा विचार कर म्हणून, पण इतकं सोप्प नाहीये ग माझ्यासाठी. पीहू कस स्वीकारेल कोणा दुसऱ्याला बाबा म्हणून. लहान आहे ग ती , काय करू मी स्वाती सुचत नाहीये ग मला.

राधा चा हात हातात घेऊन स्वाती तिला धीर देत होती. राधा मी .आहे , तुला काहीही कधीही बोलावसं वाटलं सांगावस वाटलं तर कधीही फोन कर. तेवढ्यात स्वातीची मुलगी आली ,आणि स्वाती तीच्याबरोबर गेली.

राधा गॅलरी त उभी होती. आज खुप दिवसानी मोकळेपणाने ती बोलली होती , खूप हलकं वाटत होत तिला.गार हवा सुखावत होता . आणि मन शांत झालं होत काहीकाळ का होईना.


     " राधा तू इथे के करतीये?"रोहन ने विचारलं
     अरे मी आणि स्वाती गप्पा मारत होतो, श्रेया बरोबर गेली स्वाती. येईलच.
     राधा हे बघ काय सापडलंय जुने अल्बम...आणि तिघेही फोटो पाहण्यात गुंगून गेले.
     ए हा बघ आपला ग्रुप फोटो...स्वाती म्हणाली
     "बघ ना इतका छान फोटो या रोहन नि खराब केलाय माझी वेणी ओढून" राधा
     "अगं तुमच्या दोघांचा पण एक होता ना, हा फोटो नीट आला नाही म्हणून बाबा नि एक काढला होता तुमचा"
     "जाऊदे ग असेल कुठेतरी "रोहन
     आता खूप रात्र झालीये झोपुया आता...म्हणत तिघेही झोपायला जातात.

   रोहन खोलीत जाऊन पुस्तकातला दोघांचा फोटो न्याहाळत बसतो.


  क्रमशः

- ©️®️ सौ गौरी विवेक जोशी

🎭 Series Post

View all